आपल्या हिंदुधर्मात गाईला खूप महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.आपल्या हिंदुधर्मात गाईला खूप पवित्र मानले जाते.धार्मिक कार्यामध्ये गाईला खूप महत्व प्राप्त असल्यामुळे शुभ प्रसंगी पूजा केली जाते. गाईच्या पोटात ३३ कोटी देवी देवतांचा वास असतो. गाईला मातेचा म्हणजे आईचा दर्जा देतो.

गाय हि खूप शांत आणि सौम्य असते. आपल्या हिंदुधर्माच्या पवित्र ग्रंथामध्ये गाईची महती आणि महिमेबद्दल खूप सुंदर वर्णन केले आहे.गाईचे देखील शुभ शकून मानले आहे. ज्यावेळी गाई रानातून चारून घरी येतात त्यावेळी त्यांच्या पायामुळे वातावरणात धुळीचे कण पसरतात.ती वेळ म्हणजे गोरज मुहूर्त आहे.

या मुहूर्तावर लग्न करणे खूप शुभ समजले जाते.जर आपण एका यात्रेला आणि देवदर्शनाला निघालो आहोत त्यावेळी वाटेत गाय दृष्टीस पडली तर आपली यात्रा सफल होते. आपली यात्रा समाधाने आणि आनंदाने पूर्ण होते. गाई ज्या ठिकाणी वास करते त्या ठिकाणी वास्तू दोष रहातच नाही.

कुंडलीत जर शुक्र ग्रह निच्च स्थानी असेल किंवा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत असेल तर दररोज सकाळी स्वयपाक करतानाची पहिली चपाती किंवा भाकरी गाईला घायला द्यावी. असे केल्यामे कुंडलीतील शुक्र ग्रहाची दिशा उत्तम आणि फलकारी होते. सूर्य,चंद्र,मंगळ किंवा शुक्र यांची युती जर राहुशी असेल तर पितृ दोष होतो.

असे म्हणतात की, सूर्याशी सं-बध वडिलांशी व मंगळाचा सं’बध रक्ताशी असतो. म्हणून सूर्य जर शनी,राहू किंवा केतू बरोबर स्थित असेल तर मंगळाची युती राहू बरोबर असेल तर पितृदोष निर्माण होतो.या दोषामुळे आपले संपूर्ण जीवन खडतर व संघर्षमय बनून जाते. जर तुमच्या सुद्धा कुंडलीत असा काही दोष असेल तर गाईला अमावास्येला पोळी, गुळ किंवा चारा खायला दिल्यास पितृदोष नष्ट होतो.

तुमच्या कुंडलीत जर सूर्य तुळ राशीत निच्च स्थानी असेल तर गाईमध्ये सूर्य व केतू नाडी असल्यामुळे गाईची पूजा करावी. यामुळे दोष दूर होईल. जर रस्त्याने जात असताना आपल्याला समोरून गाय येताना दिसली तर गाईला आपल्या उजव्या बाजूने जावू द्यावे. यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात.

गाईच्या तुपाचे सेवन केल्यास आपल्याला दीर्घायू होतो.आपल्या हातावरील आयुरेषा जर मध्येच खंडित झाली असेल तर गाईच्या तुपाचे सेवन करावे आणि त्यासोबत गाईचे पूजन करावे.

देशी गाईच्या पाठीवर कुबड असते. तो बृहस्पती असतो. म्हणून कुंडलीत बृहस्पती निच्च राशीत मकरेत असेल,अशुभ स्थितीत असेल तर देशी गाईच्या या बृहस्पती भागाला शिवलिंग समजून त्यांचे दर्शन घेवून गाईची सेवा करावी.

यासोबत घाईला गुळ आणि चणे खायला द्यावे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. हिंदुधार्मानुसार गृहप्रवेश करताना गाईला घरी आणून विधिवत पूजा केली जाते.यामुळे प्रत्येक कार्य शुभ बनते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *