कन्या
या राशीची मंडळी ही जन्मतःच प्रत्येक गोष्टींमध्ये परफेक्शनिस्ट बनण्यासाठी इच्छुक असू शकतात. अनेकदा याच स्पर्धेत त्यांची भावनिक बाजू काहीशी दडवून ठेवली जाते. एखाद्याचा राग आल्यास ही मंडळी त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्यासाठी खूप वेळ घेऊ शकतात. त्यांनी काही वेळा स्वतःला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी इतकी मेहनत घेतलेली असते की त्यांना आपल्यावर इतरांनी केलेली टीका म्हणजे मेहनतीचा अपमान वाटू शकतो. म्हणूनच ते काही घटनांमध्ये चूक असूनही त्यांना समोरच्याचं बोलणं टीका वाटण्याची शक्यता अधिक असते. (Selfish Horoscope)

सिंह
नावाप्रमाणेच सिंह राशीची मंडळी मानी व राजेशाही जीवन जगण्याची इच्छा मनी बाळगतात. त्यांना अनेकदा चूक दाखवून देणाऱ्याचा राग येऊ शकतो त्यामुळे ते चूक माहीत असूनही मान्य करणे टाळू शकतात. या मंडळींना इतरांसमोर आपण दुबळे पडू अशी भीती असू शकते ज्यामुळे ते आपला मान राखून ठेवण्यासाठी स्वतःचा दोष इतरांच्या माथ्यावर मारू शकतात.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आपण चुकू शकतो यावर अनेकदा विश्वासच बसत नाही. अशा व्यक्ती राग सोडूनही देत नाहीत ज्यामुळे वाद वाढू शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती या संयमी असल्याने त्या थेट आपली चूक मान्य करत नसल्या तरी इतरांना दोष देण्याचे प्रमाण खूप कमी असू शकते. उलट अशा व्यक्ती टीकाकाराला शब्दात पकडण्यासाठी वाट पाहून मग पलटवार करण्याची संधी शोधण्याचे प्रमाण अधिक असू शकते. (Selfish Horoscope)

मेष
मेष राशीच्या मंडळींना चारचौघात केलेला अपमान अजिबात सहन करता येऊ शकत नाही. त्यांना चूक दाखवून देण्यासाठी सुद्धा इतरांना शांत व संयमी मोडमध्ये राहणे आवश्यक ठरू शकते. अन्यथा ते चांगल्यासाठी सांगितलेली गोष्ट ही नकारात्मक रित्या मनात साठवून ठेवू शकतात. त्यांना तुम्ही त्यांचे कौतुक केल्यास किंवा चूक अप्रत्यक्ष लक्षात आणून दिल्यास वाईट वाटण्याचे प्रमाण कमी असू शकते पण थेट वार केल्यास या व्यक्ती लगेच समोरच्यावर दोष टाकून मोकळ्या होऊ शकतात. (Selfish Horoscope)

हेही वाचा : या आहेत शुक्रदेवाच्या अतिप्रिय राशी ; या राशींच्या नशिबात असते भरपूर संपत्ती
कुंभ
संयमाची कमी असल्याने ही रास प्रचंड ज्ञानी असूनही अनेकदा स्वतःला व इतरांना मनस्ताप देऊ शकते. त्यांची अशी धारणा असते की, आपण कधीच खोटे बोलत नाही आणि बहुतांश घटनांमध्ये हे सत्यही असू शकते. पण काही वेळा पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे अंदाज चुकू शकतात. यावेळी आपण खोट्यात पडू नये म्हणून हे लोक चूक अमान्य करण्याची शक्यता असते. या मंडळी चूक मान्य न करताही प्रश्नाचे उत्तर शोधण्यावर अधिक भर देतात. यामुळे समोरच्याला काहीवेळा कुंभ राशीच्या लोकांचा राग येऊ शकतो.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *