नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. असे मानले जाते की जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी सोबत आणल्या. म्हणूनच नारळाच्या झाडाला श्रीफळ असेही म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी अर्थात नारळ लक्ष्मी आणि विष्णूंचे फळ आहे. नारळ हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले जाते. श्रीफळ हे भगवान शंकराचे सर्वात प्रिय फळ आहे. मान्यतेनुसार नारळाचे तीन डोळे त्रिनेत्र म्हणून पाहिले जातात. नारळ खाल्ल्याने शारीरिक दुर्बलता दूर होते. इष्टाला नारळ अर्पण केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात.

आपण कोणत्याही मंदिरात गेलो की अनेक पुरुष नारळ फोडताना दिसून येतात. तसेच मोठ्या मंदिरांमध्ये काही पुरुषांसाठी निव्वळ नारळ फोडण्यासाठी नियुक्‍ती केलेली असते. महिला किंवा मुली तुम्हाला कधीही नारळ फोडतांना दिसणार नाही. तसेच बऱ्याचदा आपल्या दिसून येते की मंदिराचे पंडितच नारळ फोडण्याचे काम करतात. मात्र, स्त्रिया नारळ फोडताना कधीही दिसत नाहीत.

घरातील व्रतवैकल्य ते अंतराळातील यशस्वी झेप अशा प्रत्येक बाबतीत आघाडीवर असलेल्या महिलांना कधी मंदिरात नारळ फोडताना पाहिलं आहे का? अर्थातच नाही, मात्र असं का? याचा विचार केलाय? काय असतील यामागची कारणे? चला जाणून घेऊ.

भारतीय उपासना पद्धतीत नारळ म्हणजेच श्रीफळाला महत्त्वाचे स्थान आहे. कोणतीही वैदिक किंवा दैवी उपासना पद्धत श्रीफळाच्या आहुतीशिवाय अपूर्ण मानली जाते. महिला नारळ फोडत नाहीत, हेही वास्तव आहे. शास्त्रानुसार स्त्रियांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. यामागे एक कथा ही अशी प्रचलित आहे की, जे ब्रह्मऋषी विश्‍वमित्र होते त्यांनी या विश्‍वाची निर्मिती केली. मात्र, हे विश्‍व निर्माण करण्यापूर्वीच ब्रह्मऋषी विश्‍वमित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती. म्हणूनच या नारळाला मानवाचे प्रतिरूप मानले जाते.

श्रीफळ हे बीज रुप आहे, म्हणून ते उत्पादनाचा घटक मानला जातो, म्हणजेच पुनरुत्पादन. श्रीफळाचे झाड प्रजननक्षमतेशी जोडलेले आहे. स्त्रिया बीजरूपातून मूल जन्माला घालतात आणि त्यामुळे स्त्रीने बीज स्वरूपात नारळ फोडणे अशुभ मानले जाते. देवतांना श्रीफळ अर्पण केल्यावर फक्त पुरुषच ते फोडतात. शनीच्या शांतीसाठी शिवलिंगावर नारळाच्या पाण्याने रुद्राभिषेक करण्याचाही शास्त्रीय नियम आहे.

भारतीय वैदिक परंपरेनुसार, श्रीफळ हे शुभ, समृद्धी, आदर, प्रगती आणि सौभाग्य यांचे सूचक मानले जाते. एखाद्याला आदरांजली वाहण्यासाठी शाल सोबत नारळ अर्पण केली जाते. भारतीय सामाजिक रीतिरिवाजांमध्ये देखील शुभशकून म्हणून श्रीफळाला अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. विवाह निश्चित करण्यासाठी, म्हणजे सुपारी फोडण्यच्या वेळी श्रीफळ दिले जाते. लग्नानंतर पाठवणीच्या वेळी नारळ आणि पैसे दिले जातात. अंत्यसंस्काराच्या वेळीही चितेसोबत नारळही जाळला जातो. वैदिक विधींमध्ये, सुकलेले नारळ विधीपूर्वक होममध्ये अर्पण केले जाते.

नारळात कॅलरीज भरपूर असतात, ते थंड असते. त्यात अनेक पोषक घटक असतात. नारळा मधून जे पाणी निघते त्याला नीरा म्हणतात, ते गोड पेय मानले जाते. झोपेच्या वेळी नारळ पाणी प्यायल्याने रक्तवहिन्यासंबंधी प्रणाली मजबूत होते आणि चांगली झोप लागते.

त्याच्या पाण्यात पोटॅशियम आणि क्लोरीन असते जे आईच्या दुधासारखे असते. ज्या बालकांना दूध पचत नाही त्यांना नारळपाणी दुधात मिसळून द्यावे. जुलाब झाल्यास नारळ पाण्यात लिंबू मिसळून प्यावे. त्याची मलाई खाल्ल्याने लैंगिक शक्ती वाढते. ही मलाई साखरेसोबत खाल्ल्याने, गरोदर महिलेची शारीरिक दुर्बलता दूर होऊन मूल सुंदर व सुदृढ होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *