नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकांचे खूप कल्याण केले आहे कित्येकांचे जीवनातील प्रश्न असतील अडचणी असतील त्या सोडवल्या आहेत तर मित्रांनो आज आपणपाहणार आहोत की रोज सकाळी कोणता मंत्राचा जाप केल्याने आपले सर्व कामे होतील पूर्ण .

मित्रांनो प्रत्येक घरातील स्त्रियांनी दररोज सकाळच्या वेळी ५ मिनिटे हा उपाय करावा. हा उपाय घरातील स्त्रियांनी लहान-मोठ्या वयस्कर सर्व स्त्रियांनी हा उपाय नक्की करावा. आपल्याला तान, तनाव, त्रास यापासून आपली सुटका होईल. हा उपाय केल्याने महिलांचे आरोग्य देखील उत्तम राहील. घराच्या लक्ष्मी असतात तिचं नातं प्रत्येकाशी जोडलेलं असतं प्रत्येक कामात ती निगडित असते. तिच्या शिवाय घरातील कोणतीही कामे होत नाहीत. प्रत्येक घराचा पाया हा महिलेला मानला आहे प्रत्येक कामात तिचा सहभाग असतो.

या सर्व कामांमध्ये तितकी व्यस्त असते की तिच्या शरीराकडे पाहण्यासाठी तिच्याकडे वेळच नसतो. या सर्व कामांमध्ये तितकी गुरफटून जाते की तिला स्वतःच्या अस्तित्वाचे देखील विसर पडते. त्यामुळे ती तिला नाव शारीरिक त्रास खूप मोठ्या प्रमाणात होतो. व त्याचा त्रास तिला होतो प्रत्येकाच्या चिंतेने ती त्रस्त असते. जसे की आपल्या मुलांचे काय होईल, पतीचे काय होईल, घरातील इतर मंडळींचे कसे काय होईल. आई-वडिलांची चिंता अश्या प्रत्येकाची तिला चिंता लागलेली असते. त्यामुळे त्याचा परिणाम त्या स्त्रियांच्या जीवनावर होत असतो.

मित्रांनो घरातील प्रत्येक स्त्रिया या दिवस सुरू झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्यस्तच असतात. ज्यांना आपल्या शरीराकडे लक्ष देणे शक्य नसते. ती तरी वीचार करत असते कोणाला काय हवे काय नको याचा कडे जास्त लक्ष देते. व स्वतःकडे लक्ष देत नाही. अशा महिलांनी दिवसातून पाच मिनिटे हा उपाय केला तर तिला होणाऱ्या ताण-तणावाच्या त्रासापासून तिची सुटका होईल. हा फक्त पाच मिनिटात उपाय आपल्याला करायचा आहे. स्वतःसाठी दिवसातून फक्त पाच मिनिटे काढायचे आहे.

मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आंघोळ करण्याच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घराबाहेर कुठेही जायचे नाही. आपण आपल्या घरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी झोपतो. त्या ठिकाणी देखील हा उपाय केला तरी चालतो आपल्याला फक्त डोळे मिटून निवांत शांत बसायचे आहे बसत असताना आपण बेडवर किंवा जमिनीवर देखील बसू शकतो. व आपले डोळे मिटून मन एकाग्र करून आपल्या डोळ्यासमोर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणायची आहे.

मित्रांनो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. फक्त पाच मिनिट आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत असताना आपल्या मनामध्ये किंवा डोळ्यासमोर कोणतेही चित्र आणू नका. एकाग्र मनाने स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. मी दिवसभर हे करणार आहे, ते करणार आहे असा कोणताही मनामध्ये विचार न आणता फक्त स्वामी समर्थ महाराजांचा विचार आपल्या मनामध्ये करावा. आपल्याला वेळ नसला तरी फक्त दिवसातून हे पाच मिनिटे वेळ काढा व या मंत्राचा जप करा. स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने तुमचे आरोग्य निरोगी व उत्तम राहील.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *