नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! पैसा म्हणजे जीवन नाही मात्र जीवन जगण्यासाठी पैसा लागतो. मित्रांनो कितीही कटू असल तरी हेच आजच सत्य आहे. म्हणूनच प्रत्येक जण पैश्याच्या पाठीमागे धावताना, धडपडताना आपण पाहतो. हे वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखाच, समाधानाच आणि सोबतच भरपूर धनसंपत्तीच जावो.लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावरती बसरत आहे. अगदी बहुविध मार्गांनी तुमच्याकडे पैसा येऊ लागेल.

आणि या पैशांमध्ये वृद्धी म्हणजेच वाढ सुद्धा होईल या टीप्स कोणत्या आहेत अगदी झटपट जाणून घेऊया. मित्रांनो घराबाहेर पडताना नेहमी आपल्या उजव्या खिशामध्ये किमान एक तरी नाण नक्की ठेवा. एक रुपया, दोन, पाच किंवा दहा या पैकी कोणतही एक सिक्का.

किंवा जास्त सिक्के आपल्या उजव्या बाजूच्या खिशामध्ये किंवा वस्त्रमध्ये नक्की आपण ठेवा. आणि त्या नंतर घराबाहेर पडा. हे सिक्के सातत्याने तुमच्या जवळ राहतील याची काळजी घ्या. मित्रांनो लॉ ‘ऑफ आट्रॅक्षण नुसार’ तुमच्या जवळ लक्ष्मी आहे. या सिक्क्यांच्या रुपात तर फार प्रमाणात लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते.

लक्ष्मी म्हणजेच पैसा. या जगामध्ये या ब्रम्हांडामध्ये एक नियम आहे की दोन सारख्या वस्तू नेहमी एकमेकांना स्वतः कडे आकर्षित करतात. सारख्या याचा अर्थ पैसा पैश्याला आकर्षित करतो. तुम्ही जर विज्ञानाच्या भाषेत म्हणाल तर साऊथ – साऊथ, नॉर्थ – नॉर्थ या बाबतीत मी ते बोलत नाहिये.

तर पहिला नियम लक्षात ठेवा आपल्या खिश्यामध्ये सातत्याने काही नाणी आपण बाळगायची आहेत. जर संपूर्ण वर्षभर हीच नाणी तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला तुमचं पॉकेट, तुमचं कपाट, तुमची तिजोरी ही कधीच रिकामी राहणार नाही.

दुसरी गोष्ट आपल्या संपत्तीचा किंवा आपल्याकडे किती पैसा आहे, किती संपत्ती आहे, कोणत्या मार्गानी आपण पैसा कमावतो या विषयी नेहमी गुप्तता बाळगा. या विषयी कधीच कुणालाही सांगू नका. अगदी कितीही जवळची व्यक्ती आहे तुमचा मित्र, तुमचा पार्टनर आहे यांना याबाबत कधीही सांगू नका. अन्यथा तुमच्या संपत्तीला भोके पडतात. वेगवेगळ्या मार्गांनी संपत्तीचा क्षय होऊ लागतो, संपत्तीचा नाश होऊ लागतो.

तिसरी गोष्ट जी मी वारंवार सांगतो. आपल्या पॉकेट मध्ये आपल्या पर्स मध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता किंवा आपल्या कपाटामध्ये, तिजोरीमध्ये जिथे आपण पैसे ठेवले आहेत, सोन नाण ठेवलेलं आहे त्या ठिकाणी अनावश्यक गोष्टी कधीही ठेवू नका. पैश्यांसोबत काही कागदाची तिकीट असतात. बिलाची काही पत्र असतात, पावत्या असतात. या ज्या काही अनावश्यक गोष्टी आहेत.

त्या लक्ष्मीच्या मार्गामध्ये बाधक बनतात म्हणून अश्या गोष्टी पैश्यासमवेत आपण ठेऊ नयेत. मित्रांनो अनेक लोकांच्या घरामध्ये नाणी, नोटा इतस्था पसरलेले असतात कुठेतरी फ्रिजवर, कुठेतरी टेबलवर, किचन ओट्यावर अश्या वेगवेगळ्या ठिकाणी या नाणी व नोटा पसरलेल्या दिसतात. हा माता लक्ष्मीचा, देवी लक्ष्मीचा, आई लक्ष्मीचा खूप मोठा अपमान मानला जातो.

आणि अश्या घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही. या नाणी आहेत नोटा आहेत ही जी नाणी आहेत ती एकत्र करा ती व्यवस्थित कुठेतरी ठेऊन दया. मित्रांनो आपल घर नीट नेटक ठेवण ते स्वच्छ ठेवण, सजवन हे अतिशय आवश्यक आहेच जर लक्ष्मीला तुमच्या घरामधे स्थिर करायच आहे जर तुमचं घर हे नीट नेटक नाही.

अस्वच्छ आहे तर लक्ष्मी तर येईल पण ही सगळी अवस्था पाहून आल्या पावली निघून जाईल तेव्हा ही सुध्दा काळजी तुम्ही घ्या. मित्रांनो ज्या कामातून आपल्याला पैसा मिळतो त्या कामावर आपली निष्ठा असण आपल प्रेम असण त्या कामाविषयी बेइमानी न करण त्या कामाला नावे न ठेवण.

हे फार महत्वाचं आहे कारण तिचं आपली लक्ष्मी आहे. आणि जर आपण त्या लक्ष्मीला नावे ठेवत असू तर घरामध्ये अलक्ष्मी ही येणारच. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण जीला गरिबी, दरिद्रता अशी विविध नाव आहेत. मित्रांनो पैसे देताना ते मजबूत हाताने उजव्या हाताने दया. समोरच्या व्यक्तीला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत तर उजव्या हाताने दया.

आणि पैसे घेताना मात्र डाव्या हाताचा वापर करा. डावा हात हा सर्जनशीलतेचा प्रतीक आहे. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मिती म्हणजे काहीतरी नवीन. त्या आलेल्या पैशातून आपण अस काहीतरी करणार आहोत की ज्यांनी काहीतरी नव निर्मिती होईल काहीतरी नवीन घडेल. त्या पैश्यामध्ये आपण वाढ करणार आहोत.

मित्रांनो प्रत्येक दिवशी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दिवसाची सुरुवात करताना नाणी कधीच खर्च करू नये एकच नाण असेल पाच असेल, दोन असेल नाणी कधीच खर्चायची नाहीत. नोटा त्या ठिकाणी देऊ शकता. नाणी कधीच खर्च करू नका. पहिला व्यवहार झाल्यानंतर आपण नाणी खर्च केलीत तरी चालेल.

मित्रांनो सर्व धर्म ग्रंथामध्ये सांगितलेले कॉमन तत्व याही ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. आपण तंत्र शास्त्रावर जास्त भर देतो ज्या काही तांत्रिक विद्या आहेत त्यांचा वापर केला जातो. तांत्रिक विद्येत सांगितलेलं आहे जर तुम्हाला भरपूर धन श्रीमंत बनायच असेल तर तुम्ही श्रीमंत लोकांचं अनुकरण करा. श्रीमंत लोक कशा प्रकारे वागतात, कशा प्रकारे व्यवहार करतात.

त्यांची वाणी कशी आहे ही फार महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला श्रीमंत लोकांच्या तोंडून कधीच चुकीचे शब्द बाहेर पडलेले दिसून येणार नाही आणि म्हणून आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा. याला जिव्हा नियंत्रण असे म्हणतात जिभेवर नियंत्रण ठेवणं म्हणजे काय की आपल्या तोंडून कधीच कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या.

नेहमीच आपल्या तोंडून गोड शब्द बाहेर पडावे, आपल्या डोक्यावरती बर्फ असावा, शांत डोक्याने विचार करून आपण समोरच्या व्यक्तीचं मन दुखावू नका. मित्रांनो आला राग भिक माग ही म्हण तुम्ही ऐकली असेल. ज्या व्यक्तीला सतत राग येतो त्या व्यक्तीला अंतिमतः शेवटी भीक मागण्याची वेळ येते त्याचे सर्व संबंध हे तुटले जातात तेव्हा जिभेवरती नियंत्रण नक्की ठेवा.

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग आला तर लगोलग न बोलता २४ तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या व्यक्तीला जे काही बोलायचे ते बोला मात्र लगोलग प्रतीउत्तर देऊ नका अन्यथा तुमचं नुकसान हे निश्चित आहे. जर तुम्हाला २४ तास वाट पाहणं शक्य नाही तर कमीत कमी १५ मिनीटे थांबा आणि त्या नंतर त्या व्यक्तीला उत्तर दया.

रागाच्या भरात काही बाही बोलू नका. मित्रांनो याला सनिंटीफिक प्रुफ असा आहे आपल्या मेंदूचे दोन पार्टस होतात. पहिला भाग हा इमोशनल म्हणजे भावनिक ब्रेन चा आहे. आपल्या मेंदूचा एक भाग हा भावनिक आहे तो इमोशन्स वर भावनांनवर चालतो. दुसरा जो भाग आहे ती रॅशनल आहे म्हणजे तो बुध्दीच्या जोरावरती चालतो. तो विचार पूर्वक चालतो.

जेव्हा एखादी व्यक्ती रागावते तेव्हा आपल्या रागाच्या भरात आपण आपल्या इमोशनल ब्रेनचा वापर करते आणि लगोलग त्याला उत्तर देतो आणि त्यातून भांडणे उद्भवतात. श्रीमंत होण्यासाठी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणं हे गरजेचं आहे. मित्रांनो आपल्या थोरा मोठ्यांचा, वयाने ज्येष्ठ आहेत त्यांचा सन्मान करा.

घरातील स्त्रियांना योग्य तो आदर दया. आपले कोणीही शत्रू निर्माण होणार नाहीत किंवा आपले जे व्यक्ती आपले शत्रू आहेत ते व्यकी आपले मित्र कसे बनतील याचा विचार या नवीन वर्षात या २०२३ मधे नक्की करा जितके जास्त मित्र जोडता येतील तितके जोडा आणि हो जे काही उपाय तुम्ही करणार असल जी काही देवपूजा तुम्ही करता.

जी काही अनुष्ठान करता उपाय करता, तोटगे करता, किंवा तुम्हाला एखादा मंत्र सुट झालेला आहे, त्या मंत्रमुळे तुम्हाला फायदा होतो तर या सर्व गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात या गोष्टींची वाच्यता कुठेही करू नका. मित्रांनो ज्या मंत्राचा तुम्हाला फायदा होतो त्या मंत्राचा जप चालता बोलता सातत्याने करत चला.

तुम्हाला विलक्षण अतिशय चांगले असे अनुभव त्यातून येवू लागतील. आपल्याकडे जो पैसा आलेला आहे त्या पैशाचा सन्मान करा. तो पैसा कश्या प्रकारे आपण कमावलेला आहे त्यासाठी आपण किती मोठी किंमत चुकवलेली आहे, किती घामाच्या धारा वाहिलेल्या आहेत.

हे लक्षात ठेवून पैसा योग्य मार्गाने खर्च करा. बचतीवरती लक्ष ठेवा. वायफळ गोष्टींवर खर्च करू नका. मित्रांनो या काही गोष्टींच पालन जर आपण २०२३ या सालामध्ये केलं तर आम्हाला खात्री आहे साल आपल्या सर्वांसाठी सुखाच, समाधानाच भरभराटीच नक्की जाईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *