नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! स्वामी भक्तहो, स्वामी समर्थांना मनापासून केलेली, भक्तीसेवा, आराधना या गोष्टी हव्या असतात. आणि कोणत्याही श्रद्धेचा देखावा स्वामींना आवडत नाही. परंतु, भक्तहो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, स्वामींचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, स्वामींना ज्या गोष्टी आवडतात, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत.

स्वामी समर्थांना काही खास गोष्टी अगदी मनापासून आवडतात. आणि जो भक्त ह्या गोष्टीचे पालन करतो, म्हणजेच मनापासून या गोष्टी करतो. त्या भक्तावर श्री स्वामी समर्थांची कृपा लवकर होते. आणि त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतात. तसेच, स्वामी त्या भक्तांच्या सर्व इच्छा भरभरून पूर्ण करतात.

म्हणून भक्तहो, तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल किंवा तुम्ही स्वामीभक्त असाल, तर तुम्ही या स्वामींच्या आवडत्या गोष्टी नक्की कराव्यात. कारण या गोष्टी तुम्ही श्रद्धापूर्वक आणि मनपूर्वक केल्यात, तर स्वामींची कृपा तुमच्यावर बरसेल. आणि भक्तहो, स्वामींना दुसरे काहीच हवे नसते, स्वामींना फक्त हवे असते. ते म्हणजे चांगले कर्म. आणि म्हणून आपणदेखील चांगले कर्म करत राहावे.

आणि चांगले कर्म केल्यास, स्वामीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच, भक्तहो, स्वामी समर्थ ज्या भक्तांच्या मागे उभे असतात, त्या भक्तांना कधी निराश आणि दुःखी होण्याचीदेखील गरज नसते. आणि श्री स्वामी समर्थ आपल्या विविध रूपाने आपल्या भक्तांना मदत करत असतात. जे भक्त स्वामींची सेवाउपासना करतात, त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.

आणि जो भक्त स्वामीसेवा करतो, त्यांनी इतरांचा अपमानदेखील करू नये, असे स्वामी सांगतात. तसेच कोणाला दाखवण्यासाठीही सेवा करु नये. स्वामींची भक्ती करताना मनापसून करावी. तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा अजिबात करू नये. याचबरोबर भक्तहो, स्वामींना विविध गोष्टी, विविध वस्तू, तसेच विविध पदार्थदेखील आवडतात.

आणि स्वामींना काही आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्यात, तर तुमच्या घरात सुखसमृद्धी, धनसंपत्ती हे विविध मार्गानी येण्यास सुरवात होईल. तर भक्तहो, स्वामींना कोणत्या वस्तू, कोणते झाड, फुल, आणि कोणते पदार्थ आवडतात या गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

1.स्वामींना आवडणारे प्राणी: भक्तहो, श्री स्वामी समर्थांना जनावरांमध्ये गाय आणि कुत्रा फार प्रिय होते. तर मांजरांवर स्वामींचे भयंकर राग होता. परंतु, स्वामी महाराजांना प्रतिबंध करणारा कोणी नसे. त्यामुळे स्वामी कित्येक दिवस जेवतच नसायचे. अगदी पाणीसुद्धा प्यायचे नाही. असे करता करता 8 दिवस निघून जायचे.

महिना जायचा. स्वामी जेवतच नसायचे. त्यामुळे स्वामींना कधी कधी इतकी भूक लागायची की स्वामी आरामात एका वेळेस 600, 700 भाकऱ्या खायचे. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसून अनेक बायका भाकऱ्या करायला लागायच्या. कधी कधी स्वामी एखाद्या गावकऱ्याच्या दारासमोर उभे राहून, ‘जेवण घाल ग माय! असे म्हणायचे.

आणि वाढलेले जेवण स्वामी घराबाहेरच घेऊन जेवायला बसायचे. त्यावेळेस त्यांच्या पानाजवळ अवतीभवती गाई, कुत्री जमायचे. त्यावेळेस स्वामी आपले जेवण गाईला, कुत्र्याला खाऊ घालत असायचे. आणि अत्यंत प्रेमाने त्या प्राण्यांना घास भरवत असायचे. तर भक्तहो आपणही गाई, कुत्र्यांचा अपमान करू नये. आपल्याला शक्य असेल, तर त्यांना निस्वार्थपणे खायला घालावे.

2.स्वामींना आवडणारी फुले:भगव्या रंगाची फुले स्वामी समर्थांना अतिशय प्रिय होती. त्यामुळे तुम्ही स्वामींची पूजा करताना स्वामींना भगवी फुले अर्पण करावी. तसेच, भक्तहो, स्वामींना चाफ्याची फुलेदेखील अतिशय आवडायची.

3.स्वामींचे आवडते पदार्थ: स्वामींना पदार्थांमध्ये पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कडबोळी आणि कांद्याची भजी अत्यंत आवडत असे. आणि अनेक प्रकारच्या भाज्या अतिशय प्रिय होत्या. तसेच भक्तहो, स्वामींना सकाळी उठल्यावर गोड पदार्थ खायला अतिशय आवडत असे.

त्यामध्ये कधी कधी मसाले दूध, खीर असे काही पदार्थ स्वामींना खाण्यास आवडायचे. त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थाना नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ दाखवावा. आणि स्वामीची मनोभावे पूजा करावी. यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील.

4.स्वामींचे आवडते झाड: स्वामी समर्थांचे आवडते झाड औदुंबर आहे. याशिवाय स्वामींना कडूलिंब हे झाडही विशेष प्रिय होते. एकदा अक्कलकोटमध्ये गावाबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एके दिवस रस्त्याने जाणाऱ्या मुसलमान इसमाने, त्या कडुनिंबाच्या झाडाची फांदी तोडायला कुऱ्हाडीचा घाव घातला.

आणि त्या झाडाच्या फांदीवर घाव घालताक्षणीच मठामधून स्वामी उठून उभे राहिले. आणि त्यांच्या भक्तांना म्हणाले, ‘अरे बघा रे कोण हरामखोर, माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे! आणि सर्व भक्ताने गावाबाहेर जाऊन त्या मुसलमान इसमाला झाड तोडण्यापासून पराभूत केले होते.

5.अन्नदान करणे: भक्तहो, स्वामी समर्थ नेहमीच गरजूंना अन्नदान करायचे. अगदी मुक्या प्राण्यांवर देखील ते प्रेम करायचे. त्यांना खाऊ घालायचे. आणि अन्नदान करणे हे सर्वात मोठे पुण्याचे दान आहे. हे आपणा सर्वानाच ठाऊक आहे. तर भक्तहो, स्वामींना अन्नदान करणे अतिशय आवडत होते.

मात्र बहुतांश लोक अन्नदान करतात. परंतु ते कोणत्यातरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात. कारण त्यामागे त्यांचा स्वार्थ असतो. तसेच, आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून काहीजण गाईला, कुत्र्यालादेखील चपाती किंवा भाकरी खाऊ घालतात.

पण हे अंत्यत चुकीचे आहे. अन्नदान गरीब व्यक्तीला दररोज करायला हवे. निदान एक चपाती किंवा एक भाकरी जे असेल, ते आपण एका गरीबाला नक्कीच देवू शकतो. मात्र अन्नदान करताना आपण कोणतीही इच्छा, अपेक्षा बाळगून अन्नदान करू नये. तर ही गोष्ट स्वामी समर्थांना अतिशय प्रिय आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *