नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! वसुबारसच्या दिवशी तेवलेल्या मंगलदीपानंतर धनत्रयोदशीच्या औचित्यावर सर्वांनी सुदृढ आरोग्यासाठी मंगलकामना व्यक्त केली. या दीपपर्वाचा शिरोबिंदू असणारा लक्ष्मीपूजनाचा उत्सव (दि.१२) साजरा होणार आहे. तर मंगळवारी बलिप्रतिपदा तथा पाडवा आणि बुधवारी भाऊबीज असे दीपपर्वातील उत्सव साजरे होणार आहेत.

नरक चतुर्दशी
आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. यंदा रविवारी (दि.१२) नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेच्या वेळी चंद्रोदय मुहूर्तावर म्हणजे ५.३३ वाजता तीळ व तेल आदी औषधी द्रव्यांच्या सहाय्याने अभ्यंग स्नान करून नरकरूपी पापवासना व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. तर याच दिवशी लक्ष्मीपूजन साजरे होते आहे. प्रथा व परंपरेप्रमाणे या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते.

लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त असे :

– सकाळी ८.२० ते १२.५० (चंचल, लाभ, अमृत)
– दुपारी १.२० ते २.५० (शुभ )
– सायंकाळी : ६.५० ते ११.२० (शुभ , अमृत , चंचल)

या दिवशी वृषभ लग्न हे राज्यातील विविध शहरांनुसार भिन्न आहे. रविवारी सायंकाळी ६.०३ ते रात्री ८.१४ या कालावधीत वृषभ लग्न आहे. शहरांनुसार पाच ते दहा मिनिटांच्या फरकांनी वृषभ लग्नाचा मुहूर्त मागे-पुढे असू शकतो.

लक्ष्मीपूजन

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजनाचा उत्सव साजरा होतो. यंदा (दि.१२) लक्ष्मीपूजन घरोघरी केले जाणार आहे. पंचांगाच्या आधारानुसार लक्ष्मीपूजनासाठी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त आहेत. साधारणत: या दिवशी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीचा स्वभाव हा चंचल मानला गेला आहे. त्यामुळे स्थिर लग्नावर लक्ष्मीपूजन लाभाचे मानले जाते. लक्ष्मीपूजनासाठी वृषभ लग्न हे श्रेष्ठ समजले जाते. या दिवशी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीचे पूजन करून केरसुणी स्वरूपातील लक्ष्मीचेही पूजन केले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *