एक लव मॅरेज सोडले तर, पती पत्नी मधील शारीरिक संबंधच या नात्याला हळुवारपणे दृढ बनवतात. किंबहुना एकमेकांशी मानसिक जवळीकता साधायची तर, ती प्रथम इथूनच सुरुवात होते. हे बहुतांश पती पत्नी नात्यात होते आणि व्हावे अशीच अपेक्षा असते. (मुद्दाम लक्षात घ्या वडीलधारे उगीच म्हणत नसतात, अरे होवुद्या एखादे पोर. पोर झाल्यावर बघा कसे लाईनवर येतात पती पत्नी संबंध). आणि शारीरिक संबंध हा नुसताच प्रजोत्पादनसाठी नसून, कित्तेक सांसारिक कठीण प्रसंगातही दिलासा देणारा दुवा ठरतो. एखाद्या त्रांकविलायझर च्या गोळी सारखा प्रभाव पाडतो.

सुखी संसार म्हणजे….
आता जर का पती पत्नीनेच एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत किंवा ठेवले नाहीत तर त्या मानसिक जवळीकीची सुरूवात कोठून होणार. आणि बहुतांश लग्न संबंधात प्लेटोनिक लव वगैरे प्रकार नसतोच. तसे असेल तर एकवेळ अशा उदात्त उद्देशाने पती पत्नी एकत्र संसार करू शकतील. पण असे संबंध विरळाच सापडतील. तेंव्हा सर्व साधारण पती पत्नीसाठी शारीरिक संबंध आवशक्यच आहेत. किंबहुना पती पत्नी मध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या वादाच्या प्रसंगाला सावरून पुढे नेणारे हे एक पोझीटीव हत्त्यार आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे एक मेकांच्या शारीरिक गरजा. दोघानाही त्याच तीव्रतेच्या गरजा असतील असे नाही. यामध्ये एकमेकाला समजून घेणे,सांभाळून घेणे यासारखा उपाय नाही. यामध्ये समुपदेशनाने मार्ग काढता येवू शकतो. पण संबंधच नाहीत अशाने मानसिक कॉम्पलिकेशनला सुरूवात व्हायची शक्यता निर्माण होते.

कारण कोणा एकाची किंवा दोघांचीही विशिष्ट भूक मारली जाते. अशा वेळी ही समुपदेशन कामाला येवू शकते. नाहीतर बनियान ला पडलेल्या छोट्या छिद्राचे भगडाद व्हायला वेळ लागत नाही. आणि संसार राहतो बाजूला, छिद्रे लपविण्यात आयुष्य निघून जाते.

मग इथून पुढे , जर दोहो पैकी कोणी जास्त सोशिक असेल तर, सुरू होतो एक नाईलाजाचा आणि नैराश्याचा थकविणारा प्रवास. अस्वथता प्रसंगा गणीक वाढत जाते. जे नात दूध साखरे सारखं मिसळायला हवेते नासलेल्या दुधासरखे फाटायला लागते. आणि मग असाही एक दिवस येतो स्थिती सावरण्याचा पलीकडे जाते, डायण्यामाईट ची वात जळत जळत दारू पर्यंत पोहोचतेच,

आणि अचानक स्फोट होतो. स्फोट किती तीव्रतेचा यावर निष्कर्ष येवुन थांबतो. तो असतो छळ, विभक्ती, क्वचित प्रसंगी स्थिती जीवावर बेतते. नोंद घ्या हे सारे नकळत सावकाशीने घडत असते, फक्त ते समजण्याची मानसिक मृदुलता हवी असते. स्वाभाविकपणे जी कित्येकजण तोपर्यंत हरवून बसलेले असतात.

तेंव्हा सर्व साधारण जोडप्यांसठी शारीरिक संबंध एक वरदान ठरते. मग अशा वरदाना कडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यापेक्षा, जाणीवपूर्वक काळजी घ्या आणि सुखी व्हा….

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *