मित्रांनो हिंदू धर्म हा जगातील धर्माणपैकी एक सर्व श्रेष्ठ धर्म आहे.आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या परंपराचे पालण करतो.त्यापैकी चरण स्पर्श हि एक महत्वाची परंपरा आहे चरणस्पर्श आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचे आपण पाया पडतो म्हणजेच चरण स्पर्श करतो म्हणजे ती व्यक्तीं आपणास आशीर्वाद देते.

मात्र ३ व्यक्तीं अश्या आहेत ज्यांच्या आपण चुकूनही पाया पडू नये कारण या व्यक्तींनमुळे आपणास भविष्यात मोठ्या संकटांना सामोरे जाव लागत गंभीर परिणाम भोगावे लागतात.त्यापूर्वी आपल्या हिंदू धर्मात चरण स्पर्श का करावे पाया का पडावे यामागचे कारण काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

मित्रांनो जेव्हा आपण आपल्या आईवडिलांच्या, आजी आजोबांच्या, संत महात्म्यांच्या पाया पडतो तेव्हा आपले हात हे त्यांच्या चरणांना स्पर्श करत असतात आणि त्यांचे आत हे आपल्या डोक्यावर किंवा पाठीवर खांद्यावर स्पर्श करत असतात.यावेळी त्यांच्या या क्रियेद्वारे या संत महात्म्याच्या आपल्या आईवडिलांच्या शरीरातील आपल्या प्रती असलेले मनातील भाव सकारात्मक ऊर्जा,वात्सल्य प्रेम हे आपल्या मध्ये प्रवाह करत असतात.

याच कारणाने आपण आपल्या जीवनात प्रगती करत असतो.याच आशीर्वादाने आपल्या कामात यश येते.म्हणूनच आपली जी थोर महान परंपरा आहे या मध्ये आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचे पाया पडायला सांगितले आहे.मित्रांनो तुम्हाला माहित असेल कि श्री कुर्श्नाने सुद्धा आपल्यापेक्षा मोठा असलेला मित्र सुदामा याचे पाया पडले होते.तसेच आज सुधा नवरात्रीत मध्ये

आपण कन्यापूजन करतो आणि यावेळी तिचे चरण धुतले जाते तिची पूजा केली जाते आणि मग त्यांचे चरण स्पर्श केले जाते.मित्रांनो असे केल्याने नवदुर्गांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते असे हिंदू धर्मात सांगितले आहे. मित्रांनो आता आपण त्या ३ लोकांबद्दल जाणून घेऊ ज्यांच्या आपण चुकूनही पाया पडू नये.

एक म्हणजे आपला शत्रू मित्रांनो आजच्या कलयुगामध्ये सर्वच लोक चांगले नसतात.यामध्ये तुमचे कोणीना कोणी शत्रू नक्की असतात. जे लोक तुमचे शत्रू आहेत त्यांना तुमची प्रगती कधीच बगवली जात नाही आणि अश्यामुळे त्यांच्या मनातील असलेले नकारात्मक भाव हे त्यांच्या आशीर्वादाने आपल्यामध्ये येतात यामुळे अश्या लोकांच्या पाया पडू नये आणि हि लोक तुम्हाला ओळखता आली पाहिजे.

दुसरे म्हणजे अधर्मी,चरित्र-हीन आणि पापी लोग जे लोक अधर्मी असतात आणि जी लोक वाईट कामाद्वारे पैसा कमवतात अश्या लोकांच्या हि कधीच पाया पडू नये.यामुळे तुम्ही अधर्मी होऊ शकता अनैतिक मार्गाला लागू शकता.तुमच्यातील धर्म नष्ट होतो.

तिसरे म्हणजे अनोळखी लोक ज्या लोकांबद्दल आपल्याला पुरेपूर माहिती नसते अश्या लोकांच्या आपण कधीच पाया पडू नये.यामुळे त्यांच्या आशीर्वादाने कोणती ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाह करते हे सांगता येत नाही म्हणून अनोळखी लोकांच्या कधीही पाया पडू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *