नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लिला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या असल्यामुळे, श्री स्वामीं महाराजांचा भक्त परिवार अतिशय मोठा आहे. त्यांचे भक्त महाराष्ट्रा बरोबरच, देशभरातील अनेक ठिकाणी आहेत.

असंख्य ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसून येते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लिला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जात असते. या शिकवणीतून स्वामीसेवेचे महत्व तसेच त्यांच्या लिला याबाबत माहिती दिली जाते.

आपण रोज स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो, या विशेष सेवेमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या एका विशेष मंत्राचा जप करतो पितृपक्ष सुरू आहे.

त्यामुळे आजची सुद्धा सेवा ही खूप विशेष मानली जाते. तुम्ही सुद्धा स्वामींच्या या विशेष मंत्राचा जप करा, या मंत्रोच्चाराने स्वामींना प्रसन्न करा कारण त्यामुळे तुमचे पितृ सुद्धा प्रसन्न होण्यास मदत होईल.

याशिवाय ही सेवा तुमचा घरातील महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतात, फक्त तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसायचा आहे, म्हणजेच स्वामींच्या मूर्ती समोर फोटोसमोर बसायचं आहे.

मग सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची, सुख समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी याशिवाय संकट, समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्ही हात जोडून मंत्र बोलायचं आहे.

हा मंत्र तुम्हाला मनोभावाने विश्वासाने आणि पूर्ण विश्वासाने याचा जप करायचा आहे. कोणतीही घाई करायची नाही, अगदी सावकाश हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,

“ओम अवदुंबर प्रियाय नमः”
“ओम अवदुंबर प्रियाय नमः”

मंत्र जप तुम्हाला फक्त 121 वेळेस करायचा आहे. 121 पेक्षा कमी नाही, 121 पेक्षा जास्त नाही, हा मंत्र स्वामी समर्थांचा अष्टनामावली मधला एक शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्र आहे, तर तुम्ही हा मंत्र जप नक्कीच केला पाहिजे.

हे विशेष सेवा करावी, श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व अडचणी सर्व दुःख, सर्व समस्या तसेच अडचणी दूर करण्यास मदत करतील. तसेच तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतील, तुम्हाला जे हवं, ते स्वामी महाराज तुम्हाला देतील. मात्र तुम्ही मनोभावाने आणि स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा केली पाहिजे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे सादर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहिती साठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *