नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण जेव्हा देवाच्या पाया पडतो तेव्हा आपण हाथ जोडून नमस्कार करतो. परंतु मित्रांनो, स्वामी महाराज असे एक देव आहेत त्यांना आपण मुजरा करतो असे का..? तर मित्रांनो स्वामी महाराजांना मुजरा का करावा लागतो ते आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, जेव्हा तुम्ही केंद्र, मठ किंवा आपल्या स्वतःच्या घरी आपण स्वामींना मुजराच करत असतो. तर मित्रांनो स्वामींना मुजरा करणे म्हणजे स्वामींना नमस्कार करणे होय. मित्रांनो, एकदा सद्गुरु परमपूज्य मोरे दादांनी सांगितले होते. आपल्या हिंदू धर्मात देवांचेही चार गट आहेत अ ब क ड तर आपले स्वामी महाराज हे अ गटातील देव आहेतं म्हणजेच प्रत्यक्ष परब्रम्ह स्वरूप आहेत स्वयं जागृत आहेत.

ते आपल्या सर्व भक्तांना आजदेखील दर्शन देतात तसेच त्यांच्या भक्तांनी त्यांना सर्वस्वी अधिष्ठान मानले आहे. ते या कलियुगाचे चालक, मालक आणि पालक देखील आहेत. वतासेच ते योगीराज आहेत जेव्हा तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा करून केंद्रात येतात तेव्हा तुम्ही शुध्द मनाने येतात. हात जोडणे किंवा मुजरा करणे दोन्ही योग्यच आहेत परंतु स्वामी हे राजाधिराज योगीराज आहेत.

त्यामुळे राजांना हाथ जोडणे उद्धटपणाचे लक्षण समजले जाईल म्हणून महाराजांना मुजरा करून 3 वेळा नाक घासावे. नाक घासणे म्हणजे पूर्णपणे परब्रम्हला शरण जाणे होय. त्यामुळे नाक घासून त्रिवार मुजरा करून स्वामींची कृपा आपल्यावर करून घ्यावी. तर मित्रांनो हा उद्देश असतो नाक घासून मुजरा करण्याचा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *