नमस्कार मंडळी,

हिंदू ध’र्मात, बहुतेक पुरुष मुंडनच्या नावाने आपले केस अर्पण करतात. मुंडन (केस दान ) हे याचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. पण आपल्या भारतात एक असे स्थान आहे जिथे स्त्रिया देखील नवस पूर्ण झाल्यानंतर मुंडन करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, दरवर्षी लाखो भक्तांचे केस का कापले जातात ? तसेच ही अद्भुत प’रंपरा कशी सुरू झाली ? नसेल तर पुढे जाणून घ्या.

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात तिरुपती वेंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. यासह, हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर देखील आहे. तामिळनाडूच्या थिरुथागामी साइटवर, मोठ्या संख्येने स्त्रिया त्यांचे नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचे मुंडण करतात. तिरुपती बालाजी मंदिरात केश दान केल्याबद्दल असे म्हटले जाते की, जो येथे आपले केस दान करतो त्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

यासह सर्व त्रास संपले जातात असा भक्तांचा विश्वास आहे. जो व्यक्ती आपल्या मनातून सर्व पाप आणि दुष्टता येथे सोडतो. देवी लक्ष्मी त्याच्या सर्व दुःखांचा अंत करते. म्हणून इथे लोक सर्व केस आणि पापांच्या रूपात सोडतात. जेणेकरून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी त्याच्यावर प्र’सन्न होतील. दररोज सुमारे २ हजार भक्त तिरुपती मंदिरात आपले केस दान करून जातात.

भारतासह भारताबाहेरील पर्यटक देखील या मंदिराला भेट द्यायला खूप दूर दूर ठिकाणांवरून येतात. अनेक भक्त निनावी पद्धतीने येथे दान करतात. तेथील दानाच्या हुंडीमध्ये भक्त नोटांची बंडले, सोन्या-चांदीच्या विटा अशा अनेक मौल्यवान वस्तू दान म्हणून टाकतात. तिरुपती बालाजीला अनेक भक्तांनी सोन्या-चांदीचे दागिने देखील केले आहेत. देवळाच्या श्रीमंतीची झलक केवळ मंदिराच्या परिसरात दिसत नाही तर तिरुपती शहराची भरभराट बघून ह्या ऐश्वर्याची, मंदिराला येणाऱ्या भक्तांच्या संख्येची चुणूक दिसते.

नव’साला पावणारा देव म्हणूनही तिरुपती बालाजीची ख्याती आहे. अनेक भक्त न’वस बोलण्यासाठी आणि नंतर तो फेडण्यासाठी येथे येत असतात. पूर्वी न’वस फेडण्यासाठी म्हणून केशदान करण्याची पद्धत होती. आपली मनोका’मना पूर्ण झाली तर भक्त इथे येऊन आपले मुंडण करतात आणि ते केस मंदिराला दान करून टाकतात. आधी केवळ न’वस फेडण्यासाठी म्हणून केशदान केले जायचे. आता मात्र सर्रास लोक तिथे जाऊन केशदान करून येतात. पुरुषांबरोबरच स्त्रियादेखील केशदान करण्यात मागे नाहीत.

मंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठ्या इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात. केस काढणार्याला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. तुम्हीदेखील कधी ना कधीतरी तिरुपतीला जाऊन केशदान करून आला असालच.

पण तुम्हाला माहीत आहे का की, रोज एवढ्या भक्तांचे दान केलेले केस कुठे जातात ? रोज हजारो भक्तांनी दान केलेल्या या केसांचं काय होत असेल पुढे ? तर मंदिराच्या ट्रस्ट तर्फे या केसांचा लिलाव केला जातो. यातून मंदिराला जवळपास ८० ते १०० कोटींचे उत्पन्न मिळते. काय मंडळी, आकडा ऐकून केस उभे राहिले ना ? पुढे या केसांचा उपयोग कृत्रिम केस बनवण्यासाठी केला जातो.

चित्रपटांमध्ये आपण जे नकली केस किंवा केसांचा टोप बघतो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ‘विग’ म्हणतो. तो बनवण्यासाठी या केसांचा उपयोग केला जातो. परदेशात या कृत्रिम केसांना प्रचंड मागणी आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देखील हे कृत्रिम केस वापरले जातात. दरवर्षी या मंदिराला ५ कोटीपेक्षा जास्त भाविक भेट देतात. यातले बरेचसे भक्त मुंडण करून केस दान करतात.

या केस विक्रीतून मिळालेल्या पैशांतून मंदिरातर्फे शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी केली जाते. हे दूध मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लहान मुलांना तसेच महिलांना दिले जाते. या दुधाचा उपयोग पुढे तूप काढण्यासाठीही केला जातो. हे तूप देवाचा प्रसाद बनवण्यासाठी वापरले जाते. पाहिलंत मंडळी, तुम्ही दान केलेल्या केसांमागे किती मोठा इतिहास आहे बघा..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *