शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी चित्रा नक्षत्रासह शोभन योगाचा शुभ संयोग होत असल्यामुळे शुक्र तुळ राशीत राहून मालव्य राजयोग तयार होतो आहे.ग्रहांची ही शुभ स्थिती मेष आणि तुळ राशीसह 5 राशीच्या लोकांना जबरदस्त आर्थिक लाभ मिळवून देईल. पैसा आणि मानसन्मान मिळेलच त्याचबरोबर रखडलेली कामे पूर्ण होतील. पाहूया शुक्रवारचे आर्थिक राशीभविष्य

भारताच्या विकासामध्ये अ‍ॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड कशा पद्धतीने भर घालत आहे याचे डिकोडिंग
मेष राशीसाठी शुभ दिवस
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असून तुमची रखडलेली कोणतीही कामे आज पूर्ण होऊ शकते. आज तुम्हाला मुलाच्या करिअरबद्दल थोडी धावपळ करावी लागू शकते. सायंकाळचा वेळ कुटुंबीय आणि मित्रांसोबत चांगला जाईल. संध्याकाळी ग्रहांची युती तुमच्यासाठी शुभ राहील आणि कामे पूर्ण होतील. नातेसंबंधांचा फायदा होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

वृषभ राशीसाठी दिवस आनंदाचा
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदात आणि शांततेत जाणार असून तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. तुमच्या कोणच्या कामात सरकारी मदतीची गरज असेल तर तुम्हाल ती मिळेल. तुम्हाला एखाद्याच्या भागीदारीत व्यवसाय केल्याने फायदा होईल आणि तुमच्या रखडलेल्या योजना देखील पूर्ण होतील. नवीन करारांचा फायदा होईल आणि तुम्ही
नवीन व्यवसायाचा श्रीगणेशा करु शकता. जे लोक तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्यांना पाहिल्यावर तुमचा राग अनावर होतो तेच तुमच्या समोर येतील. त्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल.

मिथुन राशीने आर्थिक बाबतीत सावध रहा
मिथुन राशीच्या लोकांनी आज आर्थिक बाबतीत जरा सावधान रहायला हवे.एखादी वस्तू चोरीला जाऊ शकते किंवा आपले नुकसान होऊ शकते. कुणाशी वाद घालू नका. मुलांच्या शिक्षणा संदर्भात किंवा स्पर्धा परिक्षेत अनपेक्षित यश मिळाल्याची बातमी मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांसमवेत कुठेतरी जावेसे वाटेल. शुभ कार्यात सहभागी होण्याचे भाग्य प्राप्त होईल.

कर्क राशीला अचानक होणार धनलाभ
कर्क राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची साथ मिळणार आहे. तसेच अचानक धनलाभ होणार आहे. ऑफिसमधील सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल त्यामुळे तुमची कामे पटापट पूर्ण होतील. आज तुमची मान-प्रतिष्ठा वाढणार आहे.अचानक सहलीला जाण्याचा प्लॅन बनेल आणि त्या प्रवासात तुम्हाला खूप आनंद मिळेल. आज आवडत्या व्यक्तींना भेटून मन प्रसन्न राहील.

सिंह राशीला नशिबाची साथ
सिंह राशीच्या लोकांना नशिबाची चांगलीच साथ असून,आज उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. मित्रांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि तुमच्या योजना पूर्ण होतील. बोलण्यातील सौम्यता तुम्हाला मान-सन्मान मिळवून देणार आहे त्यामुळे आपली वाणी मधुर ठेवा.शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात कार्य करत असाल तर फायदा तुमचाच आहे. तुम्हाला आज जरा जास्तच धावपळ करावी लागू शकते, त्यामुळे फार काम करावे असे वाटणार नाही.

कन्या राशीची रखडलेली कामे पूर्ण होणार
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक असून तुमची रखडलेली कामे पुर्णत्वास जाणार आहेत. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील आणि तुमची संपत्ती वाढणार आहे. आज मुलांच्या कामगिरीमुळे तुम्ही समाधानी असाल आणि त्यांच्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. दुपारनंतर कोणत्याही कायदेशीर वादात किंवा खटल्यांमध्ये तुम्ही विजयी होणार आहात. आज चांगल्या कामासाठी तुम्ही खर्च करणार असून तुमचा मान-सन्मान वाढणार आहे.

तुळ राशीसाठी आनंदाचे वातावरण
तुळ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस असून तुमच्या आजूबाजूला आनंदाचे वातावरण असेल. पैशासंदर्भात किंवा आर्थिक बाजू भरभक्कम करण्यात तुम्ही काही योजना आखल्या असतील तर त्या पूर्ण होणार आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांचा आनंद द्विगुणीत होणार असून अनेक दिवसांपासून सुरू असलेली पैशांची कमतरता दूर होईल. हातात पुरेसे पैसे मिळाल्याचा आनंद मिळेल. आज तुमचे विरोधक तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन रद्द होऊ शकतो.

वृश्चिक राशीसाठी गुंतवणूक ठरेल फायदेशीर
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा दिवस असून तुम्हाला पैशाच्या गुंतवणुकीत भरपूर फायदा होईल. व्यापाऱ्यांना कमाईच्या भरपूर संधी मिळतील आणि नवीन योजनांमध्ये यश मिळेल. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आजारपणामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल.

धनु राशीचा मान-सन्मान वाढणार
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वात खास असून तुम्ही काही नवीन काम करण्याची योजना आखू शकता, त्यात तुमचा भरघोस फायदा होणार आहे. तसेच तुमचा मान-सन्मान वाढेल. सासरच्या मंडळींकडून तुम्हा रोख स्वरुपात काही रक्कम मिळेल. संध्याकाळी एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहकार्य कराल तसेच आर्थिक स्वरुपात देणगी देखील द्याल.

मकर राशीने वादविवाद टाळावेत
मकर राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल तसेच तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळेल. नवीन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही यश मिळेल. ऑफिसमधील कर्मचारी सहकार्य करतील तसेच तुमची कामे पटापट झाल्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. संध्याकाळी कोणत्याही प्रकारच्या भांडणात आणि वादात पडू नका. रात्री अचानक घरी पाहुणे आल्यामुळे तुमची कामं आणि खर्च दोन्ही वाढतील.

कुंभ राशीसाठी अडचणीचा दिवस
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या बाबतीत अडचणींचा असू शकतो आणि
धन प्राप्तीच्या मार्गात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही अपार कष्ट आणि बुद्धीमत्तेने केलेल्या कामाचे आज नुकसान होणार आहे पण त्यामुळे तुम्ही खचून जावू नका. कोणती तरी वाईट बातमी कानावर येईल आणि तुम्हाला अचानक परगावी जावे लागेल. आजच्या दिवसात सावध राहा आणि कोणाशीही वाद घालू नका.

मीन राशीला मेहनतीचे फळ मिळणार
मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा दिवस असून आजचा दिवस काही कामानिमित्त धावपळ करण्यात व्यतीत होईल. तुमची मेहनत यशस्वी होईल आणि पैसे कमावण्याच्या मार्गात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या अडचणींवर तुम्ही मात करु शकाल. आज पैशांचा व्यवहार करू नका, अन्यथा तुमचे संबंध बिघडू शकतात. प्रवास आणि धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. प्रवासात सावधानता बाळगा. मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ शकते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *