मंदिरातले कासव ओलांडून जाऊ नका किंवा चुकूनही पाय लावू नका; वाचा त्याचे महत्त्व! मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना अनेकदा आपला पाय बिचाऱ्या कासवावर पडला असेल. त्यावर कोणी फुले वाहिली असतील, तर ते आपले लक्ष वेधून घेते, पण अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगमरवरी असल्यामुळे आपल्या दृष्टीक्षेपात येत नाहीत. तसे असले, तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्याला पूर्वजांनी घालून दिला आहे. त्याचे आपण पालन करतो.

परंतु, प्रश्न असा पडतो, की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल? यावर छान माहिती मिळाली-कासव हे प्रतीक रूप आहे. कासव ठेवण्याची दोन कारणे आहेत. कासवाची आई आपल्या पिलांकडे केवळ वात्सल्य दृष्टीने पाहून त्यांचे पोषण करते.

त्याचप्रमाणे देवळातील देवानेही आपल्याकडे वात्सल्य दृष्टीने पहावे असे त्यातून सूचित केले आहे.दुसरे कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय आत खेचून घेते, त्याप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम क्रोधादिक विकार आवरून मगच दर्शन घेतले पाहिजे.

कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते, तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल, तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सान्निध्य लाभेल.तसेच कासवाचे पुढील गुण शिकण्यासारखे आहेत

कासवाचे गुण:-
शरणागत भाव असणे : यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.

सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्नरत असणे : काही
मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर
उचलणे म्हणजे कुंडलिनी आणि देवतेकडून जागृत होणे
प्रक्षेपित होणाऱ्या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची
धडपड दर्शवणे.

आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे : आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायम स्वरूपी रहाते. कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ ‘कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.वास्तूशास्त्राच्या दृष्टीने कासवाचे महत्त्व :

आपल्या घरात पितळाचे कासव ठेवावे कूर्म म्हणजे श्रीविष्णूला आपल्या घरात ठेवल्याने श्रीविष्णू सोबत श्रीमहालक्ष्मी वास आपल्या घरात राहतो.घरत देवा समोर किंवा तिजोरी उत्तर दिशेच्या विरुद्ध करून पाण्यात ठेवावे त्यातील पाणी रोज पुर्ण घरात शिंपडावे.

वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात. हे दोष दूर करण्यासाठी आधार घ्यायला हवा. साधनांच्या आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात. यासंदर्भात खालील टिप्सचा वापर करा.

वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव फार गुणाचे आहे. घरात कासव असेल तर घरातील रोग व शत्रू दूर रहातात.
करीयर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी धातुनिर्मित कासव घरात आणा. त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवा. कासव स्वतः दीर्घायुषी (120 वर्ष आयुष्य आहे कासवाला) असते. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *