नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! झाडांचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. झाडांशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. कारण झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू मिळतो. झाडांमुळे चा पाऊस पडण्यास मदत होते व जमिनीची धूप थांबते झाडे आपल्याला फळे, फुले, सावली, लाकूड, औषधे अशा कितीतरी वस्तू पुरवतात. वास्तुशास्त्रातही झाडांना फार महत्त्व आहे.

घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण शुद्ध तर होतेच त्याबरोबरच झाडांकडे पाहून मन उत्साही व प्रसन्न होते झाडांचा आपल्या जीवनावरही खूप प्रभाव पडतो. काही झाडे ही आपल्यावर शुभ प्रभाव टाकतात. तर काही झाडांचा आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो. काही झाडे नकारा त्म क ऊर्जा पसरवतात तर काही झाडांमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते.

काही झाडे अशी असतात की, आपल्या घरात किंवा घराच्या आसपास लावल्यास त्याचे खूप चांगले परिणाम आपल्या जीवनावर होतात. आणि जर ही झाडे आपोआप आपल्या घराच्या आसपास उगवली तर आपल्या जीवनासाठी हा एक खूप शुभ संकेत असतो. आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणती झाडे झुडपे आपल्यासाठी शुभ असतात. तर कोण कोणत्या झाडा झुडपांना आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम दिसून येते.

सर्वात आधी आपण जाणून घेऊयात आपल्या जीवनासाठी शुभ सकारात्मक झाडे कोणती आहेत ते. त्यातील सर्वात पहिले झाड म्हणजे तुळ. तुळशी आपल्या हिं’दू ध’र्मात खूप पवित्र मानले जाते प्रत्येक हिं’दूच्या दारात तुळसी असतेच. तुळस आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर औषधी गुणांनी युक्त असल्याने आयुर्वेदातही मानाचे स्थान ही मिळवून आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

श्रीहरी विष्णूना तुळशीची पाने अतिप्रिय आहे. म्हणूनच दारात जर तुळशीचे रोप असेल तर घरात धनसंपत्ती व आरोग्याची कमतरता जाणवत नाही. तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते. आणि त्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्या जीवनावरही स का रात्मक परिणाम होत असतो. तुळशीमध्ये न का रा त्म क ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत क्षमता असते. दारात जर तुळस असेल तर वाईट व नकारा त्म क शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही.

हेही वाचा : घरात पाल दिसणे शुभ की अशुभ ? जाणून घ्या
दुसरे झाड म्हणजे बेलाचे झाड. ज्यांच्या घरात बेलाचे झाड असते ते व्यक्ती नेहमीच सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठे असते. ते अंगणात लावावे हे झाड दारात लावल्यास घरात सुख समृद्धी कायम राहते. बेलाचे झाड महादेवांना अतिप्रिय आहे. म्हणून जर आपण हे झाड आपल्या दारात लावले तर देवादी देव महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट व न का रात्मक शक्ती प्रवेश करत नाही. त्याबरोबरच राहू केतूच्या दुषप्रभावापासूनही आपल्या घराचे संरक्षण होते…

पुढील झाड म्हणजे लिंबू चे झाड. तंत्र मंत्र, करणी, जादूटोणा यामध्ये आवर्जून लिंबू चा वापर केला जातो. कारण लिंबामध्ये न का रा त्म क शक्तीला आकर्षित करण्याची अद्भुत शा असते. लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक व वाईट शक्तींना आकर्षित करते. म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाची वाईट नजर पडत नाहीत तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहते.

पुढे झाड म्हणजे मंदार व रुई. मंदारचे झाडही आपल्या घरासाठी खूप शुभ मानले जाते. मंदारची फुले महादेवांना, गणपती बाप्पाना तसेच हनुमानांना अर्पण केले जातात. मंदारचे झाड आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट व बांधाचे निवारण करते. ज्यांच्या घराबाहेर मंदारचे झाड आपोआप उगवते त्यांच्या घरात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषांचा परिहार होण्यासाठी तसेच जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते. यामुळे तो दोष दूर होतो.

पुढील झाड म्हणजे केळीचे झाड. केळीचे झाडही आपल्या घरासाठी खूप शुभ असते. केळीचे झाड आपल्या घरात सुख व समृद्धी आणते. केळीच्या झाडाचा श्रीहरी विष्णूचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. म्हणूनच यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असते त्या घरात देवी लक्ष्मी चे कायम वास्तव्य राहते. तसेच घरात सुख समृद्धी कायम राहते.

हेही वाचा : श्रावणी सोमवारी स्वयंभू शिवलिंग कसे तयार करावे ज्याने पैसा, घर, गाडी, प्रेम, लग्न, सर्व मिळेल. जाणून घ्या!
पुढील झाड म्हणजे नारळाचे झाड. कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो. नारळाला खूप शुभ व पवित्र मानले जाते. ज्या घराच्या अंगणात नारळाचे झाड असते अशा घरांमध्ये सुख समृद्धी व वैभव काय असते तसेच अशा घरातील सदस्यांना समाजात खूप मानसन्मानही मिळतो.

पुढील झाड म्हणजे आवळ्याचे झाड. आवळा हा बहुगुणी व पोषकतत्वांनी युक्त आहे आवळ्याचे झाड हे श्रीहरी विष्णूंच्या थुंकीपासून निर्माण झालेले आहे. आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक व शुद्ध ऊर्जा पसरलेली असते. म्हणूनच घराच्या अंगणात जर आवळ्याचे झाड असेल तर घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि घरातील वातावरणही नेहमी सकारात्मक बनलेली राहते. आवळ्याच्या झाडाला पापहरण झाडही म्हटले जाते.

हळदीही सर्व धार्मिक शुभ कार्यात आवर्जून वापरली जाते. तसेच हळदीला शुभ व पवित्र मानले जाते. हळदीमध्ये दैवी शक्ती असते म्हणून जर घरात हळदीचे रोप असेल तर घरात सर्व प्रकारची सुखी हात जोडून उभी राहतात. आणि घरातील वातावरणही शुद्ध व पवित्र राहते. तर मित्रांनो ही आहेत झाडे जे आपल्या घरासाठी शुभ व पवित्र असतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी तसेच आनंद आणतात.

परंतु काही झाडे अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर खूप अशुभ व नकारात्मक परिणाम होत असतो अशी झाडे चुकूनही घरात किंवा घराच्या आसपास लावू नये. चला तर जाणून घेऊयात ती कोणकोणती झाडे आहेत ते. घराच्या आसपास कधीही काटेरी झाडे लावू नयेत. तसेच विषारी ज्या झाडांची पाने तोडल्यास दूध निघते अशी कोणती झाडे दारात लावू नयेत याला मंदारचे झाड अपवाद आहे. तसेच चिंचेचे झाड, बोराचे झाड ही न का रात्मक शक्तींना आकर्षित करणारे झाडेही घराच्या आसपास लावू नये.

तसेच आपल्या घराच्या आसपास पिंपळाचे झाडही लावू नये. यामुळे आपल्या दारिद्र्यात वाढ होते. आपल्याला कोणत्याही कार्यात यश मिळत नाही. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की दाराबाहेर कोणती झाडे लावावीत व कोणती लावू नयेत ते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *