नमस्कार मित्रांनो,

देवपूजा करताना फुले वाहने हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. फुले वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेच संपुर्ण फळ आपल्याला प्राप्त होत. मात्र फुले वाहताना काही गोष्टींची काळजी ही घ्यायलाच हवी. अन्यथा आपल्या माथी अनेक दोष लागू शकतात आणि मग आपल्या जीवनात अनेक संकटे, समस्या उभ्या राहतात. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही.

मात्र जाणून घेऊ या हिंदू धर्म शास्त्र देवी देवतांना फुले वाहण्याच्या बाबतीत नक्की काय सांगत. चला तर जाणून घेऊ या. देवी देवतांना फुले वाहावीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत. मातीत पडलेली किंवा खराब झलेली फुले चुकूनही देवी देवतांना अर्पण करू नये. सुखलेली किंवा आधीच वास घेतलेली तसेच कीड लागलेली फुले सुद्धा अपवित्र मानली जातात.

एखाद्याच्या घरून चोरून आणलेली किंवा शिळी झालेली तसेच आपल्या शरीराला स्पर्श लागून घाम लागलेली व एखाद्याला न विचारता आणलेली फुले सुद्धा देवी देवतांना वाहू नयेत अशी फुले अपवित्र असतात. एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुले सुद्धा आपण देवी देवतांना वाहू नयेत.

फुले नेहमी उजव्या हातानीच तोडावीत आणि ती देवी देवतांना वाहताना सुद्धा उजव्याच होताचा वापर करावा. फुले कधीही रुईच्या पानात किंवा एरंडीच्या पानात गुंडाळून अनु नयेत अशी फुले वर्ज मानलेली आहेत. विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट फुले हे त्यांना वर्ज असतात ती त्यांना चुकूनही वाहू नयेत.

जसे: भगवान विष्णूंना तुळशीचे पान, कमळ अतिप्रिय आहेत. मात्र मंदार, रुई, धोत्रा, गोकर्ण, बेलाचे पान, कण्हेरी हे भगवान विष्णूंना चुकूनही वाहू नयेत. तसेच भगवान शिव शंकरांना रुई, कण्हेरी, बेलाचे पान अतिशय प्रिय आहेत. मात्र कुंद, मालती, तांबडी कण्हेरी, केवडा, लाल जास्वंद, गुलाब, कुडा, तुळस ही फुले शिव शंकरांना अर्पण करू नयेत.

कुंद पुष्प ही फक्त माघ महिन्यातच वाहिली जातात. जर तुम्ही देवीची पूजा करत आहात. तर देवीला सोन चाफा, कमळ किंवा लाल फुले नक्की अर्पण करावीत याने देवी प्रसन्न होते. जर तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरात जात असाल तर तिथे देवीची ओटी नक्की भरा. सूर्य देवाला दवणा, तगर, मंदार व लाल फुले, रक्तचंदन आणि जल फार प्रिय आहे.

गणपती बाप्पांना मंदार, दुर्वा, शमीपत्र, जस्वानंद , सिंदूर, र क्त चंदन हे अति प्रिय आहेत. जर तुम्ही बेलाचे पान वाहताना बेलाचे पान पालथं घालावं. दुर्वा वाहताना दुर्वाच्या शेंड्या आपल्याकडे ठेवून वाहायचं आहे. लाखोली फुल वाहताना आपण एक एक फुल, पाने वाहावीत.
कोणत्याही देवी देवतांना फुले वाहताना त्या देवी देवतांचे नाव घेऊन शेवटी नमः म्हणण्याची प्रथा आहे.

जसे: ॐ विष्णवे नमः बेलाची पाने पाण्यात घालून कधीच वाहू नये ती कोरडीच वाहावीत. बेलाचे पान फाटलेली नसावीत तसेच धूळ बसलेली नसावीत. फुले, पाने वाहताना नेहमी उजव्या हाताने तर वाहायचे आहेत मात्र उजव्या हाताचा मधला बोट, अनामिक व अंगठा या 3 बोटात धरूनच फुले, पाने वाहायचे आहेत. तर तुम्ही देवपूजा करताना या नियमांचे पालन नक्की करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *