मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालिरिती, मान्यता आहेत. आपल्या देशात शेकडो मंदिरे आहेत. विविध धर्म, जाती, पंथ एकत्रितपणे भारतात नांदतात. धर्म, विचार, पद्धती, चालिरिती, परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे नामस्मरण. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे, ती व्यक्ती भगवंतांचे नामस्मरण नेहमी करत असते. (Japmala) नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे. देवाची साधना करण्याचा नामस्मरण एक मार्ग आहे. नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकार आहे. नापजप हा कोणालाही हानिकारक नाही. नामजपाला वयाचे बंधन नसते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो नामजप कुठेही करता येतो. त्याला खास विशिष्ट स्थळ हवे असे काही नाही. शांत आणि एकांत जागा उपलब्ध असली तर अधिक चांगले पण ती उपलब्ध नसली तरी चालते. नामजपाला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली असते अशी मान्यता आहे.

त्याचबरोबर मित्रांनो जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये १०८ मणी असतात. (Japmala) माळेमध्ये १०८ मणी का असतात. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक जण आपल्या मनाला शांती मिळावी आणि त्याचबरोबर आपल्या आत्मशांतीसाठी आपल्यातील बरेच जण आपल्याला हवे असणाऱ्या देवी देवतेच्या नामाचा जप करत असतात. कारण मित्रांनो देवी देवतेच्या (Japmala) नामजपमधून आपल्याला जी मनाची शांती मिळते आणि त्याचबरोबर जो आनंद मिळतो तो इतर कोणत्याही कामामध्ये मिळत नाही.

म्हणूनच देवपूजा झाल्यानंतर आपल्यातील बरेच जण वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मंत्राचा नाम जप करत असतात. परंतु मित्रांनो अशा पद्धतीने नामजप करत असताना आपल्यातील अनेक जण वेगवेगळ्या चुका करत असतात.

म्हणूनच मित्रांनो आज आपण नामजप कशा पद्धतीने करायचा असतो आणि त्याचबरोबर नामजप करताना आपल्याला कोणकोणत्या नियमांचे पालन करावे लागते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची माहिती आपणास जाणून घेणार आहोत ती म्हणजे घरामध्ये कोणत्या ठिकाणी बसून आपल्याला नामजप करायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात. (Japmala) याबद्दलची ही सविस्तरपणे माहिती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला जपमाळ करत असताना लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे (Japmala) जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा आणि डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. त्याचबरोबर नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये आणि माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये.

जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्या शास्त्रामध्ये ही सांगितलेली आहे ती अशी आहे की, जपमाळ करण्यासाठी स्त्रीने जपमाळ करत असताना त्यासाठी तुळशीच्या माळेचाच वापर करायचा आहे.

मित्रांनो, आपल्यातील अनेक जण अशी चूक करतात की हे लोक रुद्राक्षाच्या माळेने नामजप करत असतात. परंतु मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार रुद्राक्षाच्या माळेने जप करण्याचा अधिकार फक्त पुरुषांनाच दिलेला आहे अस आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल आहे. म्हणूनच स्त्रियांनी शक्यतो रुद्राक्षाच्या माळेने जपमाळ करणे टाळावे आणि तुळशीची माळ ही स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही चालते. त्यामुळे सर्वात उत्तम पर्याय हाच की आपण सर्वांनी नामजप करत असताना तुळशीच्या माळेचाच वापर करा.

मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे ती म्हणजे आपण जर आपल्या देवघरांमध्ये देवी देवतांचे समोर बसून नामजप किंवा एखाद्या मंत्राचा जप केला तर यामुळे जितके फायदे आपल्याला होत नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त फायदे हे आपल्याला आपण गोशाळेमध्ये बसून नामजप (Japmala) केल्यामुळे होत असतात.

त्याचबरोबर एखाद्या आरण्यामध्ये किंवा एखाद्या पर्वतावरती जर आपण एखाद्या मंत्राचा नाम जप केला तर यामुळे आपल्याला प्रचंड फायदे प्राप्त होतात असेही आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल आहे. म्हणूनच मित्रांनो आदीच्या काळामध्ये ऋषीमुनी आणि संन्यासी हे डोंगरांवरती त्याचबरोबर जंगलामध्ये पर्वतांमध्ये जाऊन नामजप करत असत.

तर मित्रांनो तुम्ही जर नामजप करत असाल तर एखाद्या शांत ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचे मन विचलित होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही मंत्रजप करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *