नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आज मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या नित्य उपासनेतील एक अतिशय महत्त्व पूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांपैकी काही लीलांचे समावेश केलेला आहे. या ग्रंथाचे १०८ पारायण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामींचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो.

या ग्रंथात २१ अध्याय असून प्रत्येक सेवेकऱ्यानी क्रमशः तीन अध्याय वाचन केले पाहिजे. ही पोथी विष्णू बळवंत थोरात यांनी १८९७ साली ही २१ अध्यायाची छोटी पोथी प्रकाशित केलेली होती. त्यानंतर इ स.वी. सन १९१५ आणि १९६८ साली या पोथीच्या आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या.

त्याच मूळ प्रती वरून कोणताही बदल न करता सद्गुरू परमपूज्य मोरे दादा यांनी १९७२ साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाबद्दल खूप साऱ्या जणांच्या मनात शंका अजून आहेत. ते म्हणजे हा ग्रंथ कसा वाचावा? कोणी वाचवा? कधी वाचवा? किती पारायणे करावीत? तर असे अनेक प्रश्न अनेक सेवेकऱ्यांच्या मनात येत असते.

तर मित्रहो स्वामी चरित्र सारामृतमध्ये २१ अध्याय असतात. यामध्ये स्वामींच्या लीलांचे वर्णन केलेले आहे. तुम्ही जर का श्रद्धेने, मनोभावे, दिवसभर कधीही या अध्यायाचे वाचन केले तरी चालते. म्हणतात ना “अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे स्वामी चरित्र” तर हे ग्रंथ कसे वाचावे.

तर मित्र हो, या ग्रंथात २१ अध्याय असतात. या ग्रंथातील किमान तीन अध्याय दररोज वाचायचे. अशा प्रकारे तीन अध्याय वाचले की ७ दिवसात २१ अध्याय पूर्ण होतात. ७ दिवसात २१ अध्याय पूर्ण झाले म्हणजे १ पारायण पूर्ण झाले. अशा प्रकारे तुम्ही १०८ पारायण करू शकता. कोण कोण रोज १ अध्याय देखील वाचतात.

तर कोणकोणते सेवेकरी दर गुरुवारी २१ अध्याय वाचून पूर्ण १ दिवसाचे पारायण करतात. आपल्या नित्य सेवेत स्वामींच्या षडाक्षरी मंत्राला म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि श्री स्वामी चरित्र सारामृताला महत्व आहे म्हणून दररोज तीन अध्याय आणि श्री स्वामी चरित्र सारामृतातील क्रमशः तीन अध्याय हे रोज वाचायचे आहेत.

दररोज तीन अध्याय का बरे वाचावे? पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो. आणि दुसरा अध्याय हा वर्तमानकाळासाठी तर तिसरा अध्याय हा आपल्या भविष्य काळासाठी असतो. आपले संपूर्ण आयुष्य सुखमय होण्यासाठी हे अध्याय वाचून आपण स्वामींना शरण जावू शकतो. यांनतरचा प्रश्न असा की हे अध्याय कोणी वाचावे?

हे अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे कोणीही वाचू शकतो. मनात मात्र श्रद्धा हवी. काही जण विचारतात. आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी चरित्र ग्रंथ वाचू शकतो का? तर हो मित्र हो स्वामींच्या सेवेत कोणत्याच अटी नाहीत. कोणतीही बंधने नाहीत. तर तुम्ही हे पारायण किती श्रद्धेने करता याला महत्व आहे.

म्हणतात ना स्वामी चरित्र सारामृत वाचता ऐकता सकल दोष जातील. म्हणजे मित्रहो. तुम्हाला जर हे चरित्र वाचता येत नसेल तर फक्त हा ग्रंथ ऐकलात तर त्याचे संपूर्ण फळ हे मिळणार आहे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकले तरी त्याचे फळ मिळते.

स्वामी चरित्र सारामृताला स्वामींच्या नित्य सेवेत अनन्य साधारण महत्त्व आहे. तर चला मित्रहो रोजच्या नित्यसेवेत श्री स्वामीं चरित्र सारामृत अध्याय वाचून आपण आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूया. सेवा करूया आणि सेवेकरी बनुया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *