हातावरून भविष्य ओळखणे हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. वास्तविक यामागील तथ्य हे असतं की, एखाद्या माणसाच्या हातावरील चिन्ह किंवा हाताची ठेवण ही त्या माणसाचे स्वभाव गुण अधोरेखित करत असते. भविष्यात काय घडणार हे तुमच्या स्वभावावरच आधारित असल्याने हाताच्या रेषा, चिन्ह व ठेवण पाहून भविष्याचे वेध घेता यतात.

आज आपण हस्तरेखा शास्त्रानुसार, हातावरील काही दुर्मिळ रेषांविषयी जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की अगदी नशीबवान लोकांच्या हातावरच अशी चिन्हे असतात. आणि या मंडळींना वयाच्या चाळीशीत व पुढे राजयोग अनुभवता येऊ शकतो. ही मंडळी आयुष्यात नानाविध मार्गांनी इतके धन कमावतात की त्यांची गणना करोडपती, अरबपतींमध्ये होऊ शकते. ही चिन्हे नेमकी कोणती व ती तुमच्या हातात आहेत का हे जाणून घ्या..

ज्या मंडळींच्या हातावर इंग्रजी अक्षर H चे चिन्ह असते त्यांची आयुष्याची सुरुवातीची वर्षे अत्यंत कठीण जाऊ शकतात. अनेकदा त्यांना लहानपण नीट सुखाने अनुभवता आलेले नसते. पण ४० व्या वर्षी त्यांचे नशीब अशी काही कलाटणी घेते की त्यांना अचानक व अनपेक्षित धनलाभ होऊ लागतो.

यानंतर या मंडळींचे पूर्ण आयुष्यच बदलू शकते. आता लक्षात घ्या हे निशाण तुमच्या हाताच्या मध्यभागी असायला हवे. याची नाळ थेट हृदय, नशीब व माथ्याशी जोडलेली असते. म्हणजेच मानसिक शांती, आरोग्य व नशिबात येणाऱ्या संधी यावर हे निशाण प्रभाव टाकत असते.

असं म्हणतात की तळव्याच्या मध्यभागी H हे निशाण असणाऱ्या मंडळींना त्यांचं पूर्वसंचिताचे फळ ४० व्या वर्षांपासून पुढे मिळत असते. अगदी सहज घेतलेला एखादा निर्णय त्यांचे आयुष्य बदलून टाकतो. त्यांच्या कामाच्या बळावर ते हळूहळू प्रगतीचा एक एक टप्पा पार करत असतात.

या मंडळींना धनच नव्हे तर समाजातील मान- सन्मानाची सुद्धा कधी कमी भासत नाही. सुख सुविधांनी समृद्ध आयुष्य जगताना त्यांनी आपले पाय जमिनीवर असतील याची मात्र खात्री करावी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *