नमस्कार मित्रांनो, सध्याच्या को-रोनाच्या या म हा मा री च्या काळात लोकांना सं-सर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी शुद्ध वातावरणाची गरज आहे. दवाखान्यात ऑक्सिजन पुरवठा जेंव्हा खंडित झाला तेंव्हाच निसर्गात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत, निसर्गातील झाडांची किंमत समजली.

त्यामुळे तुम्ही घरी, अंगणात, बाल्कनीत ही झाडे लावा, ज्यातून ऑक्सिजन पुरवठा तुम्हाला आणि तुमच्या घरातील सदस्यांना मुबलक प्रमाणात होईल व तुमचे जीवन सुरक्षित राहील. यामध्ये प्रामुख्याने पहिले झाड म्हणजे मनी प्लॅन्ट, या झाडातून खूप प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होते आणि दुसरे म्हणजे याचा फायदा घरात पैसा येण्यासाठी होतो.

हे झाड 24 तास ऑक्सिजन देत असते आणि वातावरण शुद्ध ठेवण्याचे काम करते. हे झाड लावण्यासाठी याचा छोटा भाग जरी लावला तरी हे झाड वाढत राहते. हे झाड तुम्ही तुमच्या खोलीत खिडकीजवळही ठेऊ शकता. दुसरे झाड जे प्रत्येकाच्या अंगणात असतेच परंतु त्याची काळजी घेऊन त्याची योग्य मशागत करावी.

तुळशीचे रोपटे आपल्या घरात असणे अतिआवश्यक आहे कारण याने वातावरण शुद्ध राहते. आयुर्वेदात याला खुप महत्व आहे. हिंदू ध-र्मातील शास्त्रानुसार तुळशीला माता म्हणले जाते. याच बरोबर पुढील वृक्ष म्हणजे कोरफड. कोरफड लावल्याने वातावरण आणि घरातील हवा शुद्ध राहन्यास मदत होते आणि हे झाड तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा ठेऊ शकता.

या झाडांना रोज सकाळी उठल्यावर पाहताच मन प्रसन्न होऊन घरातील वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होते. या झाडांमुळे जंतूंचा नाश होतो. ही झाडे कुठेही सहज मिळतात. तसेच एरिका पाम हे झाड 24 तास ऑक्सिजन पुरवठा करते. हे झाड थोडे आकाराने मोठे असते. पण तुम्ही याला घरात पण ठेऊ शकता. 4, 5 दिवस याला सूर्यप्रकाशामध्ये ठेऊन पुन्हा घरात ठेऊ शकता.

तसेच तुम्ही घरात कायम ऑक्सिजनचा पुरवठा राहण्यासाठी सिंगोनीयम या जातीचे झाड लावू शकता. याचे भरपूर प्रकार आहेत. याने खुप प्रमाणात घरात ऑक्सिजन पुरवठा होतो. याची काही झाडे बाहेर आणि काही तुमच्या खोलीत पण ठेऊ शकता. याने मोठया प्रमाणात वातावरण शुद्ध होण्यास मदत होते.

कडुलिंबाचे झाडही आपण लावू शकता. कडुलिंबाच्या झाडाचे उपयोग आयुर्वेदामध्ये भरपूर सांगितले आहेत. याने वातावरणातील जंतु व कीटक दूर होतात. इतकेच नव्हे तर ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतो. अशा प्रकारे ही सर्व झाडे लावल्याने आपण घरात ऑक्सिजन पुरवठा भरपूर प्रमाणात होईल आणि हवा शुद्ध होइल.

ही सर्व प्रजातीची झाडे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देण्याचे काम करतात. तसेच त्यामुळे बाहेरील वातावरणाचा प्रादुर्भाव तुमच्या घरावरती पडणार नाही. तसेच या झाडांचा अजून एक लाभ म्हणजे या झाडांचा औ-षधी उपयोग, जसे की त्यांचे खोड, पाने , फुले यांच्यापासून आपल्याला आयुर्वेदिक औ-षध बनवता येते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *