नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ, आपलं कसं होईल हा प्रश्न मला कधीच पडत नाही कारण जो देव झाडावर झोपलेल्या पक्ष्याला खाली पडू देत नसेल तर मला कसा काय खाली पडू देईल. असा भाव जर तुम्ही मनात ठेवला तर तुम्हाला कधीच एकट वाटणार नाही. कारण ही सृष्टी चालवणारा तो विधाता परमेश्वर आपल्याला शक्ती देतो फक्त आपला दृढ विश्वास हवा.

आजकाल खूप संकटं येतात, प्रत्येकजण या ना त्या कारणाने त्रस्त आहे. कोणी घरच्या समस्यांनी त्रस्त आहे, तर कोणी भाऊबंदकीने. कोण चांगलं करत असेल तर बघवत नाही अशी अवस्था बघायला मिळते. मग आपण निराश होतो, काय करावं हे कळत नाही.

स्वामी म्हणतात तू माझी भक्ती कर तुझं काय करायचं हे माझ्यावर सोड.जीवनात नेहमीच दुःख येतात, दुःख येताना गरीब किंवा श्रीमंत बघत नाहीत. दुःख नेहमी एकटी येत नाहीत, तर ती आपला गोतावळा सोबत घेऊन येतात.

त्यामुळे कधीच डगमगायचं नाही. त्या दुःखाना सांगायचं तुमच्यापेक्षा माझे स्वामी शक्तिशाली आहेत, त्यामुळे मला घाबरण्याचं कारण नाही स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील.

श्रद्धा कशी असावी याची एक गोष्ट बघू. एकदा एका गावामध्ये सर्व गावकरी देवाला साकडं घालतात की, देवा पाऊस पडू दे. दुसऱ्या दिवशी सर्व लोक फक्त आशेने बघत असतात.

मात्र एक मुलगा चक्क छत्री घेऊन येतो. यावेळी लोक त्याला विचारतात, छत्री घेऊन का आलास? त्यावेळी तो मुलगा म्हणतो, माझा देवावर विश्वास आहे ना.. आज पाऊस पडणार त्यामुळे मी पावसात भिजू नये म्हणून छत्री घेऊन आलो आहे. ही निरागसता हा विश्वास भगवंतावरच प्रेम आपल्याकडे असलं पाहिजे, तरच भगवंत आपल्याला पावतो. नाहीतर मनी नाही भाव देवा मला पाव असं केल्याने देव कधीच पावत नाही…
तुम्ही तुमचा नितांत भाव ठेवा, स्वामी सोबत आहेतच की. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *