नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो माझे नाव धर्मराव, मी स्वामींच्या भक्तीमार्गामध्ये गेली अनेक वर्षे आहे. नोकरी संपली आणि रिटायरमेंट मध्ये माझी पत्नी दूर्वा हिच्या सहवासाने मला स्वामींची गोडी लागली. एक अत्यंत सुखी असे आमचे कुटुंब आहे मुलगा अविनाश आणि सुनबाई सायली असा अत्यंत सुखाचा संसार चालू होता. माझ्या संसाररूपी वेलाला एक छान असे फूल लागले जेव्हा अविनाशला रूही नावाची अत्यंत सुंदर अशी कन्या झाली.

आज माझी नात 3 वर्षांची आहे, पण काहीतरी नजर लागेल असे व्हावे तसेच माझ्या रूहीला ओपन हार्टचा त्रास आहे. अगदी छोटी असल्यापासूनच तिचा पुण्याला इलाज चालू होता. आता रूही 3 वर्षांची झाली आणि डॉक्टरांनी आम्हाला संगितले की रूहीचे ऑपरेशन करून घ्या. बाहेरचे एक डॉक्टर येणार होते आणि मग आपण ऑपरेशन करूया असे ठरले.

आमचा जीव भांड्यात होता, त्या दिवशी मी आणि दूर्वा दिवसभर स्वामींच्या केंद्रामधून हललो देखील नाही. मला आजाहि आठवते 27 जानेवारीचा तो दिवस होता, ऑपरेशन साथी लागणारे पैसे जमवण्यासाठी अविनाश जीवाचा आटापिटा करत होता. पैसे जमतील अशी काही तजवीज मी देखील केली होती आणि पैशाचा प्रश्न जवळपास सोडवला गेला होता. स्वामींच्या पुढे गार्‍हाणे घेऊन मी आणि दूर्वा बसलो होतो, ‘स्वामी ! असे आमचे काय चुकले ? की या लहान जीवांना आमच्या पापांची शिक्षा देताय’ मनामध्ये स्वामी आणि रूही या दोघांचाच विचार चालू होता.

निराश मनाने आम्ही दोघे घरी आलो, संध्याकाळी जेवण उरकले आणि मग झोपी गेलो. आज का कुणास ठाऊक खूप चांगली अशी झोप लागली. मनावरचे कसले तरी दडपण दूर झाले होते, काहीतरी चांगले होईल ही भावना होती. रात्री मध्यरात्री अचानक मला स्वप्न पडले, स्वप्नामध्ये माझे दैवत स्वामी महाराज माझ्याशी बोलत होते. स्वामी म्हणाले, ‘तू काहीही काळजी करू नकोस ! मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझे दू:ख संपले समज, त्या लहान जीवाला काहीही होणार नाही’. सकाळी मी उठलो आणि दूर्वाला ही सगळी गोष्ट सांगितली. दोघांनीही मग स्वामींच्या फोटोपुढे जाऊन हात जोडले.

अविनाश काल आलाच नवता. का नसेल आला ? जीवाला घोर लागला होता, फोन लावला तर बंद सांगत होते. संध्याकाळचे जवळपास 4 वाजले असतील अशा वेळी अविनाशने घरात प्रवेश केला, झुकलेले खांदे.. सकाळपासून आंघोळ नसल्यामुळे निस्तेज दिसणारा चेहरा. घरात घुसताच दूर्वाच्या कुशीत घुसत तो रडायला लागला, ऐन टायमाला मित्राने धोका दिला … पैसे द्यायला त्याने नकार दिला. सर्वांना धक्का बसला, 10 दिवसांनी ऑपरेशन करायचे होते आणि पैसे नाहीत !

अविनाशला घेऊन मी डॉक्टरांकडे गेलो, कारण त्यांचा सल्ला महत्वाचा होता .. सर्वात महत्वाचा ! डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली तेव्हा डॉक्टर म्हणाले, की ऑपरेशन तर करावेच लागेल पण तुमच्याकडे पैसे नाहीत तर आपण एक महिना ऑपरेशन पुढे ढकलूया, पण ऑपरेशनच्या आधी केल्या जाणार्‍या टेस्ट मात्र नियोजित वेळीच करूया. तसे त्यांनी बाहेरच्या डॉक्टरांना देखील कळवले आणि 9 तारखेला यायला संगितले.

9 फेब्रुवारीचा दिवस होता, दूर्वा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन बसली, ती आजचा दिवस ईश्वराशी झगडणार होती आणि नियतीला बदलवण्याचा वेडा प्रयत्न करत होती. मी, अविनाश आणि सायली तिघ रूहीला घेऊन दवाखान्यामध्ये सगळ्या टेस्ट करण्यासाठी म्हणून गेलो होतो. स्वामीचे स्वप्न डोक्यात होते पण ते निव्वळ एक स्वप्न होते. बराच वेळ टेस्ट चालल्या आणि रिपोर्ट यायला देखील बराच वेळ लागला. साधारण 4 तासांनी रिपोर्ट आले असतील.

रिपोर्ट डॉक्टरांकडे गेले, काही वेळामधेच डॉक्टरांनी आम्हाला आत बोलावले. डोक्टरांचा चेहरा विचित्र आणि टेंशनमध्ये असल्यासारखा होता, आमच्या पायाखालची जमीनच हलयाची आता बाकी राहिली होती. डॉक्टरांनी एक कटाक्ष सगळ्यांकडे टाकला आणि विचारले ‘नेमके तुम्ही काय केले ?’ आम्हाला प्रश्न कळला नाही आणि आम्ही काहीतरी अनपेक्षित आणि वाईट ऐकायला मिळणार असे वाटत होते. ‘रूहीचा ब्लॉक भरतोय… तो खूप जास्त कमी झालाय, मला नाही वाटत ऑपरेशनची गरज आहे.. तुम्ही असे केले काय ?’. डॉक्टरांच्या या शब्दांनी आम्हाला आकाश ठेंगणे झाले. मी माझ्या स्वप्नाबद्दल त्यांना संगितले आणि स्वामींना हात जोडले. ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय !

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *