गृह लक्ष्मीने सकाळी उठल्यानंतर स्नान आटोपून हा एक उपाय नक्की करावा घरात पैशाची तंगी कधीच जाणवणार नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि सोबतच माता अन्नपूर्णेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या स्वयंपाक घरात जो गॅस असतो किंवा चूल असेल,

स्टो असेल या वस्तूना स्पर्श करून हा एक मंत्र गृह लक्ष्मीने नक्की बोलावा माता लक्ष्मी प्रसन्न होते अन्नपूर्णा माताच्या कृपा आशीर्वादाने घराची भरभराट होऊ लागते. हा मंत्र नक्की कोणता आहे आणि तो मंत्र बोलण्यापूर्वी कोणती विधी आहे हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

गृह लक्ष्मीने सकाळी लवकर उठून स्नान आटोपून आपल्या स्वयंपाक घरात जावं आणि एक दिवा प्रज्वलित करावा. तेलाचा किंवा तुपाचा असेल तरी चालेल. हा दिवा आपण जिथे गॅस, चूल, स्टो असेल त्या शेजारी हा दिवा ठेवायचा आहे. व गॅसच्या शेगडीवर किंवा चूल, स्टोवर चिमूटभर हळद शिंपडायची आहे आणि त्यानंतर या गॅस स्टोवर आपले दोन्ही हात ठेऊन हा मंत्र बोलायचा आहे.

हा मंत्र असा आहे देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम् रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. हा मंत्र कमीत कमी 3 वेळेस 7 वेळेस किंवा 9 वेळेस बोला. किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर रोज नित्य नेमाने एक वेळेस पण म्हटलात तर यामुळे अत्यंत शुभ फळे प्राप्त होतात व माता अन्नपूर्णेचा कृपा आशीर्वाद मिळतो.

हा उपाय तुम्ही नक्की कराच मात्र रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपल्या स्वयंपाक घरात खरकटी भांडी कधीही ठेऊ नका. तसेच आपली गॅस शेगडी व्यवस्थित पुसून ठेवा त्यावर कुठेही घाण नसेल याची काळजी घ्या. आपले स्वयंपाक घर स्वच्छ असायला हवं याची काळजी घ्या म्हणजे वास्तूदोष निर्माण होत नाही.

तसेच झोपण्यापूर्वी गॅस शेगडीवर दुधाचे 2 ते 4 थेंब शिंपडायला विसरू नका असे केल्याने घरातील सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात स्वयंपाक घरातील दोष नाहीसे होऊन घरात भरभराट होऊ लागते. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *