महाभारत युद्धाच्या वेळी अनेक लोक या युद्धामध्ये सहभागी झाले नव्हते. त्यापैकी एक होता भगवान श्रीकृष्णाचा भाऊ बलराम, बलराम हा खूप बलवान आणि ताकदवान होता. त्याने अनेक युद्धे लढली होती. पण महाभारताच्या यु द्धात सामील न होण्याची अनेक कारणे होती. चला जाणून घेऊया इतका शक्तीशाली असून देखील बलराम महाभारताच्या युद्धात का उतरला नाही..काय होते यामगील रहस्य…

श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आणि बलराम हा शेषनागाचा अवतार मानला जातो. असे म्हणतात की, जेव्हा कंसाने देवकी-वासुदेवाचे एका मागे एक असे सहा मुलांना मारल्यानंतर, शेषनाग हे बलरामच्या रूपात देवकीच्या गर्भामध्ये आले होते . आणि बलरामच्या जन्माच्या काही काळापूर्वी, देवकी आणि वासुदेवांना भेटण्यासाठी वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणी कंसाच्या काराग्रहमध्ये आली होती.

आणि तिने तिथे तिच्या योग शक्तीने बलरामाला देवकीच्या गर्भातून स्वतःच्या गर्भाशयात घेऊन या बालकाला म्हणजेच बलरामला कंसपासून वाचवले होते. बलराम हा एका गर्भाशयातून दुसऱ्या गर्भाशयात गेले होते, म्हणून त्याला संकर्षण असेही म्हणतात.बलराम यांचा विवाह रेवतीशी झाला होता.बलाढ्य लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याला बलभद्र असेही म्हटले जाते.

श्रीकृष्ण हे त्यांच्या स्मित हास्यसाठी आणि शांत स्वभावसाठी ओळखले जातात, तर बलराम हे ना’ग राजवंशाचे होते, त्यामुळे बलरामाचा स्वभाव रागीट आणि क्रोधीत होता. कारण क्रोधीत आणि रागीट स्वभावासाठी नाग राजवंश ओळखले जातात. बलरामाच्या ताक’दीची जाणीव जरासंधला होती,म्हणून जरासंधाने बलरामला त्याचा योग्य विरोधक मानले होते.

दुसरे कोणालाही विरोधक मानले नव्हते. जरासंधाला असे वाटले की बलराम हे त्यांचे एकमेव प्रतिस्पर्धी आहेत. जर भीमकडून जरासंधाचा वध करण्याची रणनीती श्रीकृष्णाने आखली नसती, तर बलरामाने जरासंधाचा वध केला असता.

देशातील सर्व लहान मोठे राजे-महाराजे महाभारताच्या या युद्धात सहभागी झाले होते. जिथे एका बाजूला ११ अश्वरोहिणी सैन्य होते. त्याच वेळी, दुसऱ्या बाजूला ८ अश्वसेना होती. कौरवांकडे ११ अश्वरोहिणी आणि श्रीकृष्णाच्या नारायणी सेना होती. आणि पांडवांकडे फक्त शस्त्राशिवाय श्रीकृष्ण आणि ८ अश्वसेना होती.

परंतु अशा परिस्थितीतही, जेव्हा श्रीकृष्ण शस्त्राशिवाय पांडवांसोबत होते, तेव्हा बलरामांनी युद्ध न करण्याचे व्रत घेतले आणि तीर्थयात्रेला गेले. भगवान श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम याने श्रीकृष्णाला अनेक वेळा समजावून सांगितले की’ आपण युद्धात सामील होऊ नये, कारण दुर्योधन आणि अर्जुन दोघेही आपले मित्र तसेच नातेवाईक आहेत. आणि एका पक्षाची बाजू घेणे म्हणजे दुसऱ्या पक्षावर अन्याय करणे.

दोन्ही पक्ष अधर्म करीत आहेत आणि,आपण जर या युद्धामध्ये सामील झालो तर ते देखील अधर्म होईल. बलरामने दुर्योधनाला वचन दिले होते की मी आणि श्रीकृष्ण युद्धात शस्त्र घेणार नाही, असे म्हटले जाते, की कधीकधी प्रत्येक मानवाला धर्माच्या संकटासारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. अशा प्रसंगी लोक दुविधेत अडकतात, परंतु श्रीकृष्णाला कोणत्याही प्रकारची कोंडी नव्हती.

त्याने ही समस्याही सोडवली. त्याने दुर्योधनाला सांगितले होते की,तू माझी किंवा माझ्या सैन्यांची या दोन्हीपैकी एकाची निवड कर. त्यावेळी दुर्योधनाने श्रीकृष्णाची से’ना निवडली. कारण भगवान श्रीकृष्ण हे युद्धामध्ये शस्त्र घेणार नव्हते, म्हणून दुर्योधनाने श्रीकृष्णाची सेना निवडली. बलरामने दिलेले वचन श्रीकृष्णाने पाळले आणि युद्धामध्ये शस्त्राशिवाय भाग घेतला. आणि श्रीकृष्ण हे अर्जुनच्या रथाचे सारथी बनले. धर्म स्थापन करण्यासाठी युद्ध आवश्यक आहे. हे त्याने बलरामलाही समजावून सांगितले होते.

महाभारतात असा उल्लेख आहे की ज्या वेळी युद्धाची तयारी केली जात होती आणि तिथे एक दिवस भगवान श्रीकृष्णांचा मोठा भाऊ बलराम पांडवांच्या छावणीत अचानक आला. श्रीकृष्ण, युधिष्ठिर वगैरे दाऊ भैय्याला येताना पाहून खुश झाले. प्रत्येकाने त्याचा आदर केला. सर्वांना नमस्कार करून बलराम धर्मराजाच्या शेजारी येऊन बसले.

मग बलराम अत्यंत व्यथित मनाने म्हणाला की, मी किती वेळा श्रीकृष्णाला सांगितले की आमच्यासाठी पांडव आणि कौरव दोघेही समान आहेत. दोघेजण आपापसात ल’ढून मूर्खपणा करत आहे. आम्हाला यात युद्धामध्ये भाग घेण्याची गरज नाही, पण श्रीकृष्णाने माझे काही ऐकले नाही. श्रीकृष्णाचा अर्जुनाबद्दलचा स्नेह इतका आहे की तो कौरवांच्या विरोधात आहे.

आता श्रीकृष्ण जिथे आहे, त्या बाजूने मी कसा जाऊ शकतो? भीम आणि दुर्योधन दोघांनीही माझ्याकडून गदा शिकली आहे. दोघेही माझे शिष्य आहेत. मला दोघांबद्दल समान स्नेह आहे. हे दोन कुरुवंशी एकमेकांशी लढताना मला आवडलेले नाही, म्हणून मी तीर्थयात्रेला जात आहे.असे म्हणत बलरामांनी सर्वांकडून रजा घेतली आणि तीर्थयात्रेला निघाले.

कुरुक्षेत्र युद्धाच्या शेवटच्या दिवशी बलराम युद्धभूमीवर पोहचला होता. दुर्योधन आणि भीमाच्या गदा युद्ध त्यांनी बघितले. त्यामध्ये श्रीकृष्णाने भीमला हातवारे करून सांगितले, की त्याने दुर्योधनाच्या मांडीला मारावे. श्री कृष्णाने जसे सांगितले भीमनेही तसेच केले आणि दुर्योधन मरण पावला. श्रीकृष्णाच्या या रणनीतीमुळे बलरामांना खूप रा’ग आला. परंतु श्रीकृष्णांनी त्यांच्या युक्तिने बलरामला शांत केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *