नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो आपल्यातील बरेच लोक स्वामींची सेवा आणि त्याचबरोबर स्वामींचे व्रत स्वामींच्या नावाचा जप दररोज न चुकता आपल्या नेते सेवेमध्ये करत असतात आणि मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरी हे स्वामींचे पारायण वर्षातून किमान एकदा किंवा दोनदा तरी करत असतात. कारण मित्रांनो स्वामींची व्रत आणि स्वामींचे पारायण केल्यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना खूप फायदे झालेले आहेत. हे आपण नेहमी ऐकतच असतो. त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती स्वामींची सेवा करत असते. तेव्हा स्वामी त्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन मदत करत असतात आणि त्याची जी काही समस्या आहे ती सोडवत असतात.

मित्रांनो आपण अनेकदा खूप लोकांकडून ऐकतो की स्वामींनी मला असा अनुभव दिला आणि स्वामी अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये येऊन माझी मदत केली. त्याचबरोबर माझी सर्व अडचणी पासून सुटका देखील केली.

मित्रांनो ज्यावेळी आपण अशावेळी स्वामींचे अनुभव ऐकतो तेव्हा आपल्यालाही स्वामींच्या सेवेचे त्याचबरोबर स्वामींच्या व्रताचे महत्त्व कळून येते आणि म्हणून आपणही स्वामींची सेवा अगदी मनापासून करायला सुरुवात करतो.

मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामींचे सेवा किंवा स्वामींचे व्रत स्वामींचे पारायण करायला सुरुवात करतो. तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन आपली मदत करतातच.

तर मित्रांनो आज आपण असाच एक स्वामी समर्थांबद्दलचा अनुभव पाहणार आहोत. मित्रांनो हा अनुभव स्वामी समर्थांचा ज्या व्यक्तीला आलेला आहे ही व्यक्ती खूप मोठी आहे म्हणजेच मराठी चित्रपटांमध्ये काम केलेली ही व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला स्वामींचा अनुभव आलेला आहे.

मित्रांनो ती व्यक्तीच नाव म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना हे दोन मराठी कलाकार माहित असतीलच मित्रांनो यांना स्वामी समर्थांचा अनुभव आलेला आहे आणि तो कोणता अनुभव यांना आलेला आहे आणि कशा पद्धतीने स्वामींनी यांची मदत केलेली आहे. हे आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो हा स्वामी समर्थांचा आलेला अनुभव सांगताना सुप्रिया पिळगावकर स्वामी भक्तांना सांगतात की… माझी मावस बहीण ही दादर येथे स्वामी समर्थांच्या केंद्रा जवळ असणाऱ्या एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहते आणि स्वामींची खूप मोठी भक्त होती म्हणजेच ती जेव्हाही तिला वेळ मिळेल तेव्हा स्वामींची सेवा ती करत असे.

त्याचबरोबर जेव्हा जेव्हा ही तिला वेळ मिळेल तेव्हा ती स्वामींच्या नामाचा जप सुद्धा करत असे आणि मागच्याच वर्षी तिच्या नवऱ्याला म्हणजेच तिच्या पतीला पॅरालिसिसचा झटका आलेला होता आणि त्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय त्यांना गमवावे लागले होते. त्यांच्यावर एका मोठ्या दवाखान्यामध्ये उपचार देखील सुरू होते.

त्याच बरोबर या उपचारांबरोबरच माझी मावस बहीण ही स्वामींची खूप मोठी सेवेकरी असल्यामुळे आपल्या पतीचे आजार पण लवकरात लवकर दूर व्हावे. यासाठी स्वामींकडे साकडे घालत असे आणि त्याचबरोबर दररोज स्वामींची सेवा करत असे आणि स्वामींना आपला प्रति लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत असे.

अर्थातच त्यांचा स्वामींवर खूप विश्वास होता त्यामुळे त्यांनाही असं वाटत होतं की स्वामी आपल्या पतीला नक्की बरं करते आणि स्वामींच्या कृपेमुळे अगदी थोड्याच दिवसांमध्ये त्यांच्यावर जे उपचार चालू होते. त्यामुळे आणि स्वामींवर असणाऱ्या विश्वासामुळे त्यांचे पती अगदी पूर्णपणे बरे झाले आणि त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला.

सुप्रियाताई पुढे सांगतात की जेव्हा ही ती मला भेटत असेल तेव्हा ती मला ही गोष्ट नक्की सांगत होती. स्वामींच्या त्या अनुभवाबद्दल वारंवार मला काही ना काही सांगतच होती परंतु माझा या सर्व गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता आणि मीही तिला सांगायचे की माझा काही या सर्वांवर विश्वास नाही असे कुठे असते का डॉक्टरांच्या उपचारामुळेच तुझे पती बरे झालेले आहेत असे मी तिला सांगत.

परंतु एके दिवशी ती अशीच मला भेटण्यासाठी माझ्या घरी आली होती आणि तेव्हा मी खूपच निराश होते. कारण मला एक बंगला आवडलेला होता आणि तो बंगला मला हवा होता माझ्याकडे त्यावेळी दोन बंगले होते. परंतु तो जो बंगला होता तो खूपच चांगला होता आणि तो मिळवण्यासाठी आम्ही खूप दिवसांपासून मेहनत घेत होतो.

जेव्हा माझी बहीण माझ्याकडे आली आणि मी निराश असलेले पाहून तिने मला विचारले की तुम्ही निराश का आहेस तेव्हा मी ही सर्व गोष्ट तिला सांगितली आणि तेव्हा त्या माझ्या मावस बहिणीने मला स्वामींचे नऊ किंवा अकरा गुरुवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला.

स्वामींकडे बंगला मिळावे यासाठी नवस बोलून या वृत्ताची सुरुवात कर. तुला नक्कीच याचा चांगला परिणाम दिसून येईल असे ती मला म्हणाली. तेव्हा सुद्धा मी तिला म्हणाले की अशा पद्धतीने देव देव करून तो बंगला आम्हाला मिळणार आहे का किंवा स्वामींचे हे व्रत केल्यामुळे आम्हाला तो बंगला मिळणार आहे का असे मी तिला रागाने म्हणाले.

त्यानंतर ती थोडी शांत झाली आणि थोडा वेळ गेल्यानंतर तिने पुन्हा मला सांगितले की बघ अशक्य ही शक्य करतील स्वामी. एकदा स्वामींवर विश्वास ठेव आणि स्वामींना साकडे घालून स्वामींचे व्रत करून बघ. स्वामी नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करतील.

तिचे हे बोलणे ऐकून थोडा वेळ मीही शांत झाले आणि त्यानंतर थोडासा विचार केला आणि मी तिला म्हणाले की ठीक आहे तुम्हाला या व्रताची माहिती दे मी बघते काय होतं काय यामुळे असे मी तिला म्हणाले आणि त्यानंतर तिने मला त्या व्रत्ताबद्दलची सर्व माहिती सांगितली.

त्यानंतर मी पुढच्याच गुरुवारपासून स्वामींचे हे व्रत करायला सुरुवात केली आणि जेव्हा माझा सातवा गुरुवार सुरू होता म्हणजेच सातव्या गुरुवारचे व्रत जेव्हा सुरू होते. तेव्हा सचिनला ही गोष्ट कळाली आणि त्यांनी सुद्धा असे करून काही आपल्याला तो बंगला मिळणार नाही असे म्हणून तोही रागाने निघून गेला. परंतु आता मी ते गुरुवारचे व्रत सुरू केलेले होते म्हणून अर्धेच का सोडायचे असे म्हणून मी ते गुरुवार पुढे करत राहिले.

शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अकराव्या गुरुवारी जेव्हा मी व्रत करत होते. तेव्हा सचिन खूप घाईगडबडीत बाहेर गेला आणि मला क्षणात कळाले की हा त्या बंगल्याच्या संबंधितच कामासाठी बाहेर गेला असेल आणि तेव्हा मीही शेवटच्या गुरुवारचे व्रत करत होते.

त्यानंतर माझी ती पूजा आणि ते व्रत मी पूर्ण केले आणि त्याचे उद्यापन करत असताना स्वामींकडे हात जोडून प्रार्थना केली. थोड्यावेळाने सचिन खूप आनंदाने घरामध्ये आला आणि तो मला त्याच्या हातामध्ये असलेले त्या बंगल्याचे पेपर्स दाखवून म्हणाला की, आपले स्वप्न पूर्ण झाले. त्यावेळी जेव्हा मला ही गोष्ट कळाले की तो बंगला आता आमचा झालेला आहे तेव्हा माझ्या अंगावर काटाच आला आणि माझा त्या गोष्टीवर विश्वासच बसेना झाला.

कारण ज्या पद्धतीने मला माझ्या बहिणीने हे गुरुवारचे व्रत करायला सांगितले आणि मी ते केले आणि शेवटच्याच गुरुवारच्या दिवशी मला त्याचा अनुभव आला. त्यानंतर पुढे सुप्रियाताई म्हणतात की माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा अनुभव होता आणि म्हणूनच त्या दिवशीपासून आम्हीही स्वामींची दररोज सेवा करायला सुरुवात केली.

ज्या दिवशी स्वामींची सेवा करणे आम्हाला जमले नाही त्यादिवशी आम्ही स्वामींच्या नामाचा जप केला. परंतु स्वामींना आम्ही कधीही विसरलो नाही. कारण की एवढ्या मोठ्या बंगल्याचे स्वप्न हे फक्त स्वामींच्या व्रतामुळेच पूर्ण होऊ शकले.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *