नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे कितीतरी मंत्र सांगितले आहेत की, ज्या मंत्रां मध्ये ग्रह, नक्षत्रे, तारे, देवी-देवता या सर्वांचा समावेश होत असतो. या सर्व मंत्रांमध्ये भगवंतांच्या रचनेबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. आपल्या प्राचीन वेद पुराणातील मंत्रांमध्ये इतकी शक्ती आहे की, ते आपले जीवन बदलू शकतात. ज्या वेळी आपण या मंत्राचे उच्चारण करतो. त्या वेळी आपल्या आजूबाजूचे परिसर प्रसन्नमय होते.

आपल्या मनाला शांतता लागते. याबरोबरच आपल्यामध्ये व आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच आज आपण या लेखामध्ये असे काही मंत्र जाणून घेणार आहोत की, या मंत्राचे उच्चारण केल्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर तर पडतोच व आपल्यावर जे काही संकट आले असतील, जे काही आर्थिक संकटे आली असतील ती सर्व दूर होऊन आपली गरिबी नष्ट होऊन श्रीमंती येते. आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी व शांतता येते.

सकाळी उठल्यावर आपल्या तळहाताचे दर्शन घेऊन “कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम्” या मंत्राचा उच्चार करावा. यामुळे आपला दिवसाची सुरुवात चांगली होईल व आपला पूर्ण संपूर्ण दिवसही चांगला जाईल आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर ही नक्कीच होईल.

“त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वम् मम देव देव” या उद्योगाचे उच्चारण भगवंताची पूजा करत असताना त्यांचे आभार करण्यासाठी करावा. “ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो नाह प्रचोदयात” या गायत्री मंत्र आपण केव्हाही करू शकतो. हा मंत्र सर्वात श्रेष्ठ मानला जातो.

या मंत्राचा जप जरा पण सूर्योदय होण्यापूर्वी म्हणजेच सकाळच्या वेळेस पाच मिनिट, दुपारच्या वेळेस पाच मिनिट आणि संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस पाच मिनिट उच्चारण केले अशा प्रकारे केला तर आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येईल घरात सुख शांती येईल.

“सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते” “या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः” हा मंत्र देवीचा असून या मंत्रामुळे देखील आपल्या सकारात्मकता मिळते. घरात मधील सुख शांती व समृद्धी येते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *