स्वामींनी दिला साक्षात्कार.!! एका भक्ताचा आलेला प्रत्यक्ष अनुभव.!!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो… आपल्यातील बरेच जण आपल्या घरांमध्ये स्वामी समर्थांची नित्य नियमाने पुजा अर्चा करत असतात त्यामधील काही जण आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांच्या प्रतिमेची स्थापना करून, त्यांच्या प्रतिमेला दररोज सकाळी अभिषेक व स्नान घालून विशेष पूजा करत असतात. पण मित्रांनो प्रत्येक स्वामी समर्थांच्या भक्तांची अशी इच्छा असते की मी करत असलेली स्वामी समर्थां पर्यंत पोहोचत आहे की नाही मला कळाले पाहिजे. स्वामी समर्थांनी मला साक्षात्कार दिला पाहिजे, अशी अनेक जणांची इच्छा असते.

स्वामी समर्थ ही आपल्या भक्तांना असे संकेत देत असतात. स्वामी समर्थांनी आपल्या भक्ताला दिलेला असाच एक अनुभव आज आपण पाहणार आहोत. हा अनुभव सांगताना स्वामी समर्थांची सेवेकरी आपल्याला सांगते की,

मी स्वामी समर्थांची सेवा दररोज नित्य नियमाने करत असते, परंतु माझे पती देवधर्म याच्यावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून मीही त्यांना जबरदस्ती करत नाही. कारण जबरदस्ती करून आपल्याला कोणताही देव पावत नाही. त्यामुळे आमच्या घरामध्ये मी एकटीच पूजाअर्चा अगदी मनापासून करत असते. असंच एकदा रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी स्वामी समर्थांची पूजा-अर्चा यांची आरती म्हणून स्वामी समर्थांना पांढऱ्या रंगाचे फूल वाहून माझी पूजा संपन्न केली.

त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या वेळी माझी मासिक पाळी झाली आणि त्यानंतर माझ्या घरांमध्ये पूजा-अर्चा झालीच नाही.पण चार दिवसानंतर ज्यावेळी मी देवघरामध्ये पूजा करण्यासाठी आवरून गेले त्यावेळी जे फूल मी स्वामी समर्थांना रविवारच्या दिवशी वाहले होते तेच फूल चार दिवसानंतर नंतरही तसंच्या तसं ताजंतवानं होत. त्यामुळे ते फुल बघितल्यानंतर अंगावर काटाच आला आणि मला कळालं की समर्थांनी दिलेला संकेत आहे की बाळा घाबरू नको मी सदैव तुझ्या सोबतच आहे.

जेव्हा आपण दररोज देवघरामध्ये पूजा करतो त्यावेळी दिवशी घडलेली फुले त्यामुळे ती काढून आपण नव्याने ताजी फुले देवांना वाहत असतो, परंतु मी माझ्या देवघरामध्ये स्वामी समर्थांना वाटलेले चार दिवसा अगोदरचे फुल तसेच्या तसे ताजेतवाने होते. यावरूनच नाही कळाले की मी स्वामी समर्थांची जी पूजा करत असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचते.

मित्रांनो स्वामी समर्थांच्या सेवेकरीने सांगितलेला तिचा हा अनुभव आपला स्वामी समर्थां वरचा विश्वास अधिक दृढ करणारा आहे आणि त्याचबरोबर असेही निष्पन्न होते की स्वामी समर्थ कायमच आपल्या फक्त त्यांच्या पाठीशी उभे असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *