आज मी आपणास स्वामी समर्थांची अशी कथा सांगणार आहे. ज्यामध्ये स्वामी उत्तर देताना म्हणतात सर्वश्रेष्ठ भक्त कोण ठरतो आणि सर्वोच्च भक्ती कोणती ठरते याची शिकवण देत आहेत.स्वामी कथ स्वामी समर्थांच्या सर्वश्रेष्ठ भक्त कोण ठरेल अशी पैंज लागलेली असते.
स्वामींच्या श्रेष्ठ भक्ताला संपूर्ण एका महिन्यापर्यंत नैवेद्य अर्पण करण्याचा मान मिळाल्याचे जाहीर होते. त्यासाठी गावातील सावकार गणेश हरी सदाशिव आणि गावातील सामान्य माणूस भास्कर आपला दावा करण्यासाठी

स्वामींकडे येतात आणि आपल्याला हा मान मिळावा अशी विनंती करतात. यावेळी पुढील सात दिवसात तुम्ही कशी स्वामी सेवा कराल त्यावरून तुम्हाला हा मान मिळणार.मग ते दोघे तिथून निघून जाता.गणेशोत्सव काळात स्वामी ची सुंदर शी मूर्ती घडवायची कशी ठरते? हलवाई सदाशिव स्वामीसाठी सुके मेवे असली उत्तम मीठाई तयार करण्याच्या कामाला लागतो.एके दिवशी सावकार गणेश आणि सदाशिव हलवाई एकमेकांची निंदा करतात. आपली कृती सर्वोत्तम ठरेल असा दावा ही करतात

एवढ्यात सामान्य माणूस आणि भास्कर एका घरात जाताना दोघांना दिसतो. भास्कर घरातून बाहेर पडल्या वर आमचा मित्र भास्कर येथे काय करत होता, असा प्रश्न ते दोघे घरातील एका व्यक्ती ला विचारतात.सोबत गप्पागोष्टी करत होतात असे उत्तर त्यांना मिळाले . चहा पाणी घेऊन ते निघून जातात. ते ऐकून दोघे आनंदित होतात. त्यांना असे वाटते. आपला एक प्रतिस्पर्धी कमी झाला.

स्वामी प्रथम गणेश हरी सदाशिव यांनी घडवलेली सुंदर मूर्ती पाहतात. मग सदाशिव हलवाई याने बनवलेली मिठाई चाखून बघतामग स्वामी भास्करला विचारतात काय रे भासकरा हे काय केले भास्कर म्हणतो, स्वामी मी विशेष काय करणार तुमच्याबद्दल, तुमच्या लीलाबद्दल आणि तुमच्या सामर्थ्या बाबत लोकांना माहिती दिली.
तुम्ही जे उपदेश करतात त्या बाबत लोकांना समजावून सांगितले. महत्त्व पटवून दिले त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमची शिकवण त्यांना कळण्यासाठी काही प्रयत्न केले.
मग स्वामी त्याला म्हणतात
शाब्बास भास्करा आम्हाला जे पाहिजे होते तेच तू केले तुलाच नेवैद्य अर्पण करण्याचा मान मिळाला पाहिजे असे स्वामी घोषित करतात.

हेही वाचा Why is the kardoda tied : हिंदू धर्मात करदोडा का बांधला जातो आणि मुली देखील बांधू शकतात का?
हे पाहून गणेश आणि हे हलवाई सदाशिव यांना फार नवल वाटते
स्वामी त्यांना म्हणतात, अरे संताना देवता का पाठवतो. अज्ञानी लोकांना सत मार्ग दाखवण्या साठी मार्गदर्शन करण्यासाठी. प्रपंच करताना ईश्वराचे नाम स्मरण होऊन आठवण करून द्यायला. भास्करने या कामात शक्य असेल तेवढा हातभार लावला. सतमार्ग दाखवन्याचा प्रयत्न केला. आम ची शिकवण लोकांपर्यंत पोहचत नाही. त्यांच्या पर्यंत पोहोचली

संत मिठाई ग्रहण करतात ते भक्त च्या समाधाना साठी आम्हाला जे अपेक्षित होते ते भास्कराने करून दाखवले म्हणून भास्कर ची कृती सर्वश्रेठ ठरली.
स्वामी भक्तांनि स्वामींनी दिलेल्या आदेशानुसार प्रपंच करताना आपण देवाला कधी विसरू नये आपण स्वामी ना कधी विसरू नये. देवाचे, आपल्या स्वामी चे नामस्मरण करावे. आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना चांगला मार्ग दाखवण्यास मदत करावी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *