श्री स्वामी समर्थ.. जय जय स्वामी समर्थ.!! आज मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी ताईंना आलेला स्वामींच्या लीलांचा अद्भुत अनुभव सांगणार आहे. स्वामी महाराज हे फक्त आपल्याला म्हणजेच मनुष्याला तारणारे नसून, त्यांना मुक्या जीवांची देखील तितकीच काळजी आहे. असाच या बाबतीत आलेला अनुभव एक ताई आपल्याला सांगत आहे.

ते सांगतात माझ्या या अनुभवांमुळे तुमची खात्री पटेल की, स्वामी महाराज हे फक्त सेवेकरांना तारणार नसून सेवेकराच्या घरातील व्यक्ती, शेती आणि पशुधन यांचे देखील ते संरक्षक आहेत. आमच्या गाईला साधारपणे दोन महिन्याचे वासरू होते. एके दिवशी माझे पती गाईचे दूध काढत होते.

अचानक गाईने पाय झाडला आणि तो दुधाच्या भांड्याला लागून सगळे दुध खाली पडले. संतापून माझ्या पतीनी गाईच्या पाठीवर मारले. पतीने जसे मारले तशी गाई पटकन खालीच बसली.

ते संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत गाय त्याचठिकाणी तशीच बसून होती. आम्ही सकाळी डॉक्टरला बोलावले आणि डॉक्टरांनी उपाय केले, काही इंजेक्शन देखील दिले. पुढचे 5 ते 6 दिवस सलग डॉक्टर येत होते पण गाय जागची हलत नव्हती. गाय बसून असल्याने तिची कमरेखालची जागा दुखावली गेली होती.

गाय बसली होती ती जागा रहदारीची होती. गावातल्या लोकांची अडचण होयला लागली होती. आम्ही दहा बारा लोकांनी गाईंच्या पोटाखाली लाकूड घालून तिला उचलण्याचा प्र य त्न केला. पण गाय जागची हालत नव्हती. जवळपास दहा दिवस झाले होते.

गाय एकाठिकाणी बसून असल्याने मांड्यांना जखमा होऊ लागल्या होत्या. घरातही गाईमुळे भांडणे होऊ लागली होती. गाईची विषय सुरू होऊन एकमेकांवर दोषारोप सुरू व्हायचे. मी अनेक वर्षांपासून स्वामींची सेवेकरी. ऐके दिवशी मी गारायण स्वामींकडे मांडले.

गाय ही दत्त महाराजांची पाठ राखीन आहे. तुम्हीच आता काय ते पहा असे आर्जव करत मी सगळे स्वामींवर सोपवून दिले. तेवढ्यात नित्य सेवेचे पुस्तक चाळता चाळता मला त्यात वल्गासूत्र दिसले. त्याची संपूर्ण सेवा मी वाचून काढली. घरात कोणालाही न सांगता मी हळद घेऊन तिला घट करून गाईच्या अंगावर 3 दिवस हाताचे ठसे उमटवते होते.

ज्या दिवशी मी ठसे उमटवले त्याच्या दुसऱ्याच दिवशी गाय थोडीशी हालचाल करू लागली. तिसऱ्या दिवशी ती सरकत गोठ्यापर्यंत गेली. तिथंपर्यंत कशी गेली हे फक्त स्वामींनाच माहिती. सेवेला स्वामी पावत होते हे पाहून मला धीर येत होता. गाय आता वासऱ्याला चाटु लागली होती.

गाय बरी होत होती. पण घरातले तंटे मात्र काही संपत नव्हते. मी अनेकदा प्र य त्न केला सांगायचा पण व्यर्थ. दहाव्या दिवशी गाय उठून उभी राहिली आणि मी सगळ्यांना आनंदाची गोष्ट सांगितली. घरातल्या लोकांचा माझ्यावर आणि सेवेवर विश्वास बसेना.

जिथे डॉक्टर थकले तिथे माझी सेवा काय करणार असे त्यांना वाटत होते. पण स्वामींची लीला आणि अशक्य ही शक्य करण्याचं त्यांचं सामर्थ्य. जेव्हा त्यांनी गोठ्यात येऊन पाहिले तेव्हा त्यांनीही आनंद झाला. शेवटच्या अकराव्या दिवसाचा छाप मी गोमुखावर मारला.आज आमची गाय सुखरूप आहे आणि तिला गेल्या काही वर्षात काहीही झालेलं नाही. खरचं अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *