नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, रोज सकाळच्या प्रहरी झोपेतून उठल्यानंतर आपण जर कधी दूर असलेली वस्तू पाहिली तर आपल्या नाजूक डोळ्यांना त्याचा त्रास होतो व त्याच्या विपरीत परिणामाला आपल्याला सामोरे जावे लागते.त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी आपल्या दोन्ही तळ हातांचे दर्शन आपण घ्यायला हवे, असे आपल्या हिंदू संस्कृतीत तथा ज्योतीष शास्त्रात देखील याबाबत आवर्जून सांगण्यात आलेले आहे.

असे म्हणतात की, पैसे कमावण्यासाठी लोक खूप परिश्रम करतात. परंतु बर्‍याच वेळा यानंतरही त्यांना कधी कधी यश मिळत नाही. परंतु मित्रांनो, या अशा परिस्थितीत हिंदू धर्मशास्त्रांत काही खास उपाय सांगितले गेले आहेत, ज्याद्वारे आपण जीवनात यश आणि सं-पत्ती भरभराटी मिळवू शकतो.

मित्रांनो,आता तुम्ही असा विचार करत असाल की ते मंत्र आणि उपाय तुम्हाला कसे कळतील. मित्रांनो घाबरून जाऊ नका, आज आम्ही तुम्हाला या अशा खास मंत्राविषयी सांगणार आहोत की ज्या मंत्राचा रोज सकाळी उठल्यानंतर जाप केला तर आयुष्यभर तुम्हाला पैशांची कमतरता कधीच भासणार नाही.

मित्रांनो, मानवाच्या जीवनावर या चार पुरूषार्थांचा (धर्म, अर्थ, कर्म व मोक्ष) मोठा प्रभाव आहे. या पुरूषार्थांच्या प्राप्तीसाठी आपण रोजच सकाळी तळ हातांचे दर्शन घेऊन पुढील मंत्राचा एक वेळा जप केला पाहिजे.मंत्र –
” कराग्रे वसते लक्ष्मी:, करमध्ये सरस्वती।
करमूले तू गोविंद:, (ब्रम्हा प्रभाते कर दर्शनम्।।”

मित्रांनो, काही वेळेस आपण ‘गोविंद’ या ऐवजी ‘ब्रम्हा’ असाही उच्चार केलात तर अजुनही उत्तम आहे.या मंत्रोच्चारा साठी, झोपेतून उठताच आपल्या दोन्ही हातांच्या तळव्याकडे लक्ष द्या. कल्पना करा आणि देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि श्री हरी श्री विष्णूंच्या रूपात या सर्वोच्च शक्तींना स्मरुन विनंती करा. देवी लक्ष्मी संपत्ती देणाऱ्या आहेत. देवी सरस्वती या बुद्धी देणाऱ्या आहेत. आणि समृद्धी देणारे साक्षात भगवान विष्णू आहेत. देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि भगवान गोविंद (भगवान विष्णू) दिव्य अभिव्यक्ती प्रकट होण्याच्या तीन चरणांचे प्रतिनिधित्व करतात.

अर्थात – या श्लोकाचा अर्थ असा होतो की, तळ हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी विद्यादात्री देवी सरस्वती व मूळभागात (मनगटाची बाजू) साक्षात गोविंद म्हणजेच ब्रम्हांचे वास्तव्य असल्याने त्यांच्या दर्शनानेच आपण आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात करायला हवी.

या मंत्राचा इतिहास – देवऋषी व्यासांनी लिहिलेल्या विष्णू पुराणातील या मंत्राने सर्वप्रथम आपले दर्शन घडविले. हिंदू धर्मात, श्री हरी श्री विष्णू हे संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत. आपल्या या जगात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारे तेच आहे. आणि जग चालविण्यासाठी, ते त्यांच्या विविध रूपांमध्ये आणि अवतारांमध्ये या पृथ्वीतलावर त्यांचा आशिर्वाद असतो.

मित्रांनो, रोज सकाळी उठून या श्लोकाचा उच्चार केल्याने आपल्याला चांगल्या आणि उचित फळाची अपेक्षापूर्ती होते. या मंत्रोच्चाराद्वारे सकाळी उठल्यानंतर दिवसभरात आपल्या हातून एक शुध्द व सात्विक कार्य होण्यासाठी प्रेरणा मिळत असते. तसेच आपण कुणावरही विसंबून न राहता आपल्यामध्ये परिश्रम करून कर्म-फल-त्याग यांची भावना जागृत होत असते.

तसेच या मंत्राचा जाप करून झाल्यानंतर आपले दोन्ही तळ हात एकमेकांवर घासून आपल्या चेहर्‍यावर लावायला हवेत. मित्रांनो, असे केल्याने दिवसभरातील आपली सगळी जी पण कामं असतील ती शुभ होतात व कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत.हे लक्षात ठेवा की, सकाळी उठल्याबरोबरच या श्लोकाचा जप करावा, अन्यथा आपल्याला कोणताही लाभ मिळणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *