नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! नमस्कार मित्रांनो माझे नाव पांडुरंग, मी बीडमधला. मी पाहिल्यापासूच धार्मिक आहे आणि मला देवधर्मामध्ये अधिक रस आहे. पण दैवदयेमुळे मला नोकरी नसल्यामुळे मला अनेक प्रकारच्या सामाजिक विवंचंनांचा सामना करावा लागला. कदाचित यामुळे माझा देवाकडे ओढा अधिक वाढला असेल.

मी धार्मिक होतो पण मला स्वामींची ओढ माझा मुलगा आणि सासूबाई यांच्यामुळे लागली. त्या त्याला अनेकदा केंद्रात घेऊन जायच्या आणि मग तो माझ्याकडे केंद्रात जाण्यासाठी नेमहीच हट्ट करायचा. त्या लहान लेकरच्या नादात मला स्वामींचा नाद कधी लागला मला कळलेच नाही. समजाच्या अनेक व्यावहारिक गोष्टींचा मला त्यांच्या सहवासामध्ये विसर पडे आणि एका विलक्षण अशा शांततेचा अनुभव येईल. मला आता संसारात देखील चांगलीच गोदी आली होती आणि सुखाचा असा संसार चालू होता.

माझे मोठे बंधु बाबुराव, माझा आणि त्यांच्यामधले नाते एका भावा भावाच्या नात्यापेक्षा अधिक मधाळ असे होते. काही दिवसपूर्वी त्याच्या डोक्यामधे एक छोटी गाठ आली होती. स्वभावानुसार त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले पन दिवसागणिक ती गाठ अधिकाधिक वाढायला लागली आणि मग एके दिवशी त्याने ती दवाखान्यामध्ये दाखवली. गाठ म्हटल्यावर तुम्हाला जे वाटले असेल त्याच गोष्टी निघायला सुरवात झाली.

बाबुरावला त्या दुर्धर आजाराने ग्रासले होते, जेव्हा वहिनींचा मला फोन आला तेव्हा माझ्या पायाखालचीच जमीन सरकली होती. डोक्यात एखादे रिळ फिरावे तशा गोष्टी दिसत होत्या. मी त्या दिवशी स्वामींच्या केंद्रात गेलो आणि त्यांना साकडे घातले. मी त्यांना दिवसभर कारण विचारत होतो. का ? काय गुन्हा आहे ? या प्रश्नांनी डोके भंडावून सोडले गेले होते. मी त्या दिवशी 100 दुर्गा सप्तशती आणि पारायण देखील करायला घेतले.

मी दुसर्‍याच दिवशी भावाकडे गेलो अनई त्याला घेऊन सरळ गानगापुर गाठले. भावाला स्वामींच्या पायावर घातले आणि म्हटले की, घ्या ! काय करायचे ते करा ? आता हा भर तुमचा ! काही दिवसांनी त्याच्या डोक्यातली गाठ काढण्यात आली चांगले मोठे ऑपरेशन देखील झाले. अनेक वेळ ही गोष्ट चालली होती आणि बाहेर सर्वांचा धावा चाललेला होता. मला माहिती होते की स्वामी त्यांचा भार हलका करणार.

बाबूरावला बाहेर आणला, तेव्हा तो बिनसुद होता आणि त्या दिवशी अनेक तास तो तसाच होता. डॉक्टरांनी सगळे व्यवस्थित झाल्याचे संगितले आणि हा आजार पसरतो की नाही हे काही महिन्यांनी कळेल असेही संगितले. गाठ काढलेली आहे पण पुन्हा अशी गाठ झाली तर … गोष्टी अवघड होत्या. बाबूला डिस्चार्ज झाला आणि तो बरा देखील झाला. मित्रांनो आज या गोष्टीला 4 वर्षे झाली आहेत पण पुन्हा उद्भवनारा हा आजार काही परत फिरून आला नाही. स्वामींनी त्यांचा आणि त्या अर्थाने आमचा भार हलका केला. स्वामी महाराजांच्या नावाचा जयघोष हा कॉमेंटमध्ये व्हायलाच हवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *