नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आपल्या हिं’दू ध’र्मात तुळशीचे खूप महत्त्व आहे तुळशीला आपण रोप नाही तर साक्षात देवी मानतो म्हणूनच प्रत्येकाच्या दारापुढे तुळस ही असतेच तुळस ही आपल्या दारापुढे असणे आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी खूपच फायद्याचे असते तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असल्याचे मानले जाते म्हणून जर नित्य नियमाने तुळशीचे पूजन केले तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होतोअसे आपल्या अनेक ध’र्म ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे परंतु तुळशी बद्दल आणखी एक गोष्ट आपल्या ध’र्म ग्रंथात सांगितलेली आहे जी बहुतेक व्यक्तींना माहीत नसेल

तुळशी खाली ही एक वस्तू बांधल्यास तुळस मातेच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनात आनंद आणि सुखाची भरभराट होते शास्त्रानुसार ज्यांच्या दारापुढील तुळस हिरवीगार टवटवीत व भरलेली असते त्यांचे घर ही सुख समाधान आणि आनंदाने बहरलेले असते

हे बाहेर तुळस पाहूनच आपल्या लक्षात येते श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळस अतिप्रिय आहे तुळस अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन अपूर्ण मानले जाते तसेच श्रीहरी विष्णू ना कोणताही नैवेद्य अर्पण करतानाही सर्वात आधी तुळशीचे पान त्या नैवेद्यावर ठेवले जाते तुळस मातेच्या फक्त दर्शनानेच आपली सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि दोष नष्ट होतात.

दररोज सकाळी तुळशीची पूजन करून तुळशीला पाणी अर्पण करावे व संध्याकाळी तुळशीपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि संपन्नता येते घरात सकारात्मक ऊर्जा येते दाराच्या दोन्ही बाजूस दोन तुळशीची रोपे लावल्यास आपल्या घरात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाहीत

आणि घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे श्रीहरी विष्णु भगवंत आणि माता लक्ष्मी आपल्या घरात स्थायी वास्तव्य करतात जर मुले आपले म्हणणे ऐकत नसतील हट्ट करत असतील तर आपल्या घराच्या पूर्व दिशेला तुळस लावावी व त्या तुळशीचे पूजन मुलांना दररोज करायला लावावे तुळशीपुढे मुलांना दिवा लावायला सांगावे यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होईल व मुले आपले म्हणणे ऐकू लागतील.

दररोज तुळशीची दोन-तीन पाने मुलांना खायला दिल्यास मुलांचे मन शांत राहते त्यांचा स्वभावही बदलतो मन एकाग्र होऊन अभ्यासात लक्ष लागते पूर्वीच्या काळी सर्वांच्या अंगणात तुळस असे आता फ्लॅट सिस्टिम मुळे आपल्याला हे शक्य नाही परंतु गॅलरीमध्ये खिडकीत छतावर कुठेतरी तुळशीची कुंडी जरूर असावी ज्यांच्या घरी तुळस असते त्यांच्या घरी समृद्धी नांदते

तुळस मातेला लाल रंगाची ओढणी अर्पण केल्यास आपल्या घरात सुख समृद्धी येते म्हणून तुळस मातेला लाल रंगाची ओढणी जरूर अर्पण करावी तुळशी विवाह वेळी श्री हरी विष्णु भगवंत व तुळशी मातेचा विवाह लावल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे कष्ट राहत नाहीत तसेच त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते

तुळशीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा शिवलिंग ठेवू नये काही घरातील तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलेले असतेहे खूप चुकीचे आहे तुळशी खाली श्री हरी विष्णू भगवंतांची शालिग्राम स्वरूप प्रतिमा ठेवावी काही व्यक्तींना वाटते की शालिग्राम म्हणजेच महादेव आहेत परंतु शालिग्राम म्हणजेच महादेव नसून ते श्रीहरी विष्णू भगवंत आहेत जे शिळेच्या स्वरूपात आहेत पिंड आणि शालिग्राम यामध्ये फरक आहे तुळशीच्या वृंदावनात किंवा कुंडीमध्ये इतर कोणतीही रोपे लावू नयेत आता आपण जाणून घेऊया की तुळस मातेला कोणती वस्तू अर्पण करावी

तुळस मातेला लाल रंगाची छोटीशी ओढणी जरूर अर्पण करावी यामुळे तुळस मातेची छाया सदैव आपल्यावर राहते काही ठिकाणी आपण बघतो की तुळस मातेला लाल रंगाची ओढणी अर्पण केलेली असते परंतु ती ओढणी धूळ मातीने अगदी अस्वच्छ झालेली असते जुनी झाल्यामुळे फाटून जाते तरीही तशीच ठेवलेली असते परंतु यामुळे माता तुळशीची कृपा तर आपल्यावर होत नाही

तर अवकृपा आपल्यावर होते म्हणून आपण जी ओढणी देवी तुळशीला अर्पण करतो ती वेळोवेळी स्वच्छ करावी ओढणी खराब झाली फाटली तर ती पाण्यात विसर्जित करून नवीन ओढणी आणून ती तुळस मातेला अर्पण करावी तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची अस्वच्छता असू नये चपला बूट तुळशीजवळ काढू नयेत

तुळशीच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ व प्रसन्न असावा तुळशीला दररोज सकाळी शुद्ध पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे तुळस मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम बरसत राहतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *