नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! ! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!! अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, स्वामी महाराज हे प्रत्येक भक्ताला संकटातून तारत असतात. भक्ताला कुठल्याही मोठ्या संकटातून सहि सलामत सोडवत असतात. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

दिनांक 25 नोव्हेंबर चा दिवस वेळ दुपारी दोन वाजेची होती. मी व माझे मैत्रीण स्कुटीवर चौकात जात होतो, मी गाडीवर मागे बसले होते. चौक जवळ आला असताना मैत्रिणीला उजवीकडे वळायचे होते. तिने अर्धे दुभाजक पार केले होते तिच्याकडे दोन एक्टिवा तिच्यापुढे दोन एक्टिवा गाड्या असल्यामुळे तिने पण तिची गाडी त्यांच्या मागे काढण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या गाडीच्या मागे 20 टन उसाचा ट्रक होता, आमची गाडी उजवीकडे वळून गेली मात्र ट्रकचा ड्रायव्हर साईड मागत होता.

कारण त्याच्या ट्रकमध्ये खूप लोड असल्याने ट्रकचा ब्रेक लागत नव्हता, ड्रायव्हरचा आवाज एक वाल्याने जेव्हा मी मागे वळून बघितले तेव्हा एवढा मोठा ट्रक समोर दिसला त्यावेळेस मी अक्षरश: डोळे मिटले व तो ट्रक माझ्या डाव्या पोटरी वरून कमरेपर्यंत आला. ज्यावेळेस त्या ट्रकचे चाक माझ्या पोटरिवर आले तेव्हा मी डोळे मिटून जोरात ओरडले की स्वामी महाराज मेले आता तुम्हीच तारा नाही तर मारा सर्व संपल्यासारखे वाटले.

नित्य सेवा करताना श्री स्वामी चरित्र सारामृतात वाचले होते की, “दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्ष दीनानाथ दासाकडे पहावे,” म्हणून गुरु विषयी श्रद्धा भाव ठाम पाहिजे, कारण आपण हाक मारली की गुरु मदतीला येतातच. नंतर मला पुणे येथे हलवण्यात आले जवळजवळ दीड ते दोन तास सिटीस्कॅन चालले पण मनात मात्र श्री स्वामी समर्थ मंत्र जप चालूच होता. आतून एक दिव्यशक्ती संचारत होती की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा वाजातून कुठून तरी येतो आहे व मनाला ताकद देतो आहे.

ज्यावेळेस ते ट्रकचे चाक पायावरून गेले तेव्हा बराच रक्तस्राव झाला माझा पाय पूर्णत: चेपला गेला होता पण माझ्या मैत्रिणीला व तिच्या गाडीला कसला धक्का नाही. मलाच मार लागला होता पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती!! कारण आपण ज्या गुरूंचे बोट धरले ते आपल्यावर संकट येऊ देत नाही आपल्या जीवनात कधी कधी फार मोठे संकटरुपी दगड पडणार असतात पण माझे माऊलीने माझ्या स्वामींनी खडा पाडला व मला सहीसलामत अपघातातून बाहेर काढले. ज्या ठिकाणी माझा अपघात झाला होता तिथे पुढे स्वामींचे मंदिर आहे आम्ही नेहमी गुरुवार रविवार आरतीला हजर राहत असू.

आपल्यावर कधी असा प्रसंग आला तर स्वामी महाराज आपल्याला किती मोठी साथ देऊन जातात, आपल्या सांभाळ करतात. गाडीचे ब्रेक कदाचित फेल होतीलही पण माझ्या स्वामींच्या कृपेचे ब्रेक्स कधीही फेल होत नाहीत! आपल्या सेविकाऱ्यांचे प्राण रोखण्यासाठी योग्य प्रसंगी ते आपल्या आसपास असतातच एवढा जबरदस्त अपघात झाल्यावर एवढी गर्दी झाली होती आणि त्या गर्दीतून एका व्यक्तीने मला ओढले त्यावेळेस मला असे वाटले की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष स्वामी महाराजच आहेत.

त्यानंतर मला डॉक्टरांनी दोन महिने बेड रेस्ट घेण्यास सांगितले सर्व काही जागेवर होते. या काळात माझ्या आई-वडिलांनी माझी खूप काळजी घेतली. आज मी स्वामी समर्थ महाराजांच्या व माऊलींच्या कृपेने आशीर्वादाने बरे झाले. स्वामींचे नामस्मरण व नित्यसेवा सतत केल्यामुळे ऑपरेशनची वेळ आली नाही. फक्त कमरेत तीन क्रॅक होते, तेही आता पूर्णपणे बरे झालेत. स्वामी कृपेने सावरलो. ज्यांच्या डोक्यावर स्वामींच् वरदहस्त असतो, त्यांच्या जीवनात निराशा कधीच येत नसते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *