नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya ” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊयात ओमकराचे फायदे…!!

कसे करावे ओम् उच्चारण?
ओम् उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोजिशनमध्ये बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल.

ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम –
मानवी मनाची शुद्धता करणे. मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे. मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.
शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे.

ओम् कर जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होवून, ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते.

ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण –
हिंदू धर्मात ओंकाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात. मंत्रोच्चारात ओंकार नसल्यास मंत्र अपू्र्ण वाटतात. परंतु धार्मिक महत्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्वही आहे. होय, ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात. तुम्ही अनभिज्ञ असलेल्या ओंकाराच्या फायद्यांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

थायरॉईड – मित्रांनो, ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो. अस्वस्थता – मित्रांनो, तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. तणाव – यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.

रक्तप्रवाह – यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. पचन – ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते.
स्फूर्ती – ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो.
थकवा – थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही.
झोप – ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे.

फुफ्फुस – ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. पाठीचा कणा – ओकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *