नमस्कार मित्रांनो.. Marathi दुनिया या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो आपल्यापैकी सर्वांनाच असे सांगितले जाते की मनामध्ये जर एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख-समृद्धी नांदावे यासाठी प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी पारायण नक्की करावे आणि त्याचबरोबर मित्रांनो गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे आपल्याला अनेक लाभ होतात असे आपल्याला सांगितलं जातं परंतु मित्रांनो पारायण केल्याने काय होते? व अनेकदा कानावरही पडला असेल. खासकरून दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन, किंवा शेगाव गजानन महाराजांचा प्रगट दिन यावेळी पारायण हमखास केले जातात. काय असते पारायण? का करावे? काय मिळते पारायण करून? याबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

आणि मित्रांनो परायण राहणे म्हणजे पारायण करणे होय पारायणाची किती प्रकार असतात हा प्रश्न सगळ्यांना पडत असतो. तर पारायण करण्याचे चार प्रकार असतात ते म्हणजे एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत पूर्ण करणे.म्हणजे एक दिवसात 21 अध्याय वाचून पूर्ण करणे. रोज एक अध्याय प्रमाणे 21 दिवसात 21 अध्याय पूर्ण करणे.

दुसरं असत रोज तीन अध्याय प्रमाणे सात दिवसात 21 अध्याय पूर्ण करणे आणि तिसरं असते रोज 7 अध्याय प्रमाणे, 3 दिवसात 21 अध्याय पूर्ण करणे. आणि मित्रांनो साधारणतः आपल्यातील अनेक लोक हे रोज तीन अध्याय प्रमाणे सात दिवसात 21 अध्याय पूर्ण करतात.

आणि मित्रांनो तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की, पारायण करताना कोणते नियम किंवा पथ्य पाळणे आवश्‍यक असते. मित्रांनो पारायण करत असताना सर्वात आधी एक वेळ ठेवून वाचन करणे महत्वाचे असते, म्हणजे जर आज सकाळी तुम्ही 7 ला पारायणास बसला आहात, तर उद्या ही त्याच वेळी पारायण सुरु करणे मग ते सात दिवसांचे असुद्यात किंवा तीन दिवसाचे असू द्या.

तुम्ही सकाळी सातची वेळ ठेवला आहे, तर तुम्ही सात वाजेला परायनाला बसायला हवे. असे नाही की तुम्ही आज सात वाजता केली उद्या नऊ वाजता नंतर अकरा वाजता पारायणाला सुरुवात केली तर अस करू नका तर सर्व नियांचे पालन करा.मित्रांनो जर तुम्ही 7 वाजता परायनाला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशीही सात वाजताच पारायण करावे. नंतर एकभुक्त रहाणे व एक कडधान्य खाणे.

म्हणजे जर तुम्ही रोज उपवास करतात आणि सायंकाळी उपवास सोडतात तर तुम्ही मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल तर सातही दिवस तेच खावे आणि त्यात बदल करू नये. जर तुम्ही एखादी कोणती डाळ आणि पोळी किंवा भाकरी तुम्ही पहिल्या दिवशी खात असाल तर तुम्ही सातही दिवस तेच खायचे. दुसरे त्यात बदल करू नये. यानंतर पायात चप्पल न घालने. बरेच लोक सात ही दिवस म्हणजे जेवढे दिवस पारायण करतात तेवढे दिवस पायात चप्पल घालत नसतात.

पण बरेच लोक आजकाल नोकरी करतात धंदा करतात किंवा घरातून बाहेर पडतात. तर ते लोकांकडून हा नियम पाळला जात नाही. शक्यतो पाळा जर नाही जमला तर नाही पाळला तरी चालते. सर्व दिवस काया वाचा मने किंवा ब्रह्मचर्याचे पालन करणे. साध्या चटईवर वर किंवा कामाळावर झोपणे. सतरंजीवर झोपणे म्हणजे बेडवर, पलंगावर झोपायचा नाही.

सोफ्यावर बसायचं नाही. बसायचे असेल तर जमिनीवर बसायचं. झोपायचे असेल तर जमिनीवर सतरंजी टाकून झोपायचं. असे नियम यांचे पालन करावे लागतात खोटे बोलायचे नाही. संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे आणि या नियमांचे तुम्ही कठोरतेने पालन करावे. यात परायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजे पारायण होय.

तर मित्रांनो आता असा प्रश्न निर्माण होतो की हे कठोर नियम पाळून आपण गुरुचरित्राचे पारायण करतो तर यामुळे आपल्याला कोणकोणते लाभ होतात तेव्हा मी पारायण केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात तर याचे उत्तर म्हणजे पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे म्हणजेच स्वामींकडे आपल्या गुरुंकडे सांगणे असते म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय.

बळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईला आणि गुरुलाच म्हणजे स्वामींना समजते. तसेच आपल्या भक्तांसाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो. आपण केवळ तेच संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे असते.

आणि मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने एक पारायण केले तर यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न आणि शुद्ध होते, घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जेव्हा ही पारायणाला सुरुवात कराल तर पारायण वाचण्याआधी तुम्ही संकल्प सोडा.

मित्रांनो संकल्प सोडताना आपल्याला हातात पाणी घेऊन त्या ताटात पाणी सोडा आणि जी पण इच्छा असेल जे पण संकट असतील, ज्या पण समस्या असतील त्या गुरूला बोला, स्वामींना बोला मित्रांनो यामुळे स्वामी आपल्या सर्व अडचणी दूर करतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *