नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आजचे राशी भविष्य 26 ऑक्टोबर 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राशी भविष्य
हाती घेतलेले काम पूर्ण होईल. एखादे मोठे काम पूर्ण होईल. जे करण्यासाठी तुम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. गरजूंना मदत करा. अन्न, वस्त्र दान करा. आजचा शुभ रंग – जांभळा.

वृषभ राशी भविष्य
सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मान-सन्मानात वाढ होईल. एखाद्या मंदिरात पूजा किंवा हवन कराल. आरोग्याची काळजी घ्या. नव्या नोकरीची संधी चालून येईल. सासुरवाडीतून आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग – पांढरा.

मिथुन राशी भविष्य
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. दूरचा प्रवास होऊ शकतो. व्यापाऱ्यांना अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग – निळा.

कर्क राशी भविष्य
शुभ कार्यात पैसे खर्च होऊ शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध रहा. वाहन चालवताना काळजी घ्या. व्यापाऱ्यांचा वाद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.

सिंह राशी भविष्य
नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. वरिष्ठांचे चांगले मार्गदर्शन मिळेल. मन प्रसन्न असेल. संध्याकाळनंतर एखाद्या पार्टी किंवा धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – नारंगी.

कन्या राशी भविष्य:
हाती घेतलेली कामे वेळेवर पूर्ण कराल. नोकरी करणाऱ्यांना अचानक आनंदाची बातमी मिळेल. मान – सन्मानात वाढ होईल. गरजूंना कपडे, अन्न दान करा. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – केशरी.

तूळ राशी भविष्य
एखाद्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. दिवसभर धावपळीचा असण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. भावूक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठ आणि वडिलधाऱ्यांची मते ऐकून निर्णय घ्या. आजचा शुभ रंग – नारंगी.

वृश्चिक राशी भविष्य
नव्या कार्याची सुरुवात करु शकता. मन प्रसन्न असेल. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आजचा शुभ रंग – पांढरा.

धनु राशी भविष्य
आजचा दिवस धावपळीचा असण्याची शक्यता आहे. मुलांसोबत वेळ घालवाल. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. संपत्तीच्या संदर्भात सुरू असलेल्या समस्या दूर होतील. आरोग्य सुदृढ असेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग – लाल.

मकर राशी भविष्य
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कोणत्याही वादात पडू नका. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कुटुंबात ताण-तणावाचे वातावरण असेल. मानसिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – राखाडी.

कुंभ राशी भविष्य :
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी ताण-तणाव जाणवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. आजचा शुभ रंग – हिरवा.

मीन राशी भविष्य :
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. नव्या कार्याची सुरुवात करु शकता. थोडा थकवा जाणवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *