परपुरुषामधे रस असणे ह्या विधानाला वरकरणी अयोग्य म्हणता येईल. पण स्वच्छ दृष्टीने जास्त विचार केला तर हे आजच्या समाजात होणे अनिवार्य आहे. कारण एकदा स्त्री घराबाहेर पडली की तिचा संबंध अनेक स्त्री-पुरुषांशी येत असतो व त्यांच्या संबंधात काही प्रमाणात रस घ्यावाच लागतो, पण तो वेगळ्या अर्थाने.

आज स्त्री जीवनाचे अनेक पापुद्रे उलगडत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी चूल व मूल यात गुंतलेली स्त्री खूप नवे जग पाहते आहे. ती आज परपुरुषाकडे सहाध्यायी, सहकारी, प्रामाणिक मित्र, किंवा काही प्रमाणात समविचार असलेली व्यक्ती या दृष्टीने मोकळेपणाने पाहू शकते व अशा संबंधात रस घेऊ शकते. हे तर बुद्धी असण्याचे प्रतीक आहे.

मला महाभारतात असलेला द्रौपदी व कृष्ण यांचा एकमेकांत असलेला ‘मैत्रिरस’ हे एक आजच्या काळासाठी छान उदाहरण वाटते. तो रस ना कृष्णाचा आपल्या पत्नीच्या संबंधांच्या आड आला न द्रौपदीच्या पांडवांशी असलेल्या नात्याच्या आड आला. उलट ह्या मैत्रीतून चांगलेच निष्पन्न झाले.

त्यामुळे अश्या संबंधातून तुम्ही काय शोधता हे अतिशय महत्वाचे असते. सुखदुःखाच्या बाबी शेअर करणे, अधिकाराने सल्ला मागणे व देणे किंवा आणखी काही भरीव मदत करणे, संवाद साधणे, मिळून काही बौद्धिक व सामुहिक ॲक्टिव्हिटी करणे असे अनेक प्रकार आज परस्त्री व परपुरुषांमधे असू शकतात व जर ते पति पत्नीच्या संबंधांच्या आड येत नसतील तर ते एका healthy समाजाचे लक्षण समजावे लागेल.विश्वास हा अशा संबंधांचा मूळ पाया असतो

व त्याचा दुरुपयोग न करणे ही दोन्ही बाजूंची पहिली जबाबदारी असते.आमची शाळा सहशिक्षणाची होती. १९७२ च्या काळात मुलामुलींनी एकमेकांशी बोलणे केवळ अशक्य असायचे, क्वचित प्रसंगी सोडले तर. पण ४६ वर्षांनी आम्ही भेटलो तर हा विश्वास एकदम आलेला दिसला. व तो टिकला. आम्ही आज बऱ्याच संयुक्तपणे ॲक्टिव्हिटी करतो. ते सगळ्यात महत्वाचे.

आज मागे वळून पाहताना असे वाटते की हा संवाद शाळेत असताना राहिला असतातर पुढे ५०% समाजाकडे (म्हणजे स्त्रियांकडे) पाहण्याचा दृष्टिकोन आणखी समतोल‌ राहिला असता.‌ कारण जेंव्हा संवाद नसतो तेंव्हा अपसमज वाढतात. तणाव वाढतो. मर्यादा न सोडता परस्त्रीपुरुषांमधे विचार व कृतीची देवाणघेवाण होणे हे सुसंस्कृतपणाचे आज लक्षण होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *