मित्रांनो, शास्त्रज्ञांना सोमनाथ मंदिराचा शोध घेताना अशी काही गोष्ट हाती लागली जी त्यांच्या विचारांच्या पलीकडेच होती. ती गोष्ट म्हणजे सोमनाथ मंदिरासमोर असलेला हा खांब. हा खांब कधी पासून इथे आहे हे आजपर्यंत कोणालाच माहित नाही. शास्त्रज्ञांनी पाहिले की, त्या खांबावर एक बाणाचे निशाण आहे. जे थेट समुद्राच्या दिशेने इशारा दाखवत आहे. त्या खांबा खाली काही संस्कृत मधले शब्द लिहिले होते.

जेव्हा त्यांनी त्या संस्कृत शब्दाचा अर्थ मराठी मध्ये शोधला तेव्हा त्यांनी आश्चर्याने बोटे तोंडात घातली आणि विचारात पडले की, हे असे कसे होऊ शकते. चला तर जाणून घेऊया ह्या खांबाचे रहस्य.. भारतात जाणल्या जाणाऱ्या १२ ज्योतिर्लिंग मधील गुजरात येथील सोमनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे. सोमनाथ मंदिराचा इतिहास हा विलक्षण आणि गौरवशाली होता.

सोमनाथ मंदिराच्या आंगनात एक बाणस्तंभ नावाचे एक स्तंभ आहे. सोमनाथ मंदिर नवीन आहे परंतु स्तंभ खूप जुने आहे. सहाव्या शतकापासून ह्या स्तंभाचा उल्लेख केला जातो. ह्या स्तंभाला दिशा दर्शक स्तंभ असेही म्हटले जाते. ज्याच्यावर समुद्राच्या दिशेला असणारा एक बाण आहे. त्यामुळे त्याला बाण स्तंभ असे म्हटले जाते. पण त्याच्यावर असे काही लिहिले आहे,

ज्यामुळे शास्त्रज्ञ सुध्धा आश्चर्यचकित झाले आहेत. त्या संस्कृत शब्दाचा अर्थ असा आहे की, जर मंदिरा पासून समुद्राच्या दिशेने एक सरळ रेषा ओढली तर दक्षिण द्रुवा पर्यंत मधे एकही भूखंड येत नाही. शास्त्रज्ञांनी लिहिले आहे ते खरच असे असेल का ? हा विचार करून शोध लावण्यास सुरू केला आणि त्यांना ह्या शोधात जसे लिहिले आहे तसेच हाती लागले.

बाण स्तंभाच्या निर्माण काळात लोकांना त्यामुळे हे ही कळाले होते की, पृथ्वी गोल आहे. आणि पृथ्वीचा दक्षिण ध्रुव कुठे आहे हे ही समजले होते. तर त्याच दक्षिण ध्रुवापर्यंत कुठलाही भूखंड नाही असे ह्या स्तंभावर लिहिले आहे. ह्यामुळे हे निश्चित आहे की, आपले पूर्वज नकाशा बनविण्यात तरबेज होते. पण भारताच्या ज्ञानाचा कुठलाही पुरावा न भेटल्याने,

धरतीचा पहिला नकाशा बनविण्याचे श्रेय ग्रीक शास्त्रज्ञांनी घेतले. परंतु हा नकाशा अपूर्ण होता ज्यामध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दर्शवले नव्हते. दक्षिण ध्रुवापासून भारताच्या पश्चिम दिशेस पर्यंत जिथून सरळ रेषा जाते तिथे पहिले ज्योतिर्लिंग स्थापित केले गेले होते. परंतु सोमनाथ ज्योतिर्लिंग हे दक्षिण ठिकाणी स्थापित का आहे हे आजपर्यंत कोणाला समजले नाही. पण आम्ही तुम्हाला ह्या बद्दल नक्कीच सांगू,

मित्रांनो भेटू पुन्हा नवीन माहिती सोबत तोपर्यंत तुम्ही एकदा तरी ह्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेच पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *