नमस्कार मित्रांनो,

आपल्यातील अनेकांच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती हि असतेच. या अन्नपूर्णा देवीला आपण मान दिल्यास ती देवी आपल्याला चांगले फळ देते. अन्नपूर्णा देवी म्हणजे माता पार्वतीचे रूप. ज्यावेळी पृथ्वीवर सगळीकडे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली, त्यावेळी माता पार्वतीने पृथ्वीवर अन्नपूर्णा देवीचा अ वतार घेऊन हे सं कट दूर केले होते.

अन्नपूर्णा देवी म्हणजे एक प्रकारे अन्न आणि पाणी यांची देवता. फार पूर्वीच्या काळात मुलींचे कन्यादान करताना माहेरकडची माणसे हि आपल्या मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती द्यायचेत, अशी प्र था किंवा परंपरा होती. आणि ती नववधू पतीच्या घरात म्हणजेच सासरच्या घरात प्रवेश करताना,

अन्नपूर्णा देवीची मूर्ती सोबत घेऊन प्रवेश करायची. अनेकांच्या घरांमध्ये अशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती हि असतेच. पण ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवावी? त्याची पूजा कशी करावी? आणि तिची उपासना कशी करावी? याबद्दल अनेकजणांना काहीही माहीत नसते. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवावी. तसेच घरामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा कशी करावी.? आपल्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती हि फक्त अंथरलेल्या वस्त्रावर कधीच ठेवू नये. अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपल्या देवघरात कधीही तांब्याच्या किंवा पितळेच्या वाटीमध्ये ठेवावी.

यापैकी जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर, स्टीलची वाटी चालेल. सर्वात आधी हि वाटी चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यावी आणि त्यानंतर त्या वाटीमध्ये तांदूळ भरून घ्यावेत. अनेकजण तांदूळ या धान्याला अन्नपूर्णा देवीच असे मानतात. त्या वाटीमध्ये असलेल्या तांदळावर हळदी कुंकू वाहावे आणि नंतर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला त्या तांदळावर ठेवावे.

अन्नपूर्णा देवी ही स्वतः अन्नपूर्णा धान्याची देवी आहे. त्यामुळे याप्रकारे धान्यामध्ये देवीची स्थापना करायला आपल्या शा स्त्रामध्ये विशेष महत्व आहे. आपल्याला त्या वाटीमधील तांदूळ हे दर ७ दिवसांनी बदलावे. या वाटीमधील तांदळाचा काही भाग, हा आपल्या घरामधल्या तांदळात मिसळावा.

आणि त्यातील काही तांदूळ हे आपल्या घराच्या गच्चीवर किंवा आपल्या अंगणात जिथे पक्षी येतात तिथे ठेवावीत. आणि या पक्ष्यांना तांदूळ खायला घालावा. या पद्धतीने देवघरात ठेवलेल्या अन्नपूर्णा देवीची आपण दररोज पुजाअर्चा, उपासना केली पाहीजे. अन्नपूर्णा देवीची पुजाअर्चा आणि उपासना करत असताना, आपण अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र देखील बोलले पाहिजे.

आणि अशा प्रकारे आपण दररोज अन्नपूर्णा देवीची उपासना अगदी मनोभावे व भक्तीने करावी. अशाप्रकारे ही अन्नपूर्णा देवीची पुजाअर्चा आणि उपासना केल्यास, अन्नपूर्णा देवीची अखंड कृपादृष्टी आपल्या घरावर राहते व आपले कुटुंब सुखी व समाधानी राहते. तसेच घरात सुखसमृद्धी येते.

त्याचबरोबर त्या घरातील जेवण करणाऱ्या स्त्रीच्या डोक्यावर अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त असल्याने, त्या स्त्रीच्या हाताने केलेल्या अन्नाला चवही खूप छान येते. ज्या घरावर अन्नपूर्णा देवीची कृपा असते. त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता होत नाही. किंवा भासत नाही. असे म्हटले जाते. अशाप्रकारे तुम्हीदेखील अन्नपूर्णा देवीची स्थापना आणि पूजा करावी.

टीप:- वरील माहिती सा माजिक आणि धा र्मिक श्र द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं धश्र द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि क मेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास शे अर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *