नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! २०२३ मधील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना खूप खास असणार आहे. कारण डिसेंबर महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत

ज्याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य, शुक्र, गुरू, बुध आणि मंगळ आपल्या चालीत बदल करणार आहेत. या पाच ग्रहांच्या परिवर्तनामुळे काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. ज्यांना या वर्षातील शेवटचा महिना शुभ ठरु शकतो ते जाणून घेऊया.

सूर्य गोचर – डिसेंबर महिन्यातील १६ तारखेला सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतील आणि ते १ महिना याच राशीत राहतील. सूर्यदेवाते हे गोचर मीन, मेष आणि धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

बुध गोचर – २८ डिसेंबर रोजी बुध ग्रह राशी बदल करणार असून सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या काळात मेष, धनु आणि मिथुन राशीच्या लोकांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे.

शुक्र गोचर – २५ डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी शुक्र आपली राशी बदलेल, ज्यामुळे सिंह, मकर आणि कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्यासह व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो.

गुरु गोचर – मिथुन, मेष, कर्क आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरूचे डिसेंबर महिन्यातील गोचर फायदेशीर ठरू शकते. डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात गुरु मार्गी होणार आहे. ३१ डिसेंबर रोजी गुरु ग्रह थेट मेष राशीत जाणार आहे, ज्याचा वरील राशींना फायदा होऊ शकता.

मंगळ गोचर – रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी मंगळ आपली राशी बदलेल. २७ डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. यामुळे कर्क, मीन, तूळ आणि मेष राशीच्या लोकांना मंगळ गोचरचे शुभ परिणाम मिळू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniyaआमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *