नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री हालसिद्ध नाथांची भाकणूक प्रसिद्ध असून या भाकणूकीतील अनेक गोष्टी तंतोतंत घडतात. त्यामुळे या भाकणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व दैवत हालसिद्धनाथांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे सालाबाद प्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांची भाकणूक होते. वाघापूरचे प्रमुख भगवान डोणे महाराज यांच्या उपस्थितीत त्यांचे पुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या साक्षीने भाकणूक केली.

नाथांनी भाकणूकीतून भविष्यवाणी कथन करताना महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प उदयास येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येऊन नंदनवन होईल. जाती धर्म बिघडून जात वैर वाढेल व हाणामाऱ्या होतील. भारत-पाक सीमेवर रण धुमेल, यामध्ये मराठा सैनिक छातीची ढाल करून लढतील व पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या कब्जात येईल. भारत मातेचा जयजयकार होईल.

सोयाबीन कडधान्य उदंड पिकेल. मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात जाईल.देशात समान नागरी कायदा येईल. आगामी वर्षाचा दिवस आनंदात दावीन. सोयाबीन कडधान्य उदंड पिकल दीड महिन्याचे पीक येईल. जगातील तापमानात उच्चांकी वाढ होऊन जंगलांना आग लागून वन्यजीव औषधी वनस्पती नष्ट होतील.

वस्त्रोद्योग अडचणीत येईल. सुताचा दलाल दिवाळ काढेल. गोरगरीब जनता आनंदात व सुखी राहील. ऋतुमानात बदल होईल. बारा महिने पाऊस पडल. बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल. काँग्रेस पक्षात फूट पडल. राजकारणात भगवा फडकल.चीनचा भारतावर हल्ला होईल.

नेहमी चर्चेत असणारा सीमा प्रश्न राजकर्त्यांच्या नेहमी चर्चेत राहील. सीमा भागात मोठा गोंधळ माजल. निपाणी भागात अतिरेकी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील. होईल होईल जाळपोळ होईल, दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांड्याने गावा गावात,राज्या-राज्यात राजकारणाला कलाटणी मिळेल. भगवा झेंडा राज्य करेल. दिल्लीच्या गादीला धक्का बसल.

नऊखंड पृथ्वी,दहावा खंड काशी आणि दहाव्या काशीत माझा दरबार हाय.करवीर काशी माझं ठिकाण हाय. कोल्हापूरच्या गादीवर इंगाळ पेटतील.कोल्हापूरच्या देवीला संकट पडलय.रात्री बाराच्या सुमारे तिच्या डोळ्यातून पाणी पडतंय. परमेश्वर त्याचा न्याय निवाडा करेल.

गर्वान वागशीला तर फसून जाशीला. गर्वाचे घर खाली आहे. मी मोठा तू मोठा म्हणू नका. करशील सेवा तर खाशीला मेवा अशाप्रकारे डोणे महाराजांनी भाकणूक कथन केली.अशाप्रकारे दरवर्षी भाकणूक सांगितली जाते व ती तंतोतंत खरी होते हे वैशिष्ट्य आहे..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *