नमस्कार मित्रानो आणि भगिनीनो मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी सेवेकरी सुंदराबाई या कोण होत्या? यांच्याबदल आज आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो स्वामी सेवेकरी सुंदराबाई काडगावकर ही सोलापुर मधील अकाली वैद्यकीय आलेली बाई होती. भरीस भर म्हणून तिच्या पायाला काहीतरी व्याधी झाली होती. अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष भगवंत भूतलावर आले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने सर्व व्याधी दूर होत असे.

मित्रांनो आणि भगिनीनो काही ऐकून सुंदराबाई पायाची व्याधी दूर करायला अक्कलकोटला जावे असे वाटू लागले. तिने अक्कलकोटचा रस्ता धरला एकडे अक्कलकोटमध्ये रोजच्या रोज वाढणारी गर्दीमुळे चोळप्पा ला सर्व व्यवस्था सांभाळणे कठीण होऊन बसले. येणाऱ्या यात्रेमुळे त्यांच्याकडे पुष्कळ धनसंपदा ही जमा होऊ लागली होती. योगीराज श्री स्वामी हे हल्ली बराच वेळ गावाजवळील भल्या मोठ्या वटवृक्षाखाली बसू लागले होते.

तेथेच त्यांचा दरबार बसे. सुंदराबाई अक्कलकोटमध्ये पोहचल्यानंतर श्री स्वामी कुठे आहेत अशी विचारणा करत वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामीमहाराजांपर्यंत पोहचली. श्री स्वामींच्या भोवताली लोकांचा गराडा पडला होता. चोळाप्पा ही तेथेच होता. सुंदराबाई स्वामींना नमस्कार करून रडत आपले गाऱ्हणे त्यांच्या कानावर घातले. श्री स्वामीनी तिला प्रसाद दिला, व पायाच्या दुखण्यावर उतार पडेल असे सांगितले. सुंदराबाईच्या बरोबर फक्त तिचा दीड वर्षाचा लहान नातू होता. सुंदराबाईनी अक्कलकोटात काही दिवस राहण्याचे ठरवले.

तसेच रोज माध्यमांनी व संध्याकाळी श्री स्वामी जिथे बसतील तेथे दर्शनासाठी जाण्याचा नेम केला.काही दिवसांतच तिच्या पायाचे दुखणे बरे झाल्यामुळे तिला श्री स्वामींच्या अलौकिक व दिव्य शक्तीची कल्पना आली होती.आई मोठी ल ढलगज होती तिला ही आधाराची गरज होती. तिने हे हेरले की सोळाप्पाची श्री स्वामी सेवेत खूपच धांदल उडत आहे, व त्या सहाय्यतामध्ये तिचा हातभार मिळेल आपले कामच होऊन जाईल.

मित्रांनो सुंदराबाईनी आता रोज चोळाप्पाच्या मागे लकडा लावला की मला तुमच्या मदतीस ठेऊन घ्या. मी ही श्री स्वामींची सेवा करेन. अक्कलकोटला योगीराज श्री स्वामींच्या दर्शनास येणाऱ्यांची संख्या आता अतिशय वाढू लागली होती. योगिराज्यांना स्नान घालणे, केशरकस्तुरीचा टिळा लावणे, जेवण भरवणे, वस्त्र नेसवणे हे सगळे काम एकटे चोळप्पाला करावे लागत असल्याने त्याची तारांबळ उडाली होती. सुंदराबाईचा प्रस्ताव चोळाप्पला आवडला होता.

चोळप्पाने एक दिवस संधी साधून योगीराज श्री स्वामीना विनंती केली की माझ्या मदतीसाठी सुंदराबाईस सेवेस ठेवायचा विचार करत आहे. स्वामींनी प्रस्ताव ऐकलं म्हणाले,की चोळप्पा सांभाळून राह बरे ही बाई तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल. चोळप्पा च्या लक्षात काही आले नाही, परंतु आपले कामात हातभार लावायला कुणी मिळाले याचा आनंदात त्याने सुंदराबाईस श्री स्वामींच्या सेवेस ठेऊन घेण्यास होकार दिला सुंदराबाई खूपच चतुर होती.

त्या आता मनापासुन स्वामींची सेवा करू लागली. आता चोळप्पाने देखील आपली सगळी कामे सुंदराबाईला सांगल्यास सुरुवात केली होती. स्वामींची वय सातशे वर्षाच्या आसपास असेल तरी बऱ्याच वेळा ते बाळभावात असल्याने त्यांना अगदी जेवण भरवण्यापासून सर्व बघावे लागत असे. सुंदराबाई ने त्यांना आईसारखे सांभाळण्यास सुरुवात केली. महाराज तिच्या वचनात असत कोण बाईची पूर्वपुण्याई असेल कोण जाणे.

महाराज्यांना निजा म्हणून सांगितले तर म्हणजे निजावे, उठा म्हणून सांगितले तर उठावे, आता जेवा म्हणून सांगितले तर जेवावे, नकों म्हणून सांगितले तर जेवू नये. तिने हळूहळू सर्व सेवा व सेवेकराचा ताबा स्वतःकडे घेतला.सुंदराबाईने महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली. जे पैसे द्यायला नकार देत त्यांना ती महाराजांचे दर्शन घेऊ देत नसे. तिने महाराज्यावर पगडा निर्माण केला होता.

तिची पूर्वपुण्याई खूपच होती. पण महाराजांनी तिला दूर लोटले नव्हते एकदा एका भक्ताने सुंदराबाई ला पैसे न देता महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरवले. सुंदराबाई एकदम चावतळली. महराज्याकडे धावत गेली महाराज्याचा गळा धरला. महाराज्यांना म्हणाली की पेढे खायचे नाही सुंदराबाई महराज्यावर खूपच अधिकार गाजवत असे. इतर सेवेकराना वाटायचे की स्वामी स्वतः अवतार आहेत तरी ते सुंदराबाईचे का ऐकतात.

कधीकधी स्वामी चोळप्पाला म्हनायचे . चोल्या सुंदराबाईची मस्ती वाढली आहे,परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही. एकदा एका भक्ताने महराज्यापुढे २५ रुपये ठेवले होते. महाराज त्याला म्हणाले की पैसे सोळप्पाच्या हातात ठेव, पण लगेच सुंदराबाईने त्या पैशावर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले. स्वामीनी आज्ञा देऊनही ते पैसे चोळप्पला दिले नाहीत. तेव्हा स्वामींना सुंदराबाईचा खूप राग आला.

ते सुंदराबाई वर खूप रागवले. त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला. तेव्हा तिने ते पैसे चोळप्पला दिले. खरेतर सोळप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होत. त्याने अनेक वर्षे स्वामींचे मनोभावे सेवा केली. पण नंतर त्याला सुद्धा पैशाचा लोभ झाला. तो स्वामींच्या पुढे जे येणारे पैसे स्वतःकडे ठेऊ लागला. स्वामी त्यावर प्रसन्न होते त्याला काही कमी नव्हते, पण तो लोभात अडकला होता.

सुंदराबाई आणि चोळप्पा लोभी झाले होते.म्हणून स्वामी महाराजानी त्यांचा हिसोब पूर्ण केला. श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींच्या लीला या आतर्क आहेत. स्वामी लीलाचे वैशिष्ट्य असे आहे की स्वामी लीलेत सकारात्मक पात्र असुदे की किंवा नकारात्मक पात्र असुदे ते सतत आपल्याला काहींना काही शिकवत असतात. ते आपल्याच मनाचे प्रतिबिंब असते. जस की सुंदराबाई नकारात्मक पात्र होती. यातून स्वामी महाराज आपल्याला आपल्या मनाच्या विविध विकाराचे दर्शन घडवत आहेत.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *