नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! सगळं काही असूनही समाधान मिळत नाही. नोकरीत चांगलं काम केलं तरी प्रमोशन होत नाही. कर्जाचा वाढतोय डोंगर, मुलांच्या भविष्याची चिंता पाठ सोडत नाही. असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. त्या प्रत्येक प्रश्नाचं राशी अनुसार तुम्हाला उत्तर मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणता उपाय फलदायी आहे? चला तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.
मेष राशीने तब्येतीची काळजी घ्यावी
आज तुम्ही व्यस्त राहणार आहात त्यामुळे कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही, यामुळे तुम्हाला कुठेतरी ती खंत मनात बोचत राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभाग घ्याल, तुमची आध्यात्मकी गोष्टीमधील रुची अधीक वाढेल.आज थोडा खर्च जास्त होणार आहे. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.अगदी छोटासा त्रास झाला तरी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.जुन्या मित्रांच्या भेटी होतील त्यामुळे मन प्रसन्न राहीलं.
आज ७८% नशीब तुमच्या बाजूने असेल. माता पार्वतीची पूजा करावी.

वृषभ राशीने सध्या गुंतवणूक करु नये
मुलाच्या शिक्षणाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचा मूड चांगला असेल. संध्याकाळी कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून काही त्रासदायक बातमी तुम्हाला समजेल त्यामुळे तुम्हाला ताण जाणवेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण आज गुंतवणूक केली तर फार फायदा होणार नाही. जुन्या मित्रांसोबत भेटी होतील त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल.
आज नशीब ६२% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या नामाचा १०८ वेळा जप करा.

मिथुन राशीने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे
आज तुम्ही आनंदी असणार आहात कारण तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठा नफा होईल, पण प्रचंड नफा मिळाल्यामुळे उन्मत्त होवून इतरांशी बोलू नका त्याचा पुढे जावून तुम्हाला त्रास होईल. आज कोणाबरोबर बोलताना खूप विचार करुन बोला कारण तुमचे खडे बोल समोरच्याचे मन दुखावू शकता. सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर सावध राहा कारण तुमची एखादी आवडती गोष्ट किंवा मौल्यवान वस्तू गमावण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे तेव्हा आज सावधपणे रहावे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणाला दान करा.

कर्क राशीसाठी कामात अडचण, सावध राहा
आज दिवसाची सुरुवात निराशेने होणार आहे.कायदेशीर प्रकरणात आज निर्णय काही होणार नाही उलट काही काळासाठी ते प्रकरण पुढे ढकललं जाईल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी ही काही अडचणींना सामोरे जावे लागेल, कारण तुमचे शत्रू तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, तेव्हा सावध राहा.
विद्यार्थ्यांना मनासारखा निकाल मिळाल्याने आनंद होईल. आज संध्याकाळी एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊन खास विषयावर चर्चा करु शकता.
आज नशीब तुमच्या बाजूने ८१ % राहील. भुकेल्या लोकांना जेवू घाला.

सिंह राशीची रखडलेली कामे पूर्ण होतील
तुमचे एखादे काम रखडलेले असेल जर कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या मदतीने ते पूर्ण होणार आहे, त्यामुळे तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे तुम्हाला जॉब ऑफर येतील. तसेच आज आर्थिक स्थिती मजबूत
असणार आहे. लवलाइफ आनंदी वातावरण आहे. जर तुम्ही कोणाशी पैशांचा व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा, अन्यथा तुम्हाला त्यात नुकसान सहन करावे लागू शकते. आज सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होताना दिसतोय. तुम्ही आज कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर अचानक गाडी बिघडल्याने तुमचा आर्थिक खर्चही वाढू शकतो.
आज नशीब ८६% तुमच्या बाजूने असेल. चंदनाचे तिलक लावा.

कन्या राशीने तब्येतीची काळजी घ्यावी
आजचा दिवस खास काहीतरी करण्यात तुम्ही व्यस्त असाल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाशी संबंधीत नवनवीन गोष्टी तुम्हाला समजतील. वातावरण बदलामुळे होणाऱ्या आजाराचा तुम्हाला त्रास होईल. संध्याकाळी थकवा, डोकेदुखी, ताप अशा काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
आज नशीब ८८ % तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी कपडे दान करा.

तुळ राशीची आर्थिक स्थिती मजबूत असणार
तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत तसेत तुम्हाला चांगलाच फायदा मिळणार आहे.तुमच्या कुटुंबातील किंवा नोकरीतील कोणत्याही अधिकाऱ्याशी वाद झाला असेल, तरी तुमच्या बोलण्यात कटूता नसावी, लक्षात ठेवा गोड बोला त्यात तुमचा फायदा आहे. कडवटापणा ठेवला तर नाते बिघडू शकते आणि दुभंगलेली कोणतीही गोष्ट पु्हा एकसंघ करणं कठीण जातं. जे लोकं विवाह इच्छुक आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
आज ७९ % नशीब तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करावे.

वृश्चिक राशीची जुन्या वादातून सुटका होणार
काही जुन्या वादातून आज तुम्हाला सुटका मिळेल. नोकरीत तुमच्या कोणत्याही सहकाऱ्यासोबत वाद होत असेल तर तो आज संपेल, पण आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. पण जर तुम्ही असे काही केले नाही तर यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. संध्याकाळी तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी छोटी पार्टी देखील आयोजित करू शकता.
आज ९३ % नशीब तुमच्या पाठीशी असेल. दररोज संकटनाशन गणेश स्तोत्र पठण करा.

धनु राशीच्या कामात अडथळे येण्याची शक्यता
तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी असे काही लोक आहेत, जे तुमच्या तोंडावर छान बोलतात पण मनातून तुमचा द्वेष करतात. त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. ते लोक कोण आहेत ते ओळखा कारण तुमच्या कामात ते अडथळे निर्माण करू शकतात. तुम्ही एखाद्या मैत्रीणीला पैसे उधार दिले तर ते पुन्हा परत मिळतील की नाही याबद्दल शंका आहे, त्यामुळे विचार करुनच कृती कराल. सासरकडून तुम्हाला मान-सन्मान मिळणार आहे. मुलांच्या अभ्यासासंदर्भात चांगली बातमी मिळेल त्यामुळे तुम्ही आनंदी असाल.
आज नशीब ८४ % तुमच्या बाजूने असेल. रोज रात्री काळ्या श्वानाला शेवटची भाकरी किंवा पोळी खायला द्या.

मकर राशीसाठी आज शुभ दिवस
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे तुम्हाला एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या मिळत राहतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. आज तुम्ही तुमच्या कोणत्याही विरोधकांमुळे अडचणीत आलात तरी बोलण्यात कटूता ठेवू नका, अन्यथा विरोधक तुमच्याविरोधात नवी योजना आखू शकतात. आजची संध्याकाळ आई-वडिलांच्या सेवेत व्यतीत कराल.
आज ६९ % नशीब तुमच्या बाजूने असेल. दररोज सकाळी तांब्याच्या भांडण्यातून सूर्याला अर्घ्य द्यावे.

कुंभ राशीसाठी दिवस लाभदायक
कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती राजकारणात आहेत त्यांना आज नवीन संधी मिळतील. जनतेसमोर जावून भाषण करण्याची संधी मिळेल. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा आणि जनतेचा आर्शिवाद तुमच्यासोबत आहे. आज एखाद्या जवळच्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आज जवळच्या किंवा दूरच्या सहलीला जाण्याचा बेत आखत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारकडून तुमचा सत्कार ही होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता.
आज ७२ % नशीब तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा.

मीन राशीची जुन्या वादातून सुटका
आज तुम्हाला जुन्या भांडणांपासून आणि त्रासांपासून तुमची सुटका होणार आहे. तुम्ही कोणाकडून काही पैसे उधार घेतले असतील तर, आज तुम्ही त्याची परतफेड करू शकता. यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून एखादी भेट वस्तू दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचा विचार कराल, परंतु अधिकाऱ्यांमुळे तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकणार नाही. विद्यार्थ्यांना आज आर्थिक चणचणीचा सामना करावा लागेल. नोकरीशी संबंधित नवीन काम तुम्हाला मिळणार आहे, मेहनतीने ते काम पूर्ण करा त्याचा भविष्यात फायदा होईल.
आज नशीब ६६ % तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायाम करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *