आजच्या युगात स्वतःला सुंदर आणि आकर्षक ठेवण्याची इच्छा कोणाला नसते, प्रत्येकाला आयुष्यभर तरुण आणि सुंदर दिसायचं असतं. यासाठी अचानक लोक योगा आणि व्यायाम करू लागतात.तर काही जण ट्रिटमेंट घेतात. पण वय कुठं लपतं का? आजच्या युगात स्वतःला सुंदर आणि आकर्षक ठेवण्याची इच्छा कोणाला नसते, प्रत्येकाला आयुष्यभर तरुण आणि सुंदर दिसायचं असतं. यासाठी अचानक लोक योगा आणि व्यायाम करू लागतात. तर काही जण ट्रिटमेंट घेतात. पण वय कुठं लपतं का?

आजच्या युगात स्वतःला सुंदर आणि आकर्षक ठेवण्याची
इच्छा कोणाला नसते, प्रत्येकाला आयुष्यभर तरुण आणि सुंदर दिसायचं असतं. यासाठी अचानक लोक योगा आणि व्यायाम करू लागतात. तर काही जण ट्रिटमेंट घेतात. पण वय कुठं लपतं का? वाढत्या वयाच्या रेषा चेहऱ्यावर काळानुसार उमटत राहतात.

पण वयाच्या या रेषा कमी दिसाव्यात किंवा चेहऱ्यावरून वाढतं वय जाणवू नये यासाठी काही घरगुती उपाय आणि सवयी आहेत, ज्या फायदेशीर ठरतात. या सर्व सवयी दैनंदिन जीवनाचा भाग असायला हव्या. तसेच त्या दीर्घकालीन पाळायला हव्या. आज आम्ही महिलांना काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमचं वय कमी दिसण्यास मदत होईल.

आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं आणि आपली लाइफस्टाइल चांगली असणं आवश्यक आहे. आपण काय खातोय, किती खातोय यापासून ते आपल्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळादेखील आपल्या शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावतात. आज आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, त्याचं पालन तुम्ही रोज केलं तर त्याचे तुमच्या शरीरावर दीर्घकालीन परिणाम दिसतील.

आपली रोजची सकाळ ही सामान्यपणे चहा किंवा कॉफीने सुरू होते. परंतु रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून ते पाणी प्या. त्यानंतर चहा किंवा कॉफी घेण्यास हरकत नाही. उपाशीपोटी चहा, कॉफी घेणं शरीरासाठी चांगलं नाही, असं म्हणतात. लिंबूपाण्याचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे हे पचनास मदत करतं.

तसेच ते लिव्हरला पित्त तयार करण्यास प्रोत्साहित करतं. लिंबू पाण्यामुळे छातीत जळजळ, ढेकर येणं आणि पोटात गोळा येणं, अशा समस्यांपासून सुटका होते. यामधील व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. लिंबूमुळे युरिन इन्फेक्शन ठीक होण्यास मदत होते. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याची सवय शरीराला लावायला हवी.

जवस शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. एकदा जर कधी तुम्ही लिंबूपाणी प्यायल्यानंतर 1 चमचा रात्रभर पाण्यात भिजवलेल्या जवसाच्या बिया खाल्ल्यात तर तुमचा संपूर्ण दिवस हा उत्साही जाणार. आणि तुम्ही या बिया नुसत्या खाऊ शकता. त्याचप्रमाणे ऑरेंज ज्युससोबतही त्यांचे सेवन करू शकतात.

याशिवाय दही, किंवा प्रोटीन शेकमध्ये या भिजवलेल्या बिया बारीक करून टाका आणि ते दही खा किंवा शेक प्या. जवसाच्या बियांच्या सेवनाने पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत होते. दररोज फ्लॅक्ससीडचे सेवन केल्याने हृदयरोग, कॅन्सर, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.

व्हिटॅमिन डी चा आहारात समावेश र वाढत्या वयाबरोबर महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांची कमतरता अधिक असते. याचे मुख्य कारण हॉर्मोन्समधील बदल, ग’र्भधारणा आणि रजोनिवृत्ती असू शकते. बऱ्याच वेळा जीवनशैलीतील बदलांमुळे स्त्रियांमध्ये अकाली वृद्धत्व सुरू होते. तसेच त्वचा, केस आणि हाडांशी संबंधित समस्या स्त्रियांमध्ये अधिक सामान्य असल्याचे सांगितले जाते.

बहुतांश स्त्रिया पाठ आणि पाय दुखण्यासारख्या समस्यांनी त्रस्त असतात. या महिलांनी हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचं मुबलक सेवन करणं फार आवश्यक आहे. त्यामुळे आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेलं अन्न घ्यावं. मश्रुम, दूध, चीज, सोया, अंडी, लोणी, ओटचे जाडे भरडे पीठ, चरबीयुक्त मासे यासारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असते.

व्हिटॅमिन डीसाठी कोणत्याही गोळ्या किंवा इतर औषधं घ्यायचा विचार करत असाल, तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. र’क्त तपासणी करून डॉक्टर तुम्हाला आवश्यक ती औषधं आणि डाएट सुचवू शकतात. ज्याची तुम्हाला मदत होईल आणि दुष्परिणाम होण्याचा धोका नसेल.

तर, वरील तीन उपाय करून तुम्ही तुमचं शरीर निरोगी ठेवू शकता. शरीर निरोगी असेल तर वाढत्या वयाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *