नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, हा आजचा जो पण अनुभव मी सांगणार आहे, तो मुंबई विलेपार्ले येथील कुमारी आदिती केळकर यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे की मी मुंबई विलेपार्ले येथे राहते 2008 साली मी ग्रॅ’ज्युएट झालेली आहे. आतापर्यंत मी जे पण काही मिळवलं ध्येय, शाब्बासकी, सर्व काही खडतर प्रयत्नांच्या नंतर मला मिळालेलं आहे.

आणि ते सर्व मिळवताना मला खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागले होते. खुप काही खस्ता खाव्या लागल्या. तरीही पदरात बऱ्याचदा अपयश सुद्धा आले. पण या परिस्थितीत मी खूप खचून जात होते, आणि मित्रांनो जेव्हा माणूस खचून जातो ना तेव्हा पुन्हा त्याच्या पंखामध्ये बळ यायला बराच काळ लागतो. पण मी देखील प्रयत्नांबरोबरच आध्यात्माची जोड म्हणून या मार्गावर आले.

म्हणजेच आयुष्यात स्वामींचा आशीर्वाद आणि अध्यात्माची जोड असेल तर सर्व काही शक्य होतं. याची प्रचिती मला गेल्यावर्षी आली. माझा शेवटचं वर्ष टी वाय बीएस्सी म्हणजे शेवटचं महत्वाचं वर्ष होतं. सुरुवातीचे काही महिने अगदी छानपैकी अभ्यास झाला पण त्यानंतर आयुष्यात एकेक संकटांना सुरुवात झाली. नकळत माझ्या अभ्यासावर परिणाम झाला. जेव्हा मला समजलं की माझ्या अभ्यासावर परिणाम होत आहे तेव्हा माझं सर्व बळ गेलं.

पण तरीही त्यानंतर माझं सर्व लक्ष मी अभ्यासावर लावलं. खूप मनापासून अभ्यास केला. परीक्षा दिली, आणि निकालाची वाट पाहत होते. पेपर छान गेल्यामुळे निकाल ही चांगलाच लागेल याची मला पुर्ण खात्री होती‌ पण सगळा अनपेक्षित निकाल लागला, व अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळाले आयुष्यात कधी इतके कमी गुण मिळालेले नव्हते.

माझा भ्रमनिरास झाला, मी मनातून पूर्णपणे खचून गेले होते. त्यातच मला कावीळ झाली. तब्येतीवर खूपच परिणाम झाला. तेव्हा मला माझ्या मावशीने म्हणजे माधुरी खांडेकरने स्वामींच्या बद्दल सांगितलं. तिने सांगितले की तारक मंत्र म्हणायला सुरुवात कर. तुझा गेलेला आत्मविश्वास गेलेले बळ सर्वकाही परत मिळेल. आणि तुझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल होईल.

विश्वास ठेवा मी रोज न चुकता तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि काय चमत्कार चार-पाच दिवसातच मला नोकरी साठी फोन आला माझा क्लास सुरू झाला. मी पुन्हा जोमाने अभ्यासाला लागले. मनःशांती मिळाली सरांकडून शाबासकीची थाप मिळाली. ऑफिसमधला मी एक अविभाज्य घटक बनले आणि त्यामुळे माझा एम बी ए चा अभ्यास छान व्हायला लागला. माझी हरवलेली माणसं मित्र मला परत मिळालीत.

घरात एक प्रकारचा सकारात्मक बदल झाला. दादा मार्गाला लागला त्यामुळे आई खूप खुश होती, थोडक्यात काय आमचं घर पुन्हा मार्गावर आलं. सुख शांती पसरली आणि ती कायम राहील याची खात्री आहे. कारण स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर याची प्रचिती मला आली.

या प्रकारे या ताईंचा अनुभव होता सोबतच आणखी एका दादांनी अनुभव दिला आहे. दादांचे नाव आहे वैभव केळकर त्यांनी सांगितला आहे. मी वैभव केळकर मुंबईत विलेपार्ले येथे राहतो मी कमर्शियल आर्टिस्ट आहे मला लहानपणापासूनच अभ्यासाची कधीच आवड नव्हती. माझ्या मन रमायचं ते कलेमध्ये चित्रकलेची मला प्रचंड आवड होती.

म्हणूनच मी या क्षेत्रात माझं करिअर करायचे ठरवले. मी त्या क्षेत्रात यशस्वी सुद्धा झालो. पदवी मिळाली आणि नोकरी सुद्धा पण नोकरी करणं कधीच माझ्या पचनी पडलं नाही. आणि अशी परिस्थिती सुद्धा नव्हती कि स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा. मी आठ वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधली.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची माझी महत्वकांक्षा होती पण यश येत नव्हते. खूप प्रयत्न केले पण सारखे अपयश पदरी पडत होते मला खूप डिप्रेशन आला यातून कसा मार्ग काढायचा हे मला समजत नव्हतं. नव्या जोमाने पुन्हा उभारायचं होतं पण पंखात बळ नव्हतं. अशा वेळी माझ्या मावशीने सौ माधुरी खांडेकर यांनी मला श्री स्वामीं बद्दल सांगितलं ती म्हणाली.

तुला जे हव आहे ते मनापासून माग स्वामी तुला नक्की काहीतरी दिशा दाखवतील. मी तिच्यावर मनोमन विश्वास ठेवून स्वामींची मनापासून भक्ती करायला सुरुवात केली. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि बघता बघता सर्व चित्रच बदलून गेले मी माझ्या स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली.

लहान जागेपासून सुरुवात केली माझ्या कामाची माझ्या मेहनतीची माझ्या आतपेष्टांकडून प्रशांसा होऊ लागली. हळूहळू काम मिळू लागले गेल्या आठवड्यातच मी माझं मोठं ऑफीस सुरू केलं. हे सर्व शक्य झाले ते केवळ स्वामीं मुळेच..

एकामागोमाग एक चांगल्या घटना अनुभवायला मिळाल्या माझ्या मनात एकदम सकारात्मकता आली. हे सर्व केवळ स्वामींच्या कृपेमुळे शक्य झाले. अशीच सुख-समृद्धी माझ्या घरामध्ये कायम राहील याची मला खात्री आहे. कारण स्वामी नेहमीच म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेयर हि नक्की करा धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *