नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि तुम्ही तुमची पत्रिका नक्कीच पाहिली असेल. त्यावर तुमचा गण लिहलेला असतो. गणाचे तीन प्रकार पडतात राक्षस गण, देव गण आणि मनुष्य गण आणि या गणा नुसार माणसाचा स्वभाव असतो असं म्हटलं जातं. पण मग कोणत्या गणाच्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते आज आपण जाणून घेणार आहे. तर चला पाहू कोणत्या गणाचा स्वभाव कसा असतो.

देव गण – देव गणाच्या व्यक्ती, स्वभावताच उदार असतात. बु’द्धि मान आणि श्रेष्ठ, उच्च विचार असणारे असतात. चेहरा सुंदर आकर्षक असतो व स्वभाव सादा सरळ असतो. यांच्या मध्ये दया, प्रेम, सहानुभूती आणि परोप काराची भावना असते. सात्विक गुण या व्यक्तींमध्ये जास्त असतात.

तसेच गरजू दुःखी माणसांना सहायता करण्यासाठी कधीही हे व्यक्ती पुढे असतात. सत्यासाठी लढणारा असा यांचा स्वभाव असतो आणि धन धर्म करणे यांच्या स्वभावात यांच्या मुळातच असतं.

मनुष्य गण – मनुष्य गण असणाऱ्या व्यक्ती, या स्वभावाने मानी व दृढनिश्‍चयी आणि जनसमुदायला आपल करणाऱ्या सुखी जीवनासाठी व संसारासाठी सतत धडपड करणारे असतात. मनुष्य गणाच्या व्यक्तींमध्ये रजोगुण जास्त असतात रजोगुण जास्त असणे म्हणजे अर्थातच भौतिकवादी असणे.

तसेच या व्यक्तींमध्ये राक्षस गण आणि देव गण या दोन्ही मधले थोडे-थोडे गुण असतात. व्यवहार कुशल असतात आणि काळ बघून वागणारे असतात.

राक्षस गण – राक्षस गण असणाऱ्या व्यक्ती अगदी नावा प्रमाणे राक्षस असतात असे नाही. पण हो तमोगुणी नक्कीच असतात तमोगुणा मध्ये ते थोडे अहंकारी, शी’घ्र कोपी, चिडखोर किंवा भांडखोर, हट्टी आशा सुद्धा असतात. सर्व प्रकारचे भो ग भो-गण्यासाठी यांची इच्छा असते. यांच्यामध्ये काही विशिष्ट नैसर्गिक गुण असल्याच सुद्धा आढळून येतं.

यांना वातावरणात एखादी नकारात्मक शक्ती असेल तर त्याची जाणीव फार पटकन होते. अदृश्य शक्तीचा अभाव सुद्धा या व्यक्तींना होतो. गंध, आवाज, चव, वास या सर्वांची याला प्रखर जाणीव होते. आणि त्यामुळे आत्म्यांचे दर्शन घडते. तसेच अमानवीय गोष्टी दिसणं यांच्या बाबतीत घडू शकत.

परंतु या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास प्रबळ असतो कोणत्याही परिस्थितीत ते डगमगत नाहीत. अतिशय हिमतीने तोंड देत राहतात. मग मंडळी तुमचा कोणता गण काय आहे आणि या बाबतीतला तुमचं अनुभव काय आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *