मित्रांनो शनि देवांना कर्माचा दाता म्हणतात अशी मान्यता आहे की शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात. त्यानुसार व्यक्तीला शुभ अशुभ फळ मिळत. एका राशीत किमान अडीच वर्ष वास्तव्य करीत असतात. शनि देवाला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तीस वर्षे लागतात.

शनिदेव हे येणाऱ्या महिन्यात आपल्या स्वराशी कुंभ मधून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि या राशीत शनी देव दोन जून२०२५ पर्यंत असणार आहेत. शनि देवा मीन राशि प्रवेश केल्याने अनेक राशींची साडेसाती पासून सुटका होणार आहे. चला तर पाहूया शनि देवाच्या गोजराने कोणत्या राशींचे भाग्य उघडू शकते.

१) सिंह रास – सिंह राशीतील लोकांना तब्बल दोन वर्ष सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. शनि देवाची या काळात विशेष कृपा यांच्यावर असणार आहे. या लोकांना येणाऱ्या काळामध्ये नोकरी व्यवसायात भरपूर लाभ मिळणार आहे. तसेच नफा देखील मिळणार आहे. वैवाहिक जीवन चांगला असणार आहे. या काळात कुटुंबात वातावरण हे आनंदाचे असणार आहे. सामाजिक आदरात वाढ होऊ शकते. म्हणजेच येणारा काळ यांच्यासाठी खूपच सुखकारक असणार आहे.

२) तुळ रास – तूळ राशींच्या लोकांसाठी शनि देवाचे गोचर खूपच लाभदायी ठरणार आहे. जर या राशीतील लोकांना परदेशात नोकरी किंवा शिक्षण घ्यायचे असेल तर यांची ही इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये व्यवसायाशी संबंधित लोक चांगली कामगिरी करणार आहेत. ज्यामुळे यांची आर्थिक स्थिती खूपच मजबूत होणार आहे.

तसेच तू राशींच्या लोकांना समाजात मानसन्मान देखील मिळणार आहे. मानसन्मानामध्ये त्यांची वाढ होणार आहे. नशिबाने साथ दिल्याने जे काही आजपर्यंत रखडलेली कामे आहेत.ही कामे या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. तसेच सरकारी योजनांचाही यांना खूपच चांगला फायदा होणार आहे.

३) मकर रास- शनि देवाचे दोन वर्ष मकर राशींच्या मंडळींवर विशेष कृपा असणार आहे. या काळात या राशीतील लोकांना सुख समृद्धी आणि आनंदी जीवन जगायला मिळणार आहे. या काळात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकणार आहे.

दुसरीकडे रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकते . म्हणजेच येणारा जो काळ आहे हा काळ मकर राशीसाठी खूपच लाभदायी असणार आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीच्या अनेक विविध संधी प्राप्त होणार आहेत. तसेच व्यवसायामध्ये खूपच फायदा मिळणार आहे. त्यामुळे यांची आर्थिक स्थिती खूपच मजबूत राहील.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *