स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळस ही एक अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त औषधी वनस्पती. हिंदू धर्मात तुळशीचं एक वेगळंच स्थान आहे आणि त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये तुळशीला अगदी पवित्र स्थान दिले गेले आहे आणि म्हणूनच तुळस की आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी किती फायदेशीर आहे हे आता आपल्याला नक्कीच कळलं असेल.आपल्या आरोग्यासाठी तुळस किती महत्त्वाची आहे हे आता पाश्चात्य लोक सुद्धा मान्य करतायत.

मित्रांनो पूर्वीच्या काळी स्त्रियांनी तुळशीला जल अर्पण करून, तिची पूजा करून, प्रदक्षिणा घालण्याची प्रथा होती. यामागील कारण हे की तुळस इतर झाडांपेक्षा अधिक प्रमाणात प्राण वायू देते. मित्रांनो आपल्यातील प्रत्येक स्त्री तिच्या घरातील तुळशीची काळजी घेत असते आणि आपल्या घरातील तुळस कधीही वाढू नये यासाठी ती मेहनत ही घेत असते, सकाळ-संध्याकाळ तुळशीची पूजा करून त्याच्या पाशी दिवा लावून तिला पाणी घालत असते. मित्रांनो इतकी काळजी घेऊन अनेकदा आपल्या घरातील तुळस वाळते.

आपल्या हिंदू धार्मिकग्रंथ आणि शास्त्रानुसार घरातील तुळशीचे रोप सुकणे किंवा कोमेजणे हे अशुभ लक्षण असल्याचे नमूद केले आहे. असं मानलं जातं की ज्या घरात तुळशीचा वास असतो, तिथे काही त्रास होत असेल तर तुळशी आधी स्वतःची उष्णता स्वतःवर घेते आणि सुकवते. याशिवाय असेही मानले जाते की ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट किंवा संकट येणार आहे, त्या घरातून लक्ष्मीच्या रूपात तुळशी प्रथम जाते आणि तेथे गरिबी, अशांतता आणि संकटांचे निवासस्थान असते.

परंतु मित्रांनो याशिवाय तुळशीचे रोप सुकणे देखील बुध ग्रहाशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा रंग हिरवा आहे आणि तो झाडे आणि वनस्पतींचा कारकही मानला जातो. इतकेच नाही तर बुध ग्रह इतर ग्रहांचे शुभ-अशुभ परिणामही व्यक्तीला देतो. जर एखादा ग्रह अशुभ परिणाम देणार असेल तर त्याचा विपरीत परिणाम तुळशीच्या रोपासह बुध ग्रहाशी संबंधित गोष्टींवरही होतो.

मित्रांनो आपल्या घरातील तुळस वाळल्यानंतर आपण एक प्रभावी उपाय जर आपल्या घरांमध्ये केला तर त्यामुळे आपले अर्धवट राहिलेले सर्व कामे पूर्ण होतील आणि त्याचबरोबर आपण करत असलेल्या कामामध्ये आपल्याला यश मिळण्यास सुरुवात होईल. हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी आपल्या घरातील तुळशीच्या वाळलेल्या काड्या घ्यायचे आहेत आणि नंतर वाळलेल्या काड्या ची पावडर तयार करून पावडर चंदना मध्ये मिक्स करून त्याची पेस्ट तयार करायचे आहे आणि त्यासाठी आपल्या घरातील श्रीहरी विष्णू च्या प्रतिमेला लावायचा आहे

श्रीहरी विष्णूंना याचा टिळा लावल्यानंतर त्यांच्याकडे प्रार्थना करून त्यानंतर आपल्या कपाळी लावायचा आहे. आपल्या घरातील वाळलेल्या तुळशीच्या काडीच्या संबंधित हा छोटासा उपाय मी जर आपण आपल्या घरामध्ये गुरूवारच्या दिवशी केला तर यामुळे आपली अपूर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि त्याचबरोबर आपण सध्या जे काम करत आहोत त्यामध्ये ही आपल्याला यश मिळेल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *