नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचे वर्णन केले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. जन्मकुंडलीचे मूल्यांकन ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींच्या आधारे केले जाते. 16 ऑक्टोबर 2023 सोमवार आहे.

मेष – तणाव कमी होईल
मेषेच्या सप्मेषात सूर्य, बुध, चंद्र गुरू प्रतियुती. नवरात्रोत्सवात तुमच्या कार्याला दिशा मिळेल. नोकरीधंद्यातील तणाव, चिंता कमी होईल. थकबाकी वसूल करा. नवीन परिचयाने उत्साह, आत्मविश्वास वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच तयार कराल. कौटुंबिक कामे होतील. स्पर्धेत यश मिळेल. शुभ दिनांक – 20, 21

वृषभ – उतावळेपणा दूर ठेवा
वृषभेच्या षष्ठेशात सूर्य, बुध, सूर्य-हर्षल षडाष्टक योग. कोणत्याही क्षेत्रातील निर्णय घेताना उतावळेपणा नको. चूक टाळा. नोकरीत कामाच्या बाबतीत सावध रहा. चर्चेत वाद नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मर्जीनुसार कामे करावी लागतील. कायदा पाळा. अहंकार नको. प्रवासात सावध रहा. शुभ दिनांक – 18, 19

मिथुन – योग्य गुंतवूणक करा
मिथुनेच्या पंचमेषात सूर्य, बुध, चंद्र गुरू प्रतियुती. कुलदेवीच्या आराधनेचा नक्कीच लाभहोईल.नोकरीधंद्यात प्रगती होईल. योग्य गुंतवणूक करता येईल. कर्जाचे काम होईल. खरेदी-विक्रीत फायदा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील किचकट प्रश्न मार्गी लावा. पदाधिकार मिळेल. योजनांना योग्य न्याय द्या. शुभ दिनांक – 18, 19

कर्क – महत्त्वाची कामे करा
कर्केच्या सुखस्थानात सूर्य, बुध, चंद्र बुध लाभयोग. सप्ताहाच्या सुरुवातीलाच महत्त्वाची कामे करा. नोकरीत काम वाढेल. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आव्हानात्मक कामे करून दाखवाल. प्रवासात सावध रहा. कौटुंबिक वाटाघाटीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांक – 17, 18

सिंह – नवी दिशा मिळेल
सिंहेच्या पराक्रमात सूर्य, बुध, चंद्र-गुरू प्रतियुती. नवरात्रोत्सवात तुमचा आत्मविश्वास वाढेल. कार्याला नवी दिशा मिळेल. नोकरीत प्रभाव पडेल. धंद्यात मोठी वाढ शक्य. कर्जाचे काम करा. खरेदी-विक्रीत फायदा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. कला, क्रीडा, साहित्यात यश मिळेल. शुभ दिनांक – 15, 16

कन्या – प्रत्येक दिवस महत्त्वाचा
कन्येच्या धनेषात सूर्य, बुध, रवी, बुध युती. नवरात्रीचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा. मैत्रीत, नात्यात क्षुल्लक नाराजी होईल. खर्चावर बंधन ठेवणे कठीण. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. धंद्यात चर्चा, वाढ यात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोह नको. नवीन परिचयाबाबत सावध रहा. शुभ दिनांक – 18, 19

तूळ – चर्चा यशस्वी ठरेल
स्वराशीत सूर्य, बुध, चंद्र, शुक्र लाभयोग. मनोभावे देवीची आराधना करता येईल. तुमच्या कार्याला वेगाने पुढे न्या. कोणतीही कामे रेंगाळत ठेवू नका. नोकरीधंद्यात प्रगती होईल. थकबाकी मिळवा. चर्चा यशस्वी ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद मिळेल. कौटुंबिक कामे होतील. आत्मविश्वास बाळगा. स्पर्धेत यश. शुभ दिनांक – 19, 20

वृश्चिक – सावधपणे कामे करा
वृश्चिकेच्या व्ययेषात सूर्य, बुध, चंद्र, शुक्र लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो सावधपणे कामे करा. नम्रता ठेवा. नोकरी धंद्यात संयमाने चर्चा करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक हल्लाबोल करतील. धोका पत्करू नका. चुका टाळा. अहंकार दूर ठेवा, अन्यथा अनर्थ घडेल. मैत्रीमुळे समस्या कमी होतील. शुभ दिनांक – 20, 21

धनु – परदेशी जाण्याची संधी
धनुच्या एकादशात सूर्य, बुध, चंद्र, शुक्र लाभयोग. नवरात्रोत्सवात तुमच्या कार्याला पुढे न्या. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. दर्जेदार परिचय होतील. नोकरीत बढती शक्य. परदेशात जाण्याची संधी. धंद्यात वाढ होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच महत्त्वाचे ठरतील. शुभ दिनांक – 15, 16

मकर – मौल्यवान वस्तू जपा
मकरेच्या दशमेषात सूर्य, बुध युती. गोड बोलून कठीण कामे करून घ्या. नवरात्रोत्सवात कुलमातेची आराधना करा. नवीन परिचयावर भाळू नका. नोकरीत वर्चस्व. धंद्यात मोह नको. मौल्यवान वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वासाने कामे कराल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. खर्च टाळा. शुभ दिनांक – 15, 16

कुंभ – योजना मार्गी लावा
कुंभेच्या भाग्येषात सूर्य, बुध, चंद्र, शुक्र लाभयोग. सप्ताहाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा, यशाचा ठरेल. श्रीदेवीची आराधना मनोभावे करा. नोकरीधंद्यात जम बसेल. थकबाकी मिळवा. तुमच्या क्षेत्रात वर्चस्व वाढेल. योजना मार्गी लावा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील किचकट कामे संपवा. लोकप्रियता वाढेल. शुभ दिनांक – 18, 19

मीन – संयम ठेवा
मीनेच्या अष्टमेषात सूर्य, बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. अहंकार, अतिशयोक्ती यामुळे समस्या वाढतील. संयम ठेवा. प्रवासात काळजी घ्या. रागावर ताबा ठेवा. नोकरी टिकवा. धंद्यात गोड बोला. महत्त्वाच्या वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा पाळा. कामात चूक नको. लोकांच्या समस्या सोडवा. प्रतिष्ठा जपा. शुभ दिनांक – 20, 21

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *