नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!!! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!! मित्रांनो, स्वामी नामाचा महिमा अगाध आहे. स्वामी स्वतः आपले अधिष्ठान आहेतं. स्वामी हे करते आणि कराविते आहेत. या जागचे पालन करते आहेत. त्यामुळे स्वामी नामाचा नेहमी जप करावा. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यावर स्वामींना कुठली प्रार्थना करावी म्हणजे तुमचं दिवस आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाईल ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो, स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात. ते आपल्या भक्ताला कधीही नाराज करत नाहीत एवढाच नव्हे तर स्वामी आपल्या भाकरावर कुठलही संकट येऊ देत नाहीत. स्वामींना गरज असते ती फक्त निस्वार्थ सेवेची श्रद्धेची. स्वामी हे वैश्विक सत्य आहेत. तर मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे करून स्वमिंसमोर या.

त्यानंतर स्वामींच्या पुढे दिप प्रज्वलित करा अगरबत्ती लावा त्यानंतर तुम्ही स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे तसेच त्रिवार नाकघासानी करायची आहे. नंतर स्वामींना हाथ जोडून प्रार्थना करायची हे की “हे स्वामिराया तुझ्या कृपेने कालचा दिवस चांगला गेला त्याच पद्धतीने आजचा दिवस देखील सुखा समाधानाचा आनंदाचा जाऊदे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ कर”.

“तसेच स्वामिराया तुझी सेवा माझ्या हातून जास्तीत जास्त करून घे तुम्हीच माझे माय बाप आहात मला सांभाळून घ्या कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ देऊ नका.” असे म्हणून पुन्हा एकदा मुजरा करायचा आहे. तसचे नंतर तुमची जी निटीसेवा असेल ती तुम्ही करू शकतात. तर मित्रांनो अशी प्रार्थना स्वामींना रोज सकाळी आवरून झाल्यावर बाहेर जाण्याच्या आधी करायची आहे. तुमची सर्व कामे पूर्ण होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *